सकाळी उठून या मंत्रांचा जप करा, तुमचे भाग्य बदलेल..!!!
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये मंत्रांचे व श्लोकांचे विशेष महत्त्व आहे. मंत्राच्या माध्यमातून विविध कठीण कामेही सहजपणे केले जाऊ शकतात.
आपल्या ऋषीमुनींनी दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रत्येक कामापूर्वी एक विशेष मंत्र म्हणण्याचे विधान बनवले आहे, परंतु बदलत्या काळासोबत आपण या परंपरेपासून दूर होत चाललो आहोत. आज आम्ही तुम्हाला अशाच मंत्रांची माहिती देत आहोत. हे मंत्र सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कामापूर्वी उपयोगात येऊ शकतात.
शास्त्रात असे म्हटले आहे की, व्यक्तीने पहाटे ब्रह्म काळात उठायला हवे. यामुळे सकारात्मकता आणि उर्जा मिळते आणि दिवस चांगला जातो. तथापि, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण शास्त्रामध्ये नमूद केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यास सक्षम नाही.
पण सकाळी काही काम केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी मिळू शकते. ज्योतिषशास्त्रा नुसार, प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे तळवे एकत्र जोडावे आणि त्यांचे दर्शन घ्यावे. असे केल्याने तुमचे सर्व काम पूर्ण होऊ लागते आणि तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो.
असे काही मंत्र शास्त्रात देखील सांगितले गेले आहेत, ज्यांचा सकाळी जप केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता येते. या मंत्रांचा जप केल्याने जीवनातील सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात.
सकाळी उठताच दोन्ही हातांकडे पाहून या मंत्राचा उच्चार करावा. यामुळे जीवनात शांति व सकारात्मकता टिकून राहते. सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या हस्तरेषांचे दर्शन घेतले तर, त्याला कर दर्शन म्हटले जाते.
तळ हाताचे दर्शन घेऊन आपल्या हातांमध्ये सहवास असलेल्या लक्ष्मी, सरस्वती आणि ब्रह्माचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले जातात. तुम्ही जर असे रोज करत असाल तर, हे केवळ तुमच्यासाठी नव्हे तर, तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी सूख, शांती, ज्ञान आणि सांपत्तीक स्थिती चांगली होण्यासाठी फायदेशीर असते, अशी धारणा आहे.
जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करत असता. त्यावेळी डोक्यातून राग, भिती अशा भावना दूर होत जातात. मनातून नकारात्मक विचार निघून जातात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निट राहण्यासाठी मंत्राचा जप फायदेशीर ठरत असतो. सकाळी लवकर उठून जप केल्याने संपुर्ण दिवस चांगला जातो. चला तर मग ते मंत्र कोणते आहेत हे पाहुया…
जीवनात सुख आणि समृद्धीसाठी मंत्र:
ॐ मंगलम् भगवान विष्णु: मंगलम् गरूड़ध्वज:।
मंगलम् पुण्डरीकांक्ष: मंगलाय तनो हरि।।
जीवनातील शांती आणि सकारात्मकतेसाठी मंत्र –
कराग्रे वसते लक्ष्मी: कर मध्ये सरस्वती।
करमूले गोविन्दाय, प्रभाते कर दर्शनम्॥
जीवनात यश मिळवण्यासाठी मंत्र:
गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वर:।
गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम:॥
सकाळी उठून या मंत्रांचा जप केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते –
करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तम्।
वटय पय पुटेशयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि।।
सीताराम चरण कमलेभ्योनम:।
राधा-कृष्ण-चरणा कमलेभ्योनम:॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमै:।
सहस्त्रनाम तत्तुल्यं श्री रामनाम वरानने॥
सीताराम चरण कमलेभ्योनम:।
राधा-कृष्ण-चरण कमलेभ्योनम:॥
माता रामो मम् पिता रामचन्द्र:
स्वामी रामो ममत्सखा सखा रामचन्द्र:
सर्वस्व में रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने॥
त्वमेव माता च पिता त्वमेव। त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव। त्वमेव सर्वम् ममदेव देव।
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतापतये नम:॥
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!