उन्हाळ्यात लिंबू सरबत किंवा शिकंजी पिण्याचे आहेत ९ फायदे..

मित्रांनो.. उन्हाळ्यात रसायनं मिसळलेली कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा शहाळे, लिंबू पाणी, कोकम सरबत घेणं नेहमीच चांगलं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन शरीर साफ होण्यास मदत होते. दिवसभरात लिंबू पाणी कधीही घेणं चांगलं. मात्र सकाळी उठून लिंबू पाणी घेणं शरीरासाठी अधिक चांगलं.

  • १) सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी घेतल्यानं शरीर साफ होते.
  • २) लिंबू पाणी शरीरातील पाचक रसांना उत्तेजित करते. यामुळे पचनक्रिया सुधारते.
  • ३) लिंबू पाण्यात मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमीन सी असते. तसेच अनेक अँटी ऑक्सिंडट गुणही असतात. यामुळे त्वचेवरील डाग निघून जातात.
  • ४) तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास लिंबू पाण्यानं हा त्रास दूर होतो.
  • ५) लिंबू पाण्यामुळे मुख दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्यानं शरीर ताजेतवानं राहतं.
  • ६) लिंबू पाण्यामुळे शरीरातील पीएच लेव्हल कायम राहते.
  • ७) लिंबू पाण्यात व्हिटॅमीन सी आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
  • ८) सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी प्यायल्यास दिवसभर ताजेतवानं राहण्यास मदत होते.
  • ९) जर तुम्ही वजन कमी करत आहात तर सकाळी उठून लिंबू पाणी पिणं चांगलं.

Leave a Comment