उन्हाळ्यात सुद्धा भिजवलेले बदाम खाण्याचे आहेत अनेक फायदे..

बदाम आकाराने लहान दिसताय पण आयुर्वेदात बदाम त्यांतील गुणधर्मांमुळे खूप फायदेशीर मानले गेले आहेत. आपल्याला घरातील मोठ्या माणसांकडून नेहमीच बदाम खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांचे म्हणणं असतं की बदाम खाल्ल्याने स्मरणशक्तीच सुधारते आणि शारीरिक व मानसिक समस्या दूर होण्यास देखील मदत होते.

उन्हाळा आता सुरु होतच आहे.. म्हणून आज बदाम सेवन करण्याचे फायदे आणि तोटे तसेच उन्हाळ्यात बदाम खावे की नाही याबद्दल बऱ्याच शंका कुशंका आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊया बदाम खाण्याचे फायदे आणि तोटे..

आपण उन्हाळ्यात बदाम खावे की नाही? तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार जर तुम्ही पाण्यात भिजलेले बदाम खाल्ले तर ते आरोग्यासाठी हितकारक तर आहेतच पण आपण उन्हाळ्यामध्येही त्याचे सेवन करू शकतात. वास्तविक, भिजवलेले बदाम पाचन तंत्रासाठी चांगले मानले जातात, कारण भिजलेले बदाम पचायला सोपे असतात. त्यांच्या वापरामुळे बद्धकोष्ठतेच्या लक्षणांमध्ये आराम मिळतो आणि अपचन व अपचनचा त्रासही होत नसतो.

उन्हाळ्यात बदाम अधिक खाण्याचे नुकसान म्हणजे बदाम उन्हाळ्यात जास्त परिणामकारक असतात, म्हणून उन्हाळ्यात ते प्रमाण कमी केले पाहिजे. उन्हाळ्यात बदामाचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते आणि बर्‍याच समस्या उद्भवू शकतात.

जादा व्हिटॅमिनचा धोका असतो, बदामांमध्ये पुरेसे पोषकतत्वं असतात आणि जीवनसत्त्वे देखील आढळतात. बदाममध्ये सर्वाधिक व्हिटॅमिन ई सामग्री असते. जर तुम्ही आपल्या गरजेपेक्षा जास्त बदाम खाल्ल्यास त्यात व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असू शकतं. व्हिटॅमिन ईच्या अति प्रमाणामुळे अतिसार, लठ्ठपणा आणि कधी कधी देखील चक्कर येऊ शकते.

उन्हाळ्यात अतिरिक्त बदाम खाण्याने वजन वाढू शकते. जर आपण नियमित व्यायाम किंवा एक अॕक्टिव आयुष्य जगत नसाल तर आपण बदामाचं सेवन काळजीपूर्वक करायला हवं.

बदामांमध्ये कॅलरी आणि चरबी दोन्हींचं प्रमाण जास्त असतं. आपण दररोज किती कॅलरीज् बर्न करतो त्यावर तुम्ही ठरवू शकतात किती बदाम खायला हवे. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल तर बदामाचे कमी प्रमाणात सेवन करा.

Leave a Comment