आपला हिंदू धर्म विविध परंपरांनी परिपूर्ण आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्म हा एक सनातन धर्म आहे देखील. या धर्माची स्वतःच्या काही श्रद्धा आहेत मान्यता आहेत. या धर्मात प्रत्येक श्र-द्धेमागे स्वतःचे एक वेगळे महत्त्व आहे.
आपल्या हिंदू धर्मात, पूजेच्या वेळी नारळ अर्पण करण्यालाही खूप महत्त्व आहे. हे नेहमीच शुभ मानले जाते. पूजेमध्ये नारळ फोडतांना जर तो खराब निघाला तर त्या मागे सुद्धा एक वेगळा अर्थ आहे. प्रत्येक शुभ कार्य करण्यासाठी नारळ हे शुभ मानले जाते.
त्यामुळे सर्व कामे शुभ मार्गाने होतात. नारळाला माता लक्ष्मीचे प्रतीक सुद्धा मानले जाते. असेही म्हटले जाते की प्रत्येक पूजेमध्ये नारळ असणे फार महत्वाचे आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.
नवरात्रातही लोक माता राणीला प्रसाद म्हणून नारळ देतात. असे पुष्कळ वेळा पाहिले गेले आहे की तुम्ही आईच्या पूजेमध्ये नारळ अर्पण करता तेव्हा कधी कधी ते आतून खराब ठरते. आणि हे आपल्याला आवडत नाही की खोबरे खराब निघाले आहे. तुमच्या सोबतही कधी असे घडले असणार की तुम्ही पूजेसाठी दिलेला नारळ आतून खराब निघाला आहे?
मित्रांनो, हे तुमच्यासोबत कधी ना कधी घडलं असेल आणि जेव्हा ते घडलं असेल तेव्हा तुम्हाला त्या दुकानदाराचा खुपचं राग आला असेल ज्याच्या कडून तुम्ही तो नारळ घेतलेला असतो, मग तुम्ही त्याला दूषणं देत असतात.
तुमच्या मनात असा देखील विचार आला असेल की तो नारळ आता खराब निघाला म्हणून, देव आपल्यावर क्रोधित झाले असणार. असं मनामध्ये येते की काही दुर्घटना तर होणार नाही आहे ना..?? यासारख्या बर्याच गोष्टी आपल्या मनात घर करु लागतात.
पण मित्रांनो, हे सर्व फक्त आपले भ्रम असतात, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजेचा नारळ जेव्हा खराब निघतो तेव्हा तसे होणे हे आपल्यासाठी शुभ मानले जाते. असे म्हणतात की असे घडते तेव्हा देव तुम्हाला काही संकेत देत आहेत. आज आम्ही आपल्याला याच संकेतांबद्दल सांगणार आहोत.
आपणास माहितीच आहे की नारळाला देवीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या पूजेमध्ये नारळ असणे आवश्यक आहे. पूजेमध्ये अर्पण केलेले नारळ जर खराब निघाले तर याचा अर्थ असा होत नाही की आता काहीतरी अशुभ होणार आहे, परंतु खराब असलेले नारळ निघणे अतिशय शुभ मानले जाते.
असे मानले जाते की नारळ फोडतांना नारळ खराब निघाला तर देवाने त्याला प्रसाद म्हणून स्वीकारले आहे असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणूनच नारळ आतून पूर्णपणे कोरडा निघतो किंवा खराब निघतो.
या मागे एक मान्यता अशी पण आहे की फोडलेला नारळ जर खराब निघाला तर असे समजावे, आपली कोणतीही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, हेही नारळ खराब निघण्याचे लक्षण आहे. इतकेच नाही तर ते तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ही सूचित करते.
यावेळी, आपण ईश्वरासमोर जी काही इच्छा व्यक्त करता ती नक्कीच पूर्ण होते. तर दुसरीकडे, जेव्हा उपासनेचे नारळ चांगले निघते, तेव्हा तो प्रसाद केवळ आपल्या जवळ ठेवू नये. तो प्रसाद सारख्या प्रमाणात सर्वांमध्ये वाटून द्यावा. असे केल्याने प्रत्येकाला उपासनेचे फळ मिळते. तथा आपली उपासना देखील सफल होते.
टिप – वरील माहिती ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.