मित्रांनो आपण आपले उत्तम आरोग्य तसेच टवटवीत सौंदर्य राहण्यासाठी पहाटे उठून अनेक नवनवीन उपाय नेहमी करत असतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकाळचा व्यायाम आणि हलकाफुलका नाश्ता.
यावेळी कोणत्या पदार्थांचा आपण उपयोग करतो, किंवा यासाठी आपण कोणता डाएट प्लॅन करतो हे अधिक महत्त्वाचं. अगदी त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर लिंबूपाणी आणि त्यात थोडंस मध घेतल्याने शरीराची पचन क्रिया सुरळीतपणे सुरु राहते.
आणि… इतकचं नाही तर आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टम सुद्धा अतिशय मजबूत होते. हे लिंबूपाणी बनविणे, हे अतिशय सोपे आहे. तसेच सर्वांसाठी सोयीस्कर देखील आहे. पण तुम्ही विचार करत असाल कि, लिंबू सरबत प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात बरं.. आज आम्ही तुम्हांला हेच सांगणार आहोत.
सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत मध आणि लिंबाचा रस घेतल्यास तुमचं वजन नक्कीच घटू शकतं मात्र वजन कमी करण्यासोबतच अनेक जादुई गुणधर्म दडले आहेत या ‘मध – लिंबू’ मिश्रित पाण्यात तर मग पहा काय काय करू शकते मध – लिंबुपाणी…..
मानवी शरीरात अनेक विषारी घटकांची निर्मिती होत असते त्यामुळे कर्करोगासारखे आजार होण्याचा संभव असतो .मध – लिंबुपाण्याचे मिश्रण लहान तसेच मोठ्या आतड्यांना चालना देते व विषारी घटकांचा नाश करते. आयुर्वेदानुसार हे मिश्रण नैसर्गिकरित्या मोठे आतडे स्वच्छ करते, अन्नातील पोषक द्रव्ये ग्रहण करते व विषारी घटक दूर ठेवते.
सकाळी उठाल्यानंतरदेखील जर तुम्ही निरुत्साही राहत असाल तर मध – लिंबुपाण्याचे मिश्रण सकाळी नक्की प्या ! कारण यामधील मध तुम्हाला तत्काळ उत्साही करते तर पाण्यामुळे मेंदूला नवीन रक्ताचा पुरवठा झाल्याने मनही प्रसन्न राहते . शरीरातील विषारी घटकांमुळे येणाऱ्या सुस्तीपणाला लिंबू दूर ठेवते त्यामुळे तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटते .
लिंबामध्ये भरपूर प्रमाणात “व्हिटॅमीन- सी” असल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे खूपच प्रभावी परिणाम करते. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असल्याने मेंदूच्या पेशी सुरळितपणे आपले कार्य करतात.
बिनसाखरेचे लिंबूपाणी पिल्याने शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते. तसेच ङायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते. यासाठी दररोज सकाळी फक्त एक ग्लास लिंबूपाणी पिण्याची सवय लावा. हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते.
चेहऱ्यावरील फोङ्या व ङाग नाहीसे होतात. वयोमानानुसार येणाऱ्या सुरकुत्या देखील नाहीशा होतात. आपली त्वचा चमकदार राहण्यासाठी दररोज न विसरता लिंबूपाणी अवश्य घ्या. तसेच आम्लपित्तापासून होणाऱ्या त्रासातून सुटका होते.
पहाटे सकाळी अनशेपोटी लिंबूपाणी पिल्याने पोट साफ होण्यासाठी खूप छान मदत होते. त्यामुळे आपण जे अन्न खाल्ले आहे, ते व्यवस्थित पचले जाते. त्यामुळे आपल्या शरीराला उत्तम फायदा होतो. तसेच ज्यांना कफ ची समस्या असेल, त्यासाठी देखील आराम मिळतो. सकाळी लिंबूपाणी पिल्याने संपूर्ण दिवसभर तुम्हांला ताजेतवाने वाटते.
जे लोक आपले वजन कमी करण्यासाठी इच्छुक असतील, त्यांनी नियमीतपणे लिंबूपाणी घ्यावे. त्यामुळे मूत्र विसर्जनाद्वारे शरीरातून सर्व विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. त्याचप्रमाणे मूत्र मार्गाच्या संसर्गापासून आपले संरक्षण देखील होते.
पहाटे अनशेपोटी लिंबूपाणी पिल्याने तोंडात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे तोंडाला दुर्गंधी तर येत नाही. तसेच आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते.