उतारा म्हणजे काय आधी आपण हे समजून घेऊयात ज्या व्यक्तीवर दृष्ट शक्तीचा प्रभाव आहे करणी, भानामती, प्रेत बाधा, भूत बाधा, पिशाच्च बाधा, इ. त्या व्यक्तीवर नारळ असेल अंडी, लिंबू, मांस, भात,नारळावर कपूर असेल हळद, कुंकू असेल हे तांत्रिक आणी मांत्रिक लोक आमावस्या पौर्णिमेला त्या व्यक्तीवरून हे साहित्य उतरून टाकतात.
म्हणजे त्याच्यावर आरूढ झालेली अनिष्ट शक्ती त्या त्या उताऱ्यावर येऊन तो उतारा नदीच्या काठी मोकळ्या जागेत किंवा स्म्शानात ठेवतात. तसेच दारू सुद्धा उताऱ्यामध्ये ठेवण्याची प्रथा आहे.
उतारा का ओलांडू नये व तो कुणी ओलांडू नये तसं तर आम्ही सांगू कुणीच ओलांडू नये.
1) गर्भवती स्त्रीने
2) आजारी व्यक्तीने
3) नवविवाहित हळदीच्या अंगाने
4) लहान मुलांनी
5) मुळात राजस्वाला गेलेल्या स्त्री ने…
ज्या व्यक्तीवरून तो उतारा उतरून टाकलेला असतो त्याला जो त्रास होत होता तो तुम्हालाही होऊ शकतो उगाचंच इतर संकटाना विनाकारण सामोरे जावे लागेल..
सोमवती अमावस्या च्या दिवशी करण्यासाठी हा उपाय आहे. आज एक छान पैकी तोडगा मी तुम्हाला देणार आहे. जर का चुकून कुणी हा उतारा ओलांडला असेल किंवा वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्यावर पडत असेल.
विनाकारण घरामध्ये वाद विवाद होत असतील घरात अशांत वातावरण असेल तुमच्या मनात पूर्णतः निगेटिव्ह एनर्जी भरलेली असेल विनाकारण चिडचिड होत असेल तर सर्वांनी आज सोमवती अमावस्या ला संध्याकाळी सात वाजता हा उपाय करुन पहावा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल…..
एक नारळ घेऊन तो पूर्णपणे सोलावा नारळाला वरच्या बाजूला 3 छिद्र असतात त्या नारळामध्ये खडे मिठाचे 8 खडे टाकावेत.
7 लवंगा टाकाव्यात चिमूटभर त्यामध्ये मोहरी टाकावी
त्यामध्ये हळद आणि कुंकू चिमूटभर टाकावे. त्यांना लाल दोर्याने गुंडाळून दोऱ्याचे 11 वेढे घ्यावेत.. नारळावर भीमसेनी कापूर जाळावा जर नसेल तर साधा कापूर जाळावा.
ही क्रिया स्मशानाच्या बाहेर उभारून कापूर
त्या नारळावर पेटवावी ज्या व्यक्तीवर अनिष्ट शक्तींचा प्रभाव जाणवत आहे त्या व्यक्तीचे तोंड दक्षिण दिशेला करावे आणि झोप उतारा टाकणारा व्यक्ती आहे त्याचे तोंड उत्तर दिशेला असावे.
ही क्रिया उभे राहूनच करायची आहे..
आणि तो उतारा स्मशानात टाकून द्यायचा आहे.
दोघांनी घरी आल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून दोघांना आंघोळ करायची आहे.
आणि दोघांनी एक वेळेस कालभैरवाष्टक वाचायचा आहे. आपण हा प्रयोग केल्यानंतर नक्कीच आपल्याला चांगला अनुभव पाहायला मिळेल आणि नक्कीच आमच्यापर्यंत मग हा अनुभव पोचवाल ही अपेक्षा….
टीप – हा उतारा फक्त पुरुषांनी करायचा आहे. जर महिलांवर अनिष्ट प्रभाव जाणवत असेल तर त्यांच्या उतारा सुद्धा पुरुषांनी उतरून टाकायचा आहे…
पुरुषांच्या उतारा पुरुष उतरून टाकू शकतात….
हर हर महादेव..!!