मुली का बांधतात पायांमध्ये काळा धागा..?? जाणून घ्या श्रीमंत लोकांचं रहस्य..!!

पायांना बांधलेला काळा धागा हा आपल्या पर्यंत प्राचीन इतिहासामधून आला आहे. शास्त्रानुसार हा काळा धागा घालण्याचे / बांधण्याचे अनेक अध्यात्मिक फायदे आहेत.

विशेषतः, जेव्हा हा धागा पायांवर बांधलेला असतो तेव्हा तो धागा मनुष्याच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडवून आणत असतो. आपण पाहिलंच असेल आजही भारतीय संस्कृतीत एखाद्याच्या घरात मुलाचा जन्म होतो तेव्हा त्याच्या पायावर काळा धागा बांधण्याची प्राचिन प्रथा आहे. लोकांचा असा विश्वास आहे की हा धागा परिधान केल्यामुळे मुलांना वाईट नजर लागत नसते किंवा वाईट नजरेपासून त्यांच रक्षण होतं असतं.

आजकाल बहुतेकदा लोक फॅशन म्हणून हा काळा धागा वापरतात. त्याच वेळी, असे काही लोकही आहेत जे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून ते हा धागा वापरतात.

काळा धागा बांधण्यामागे वैज्ञानिक कारणं सुद्धा आहेत. आपले शरीर पाच घटक किंवा पंचतत्वांनी बनलेले आहे. हे पाच घटक पृथ्वी, वायू, अग्नि, पाणी आणि आकाश आहेत. त्यांच्यातील ऊर्जा आपले शरीर चालवते. या उर्जेमुळेच आपल्याला सर्व सुविधा मिळतात.

जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची वाईट नजर आपल्याला लागते तेव्हा या पाच घटकांमधून बाहेर पडणारी सकारात्मक उर्जा त्या निगेटिव्ह एनर्जी ला आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणूनच आपल्या गळ्यात काळ्या रंगाचा धागा बांधला जातो. जेणेकरून आपण आणि आपले कुटुंब वाईट नजरेपासून आपलं संरक्षण करु शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा घालण्याचे / बांधण्याचे बरेच फायदे आहेत. तथापि, याचा सकारात्मक प्रभाव मिळण्यासाठी हा धागा बांधताना काही गोष्टी सुनिश्चित केल्या पाहिजेत.

जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप आर्थिक समस्या येत असतील तर मंगळवारी तुमच्या उजव्या पायाला काळा धागा बांधावा. हळू हळू आपल्या सर्व पैशांशी संबंधित समस्या दूर होतील. घरात पैशांची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या आयुष्यात भरभराट होईल.

मित्रांनो तुम्ही जर गळ्यामध्ये काळा धागा बांधला तर त्यामुळे नजर लागण्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकत. या गळ्यातील धाग्यामध्ये तुम्ही एखाद लॉकेट सुद्धा लावू शकता. मित्रांनो अगदी प्राचीन काळापासून काळ्या रंगाचा उपयोग हा दृष्ट लागण्यापासून वाचवण्यासाठी करण्यात आलेला आहे.

हात, पाय, गळ्यात इत्यादींमध्येही हा काळा धागा घातला जातो, पुष्कळ लोक वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी सुद्धा हा काळा धागा वापरण्याची शिफारस करत असतात.

त्या धाग्यामध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते जेणेकरून वाईट उर्जा त्या व्यक्तीवर परिणाम करूच शकत नाही. आपल्याला इतरांच्या वाईट नजरे पासून स्वत:ला वाचवायचं असल्यास, आपण देखील हा काळा धागा परिधान करून वाईट नजरेपासून आपलं संरक्षण करू शकतात.

तसेच मित्रांनो याचा अजून एक फायदा असा कि ज्यांना शनीची साडेसाती आहे, किंवा ज्यांना वारंवार शनिदोष निर्माण होतात, कुंडली मध्ये शनिदोष आहे अशा लोकांसाठी सुद्धा काळा धागा अत्यंत महत्वाचं काम करतो. प्रत्येक शनिदोषापासून वाचवण्याचं काम हा काळा धागा करत असतो.

मित्रांनो अशाप्रकारे नजर लागण्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी प्रत्येकाने आपल्या पायामधे किंवा गळ्यामध्ये काळा धागा अवश्य बांधावा, आम्हाला आशा आहे कि हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असणार. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Comment