वापरा फक्त एक लिंबू आणि या वस्तु..!! मच्छर मुंग्या एका मिनिटात गायब होतील..!!

मित्रांनो, उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो या तिनही ऋतूंमध्ये माश्या, मच्छर, मुंग्या यांचा आपल्याला भरपूर त्रास होत असतो. यांच्यापासून सुटकेसाठी अनेक केमिकलयुक्त उपायांचा उपयोग आपण करतो.

ज्यामुळे घरातील लोकांना त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. घरातील लहान मुले, वृद्ध व्यक्ती, यांच्यावरही केमिकल युक्त औषधांचा परिणाम होतो. एवढंच नाही तर या औषधांचा अति प्रमाणामध्ये वापर झाल्याने देखील सर्दी, फुप्फुसाचे आजार होऊ शकतात. म्हणूनच आपलेही आरोग्य चांगले राहील मुंग्या तसेच माश्या, मच्छर किटक यांपासून आपला बचावही होईल.

असा हा घरगुती उपाय आपण आज पाहणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक लिंबू. मित्रांनो, आपण या ठिकाणी पिकलेले किंवा कच्चे कोणतेही लिंबू घेऊ शकतात. आपल्याला लिंबाचा रस सुद्धा लागणार नाही, तर आपल्याला लागणार फक्त या लिंबाची साल, तर आपण ही साल घ्यायची आहे.

मित्रांनो, ही साल आपण शक्य तेवढी बारीक करून घ्यायची आहे. यासोबतच दुसरी वस्तु आपल्याला लागणार आहे, लवंग आणि मिरी हे दोन्ही वस्तु आपल्याला लागतील. या दोन्ही वस्तु सुद्धा आपण चांगल्याप्रकारे बारीक करून घ्यायच्या आहेत.

याची तिखट चव, आणि उग्र वास या दोन्हींचाही उपयोग घरातील मुंग्या, माश्या, मच्छर घालवण्यासाठी जास्त प्रमाणात होतो. तसेच तिसरी वस्तु लागणार आहेळ ते म्हणजे मीठ, चौथी वस्तु म्हणजे कापूर किंवा कापराची केलेली बारीक पावडर, हे सर्व लागणार आहे.

लवंग आणि मिरी या दोन्हींची केलेली पावडर एक चमचामध्ये घ्यायची आहे. बारीक करुन घेतलेली लिंबाची साल ही एक चमचा लागणार आहे. दोन-तीन चिमुटभर कापराची पावडर आपण घ्यायची आहे. हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे.

तुम्हाला हवं तर पुन्हा परत एकदा बारीक करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तयार झालेले हे मिश्रण ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात मुंग्या, माश्या आणि डास आहेत त्या भागात हे टाकायचे आहे. किंवा स्प्रे करायचे आहे. तुम्ही कितीही प्रमाणात हे वापरु शकता.

माश्या आणि मच्छर कितीही असू द्या त्या घालवण्यासाठी हा उपाय एकदम परफेक्ट आहे. एवढेच नाही तर घरातल्या कोणत्याही भागात असणाऱ्या मुंग्या, माश्यांपासून बचाव करण्यासाठी मिश्रण पसरवून त्या जागेवरती टाकायचे आहे. अगदी झटके पट आणि लवकरात लवकर या मुंग्या आणि डास घालविण्यासाठी या औषधाची मदत होते.

तसेच किचनरूममध्ये जास्त प्रमाणात माश्या, मुंग्या असतील. घरात सर्वत्र एक दोन तीन किंवा अगदी थोड्याफार प्रमाणात मुंग्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही एक ते दिड लिटर पाण्यामध्ये हे मिश्रण मिक्स करून दहा मिनिट हे मिश्रण त्या पाण्यामध्ये तसेच ठेवावे. ते परत एकदा मिक्स करायचे आहे.

नंतर स्प्रेच्या सहाय्याने किंवा तुमच्या कडे जे काही उपलब्ध असेल त्याच्या साहाय्याने मुंग्यांचा वावर असलेल्या ठिकाणी या औषधांचा स्प्रे करावा. मित्रांनो या औषधाच्या वासाने आणि चवीने मुंग्या झटपट नाहीशा होतात. घरात देखील हे चांगल्या प्रकारे सुगंध येतो.

फ्रेश देखील वाटते. तुम्ही हे मिश्रण फरशी पुसत असताना सुद्धा वापरु शकतात. फरशी पुसण्याचा पाण्यात हे मिश्रण टाकून देखील फरशी पुसू शकता. घरात कुठेही आणि कितीही प्रमाणात असलेल्या मुंग्या नाहीशा होतात. घरात फ्रेश आणि चांगले वाटते.

अशा प्रकारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी मुंग्या, मच्छर, माश्या यांच्यापासून देखील सुटका करण्यासाठी हा घरगुती उपाय करा कायम फिट आणि निरोगी राहा. हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो, आम्ही जी पण माहिती तुम्हाला देतो किंवा जे उपाय आम्ही तुम्हाला आमच्या लेखातून सांगत असतो ते तुम्ही डॉक्टरांना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाहीत. त्यामुळे तेवढी दक्षता तुम्ही घ्यावी..!!

Leave a Comment