वरूथिनी एकादशी, घरामध्ये इथे लावा एक तूपाचा दिवा, 24 तासात मनोकामना पूर्ण होतील.!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की एका महिन्यात 2 एकादशी असतात आणि वर्षात 365 दिवसात फक्त 24 एकादशी असतात. अधिकमासामुळे दर तिसर्‍या वर्षी एकूण 26 एकादशी असतात. प्रत्येक एकादशी व्रताचे नाव आणि फळ शास्त्रात दिले आहेत. आज आपण जाणून घ्या वरुथिनी एकादशीने व्रताचे महत्त्व, पूजा विधी आणि ‍नियम. ही एकादशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला येते आणि त्याचबरोबर मित्रांनो एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. एकादशीचा दिवस भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे.

आणि मित्रांनो या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या सुटतात. जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे आणि मित्रांनो वरूथिनी एकादशीच्या दिवशी उपवास करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच व्रत कथा पाठ करणे किंवा श्रवण करणेही महत्त्वाचे आहे. भगवान विष्णूची पूजा करताना वरुथिनी एकादशी व्रताची कथा वाचा. काही कारणाने वाचता येत नसेल तर ऐका.

मित्रांनो या एकादशी तिथीला सकाळी सूर्योदयापूर्वी उठून नित्य कार्य आटपून अंघोळ करावी. नंतर व्रत संकल्प घ्यावं आणि त्यानंतर अक्षता, दीपक, नैवेद्य इत्यादी सोळा पदार्थांनी विधिवत भगवान विष्णूंची पूजा करावी आणि मग घराजवळ एखादे पिंपळाचे झाड असल्यास त्याची पूजा करुन त्याच्या मुळामध्ये कच्चे दूध अर्पण करावं व तूपाचा दिवा लावावा.आणि त्याचबरोबर शक्य नसेल तर तुळशी पूजन करावं. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपत राहावं आणि नंतर रात्री देखील भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी.

आणि त्याच बरोबर मित्रांनो या एकादशी दिवशी दिवसभर विष्णूंचे स्मरण करत राहावे तसंच रात्री पूजा स्थळी जागरण करावे.आणि त्यानंतर एकादशीच्या दुसर्‍या दिवशी द्वादशीला व्रत सोडावे. हे व्रत पारण मुहूर्तावर सोडावे. व्रत सोडल्यावर ब्राह्मण किंवा एखाद्या गरीब माणसाला अन्न द्यावे आणि त्याचबरोबर मित्रांनो ही वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, पापांचा नायपाट करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी आहे आणि वरुथिनी एकादशीचे फळ दहा हजार वर्षांपर्यंत तप करण्यासमान आहे. त्याचबरोबर वरुथिनी एकादशी व्रत पालन करणे म्हणजे कुरुक्षेत्रात सूर्यग्रहण दरम्यान एक मन स्वर्णदान करण्यासमान आहे.

वरूथिनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाला पोहचतो आणि मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये अन्नदान आणि कन्यादान हे सर्वात मोठे दान असल्याचे मानले गेले आहे. वरुथिनी एकादशीच्या व्रताने अन्नदान आणि कन्यादान या दोघांनाही समान फळ मिळते.
आणि या व्रताचे महात्म्य वाचल्यास हजार गायींचा दान केल्याचे पुण्य लाभतं. याचे फळ गंगा स्नानापेक्षा अधिक असल्याचे समजले जाते आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी खरबूज दान करावे. आणि मित्रांनो आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी या दिवशी आपण या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्या तुळशी समोर लावायचा आहे.

मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने संध्याकाळचे वेळी किंवा सकाळच्या वेळी ज्या वेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही या एकादशी दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीसमोर गायीचा तुपाचा दिवा जर लावला आणि तुळशी माते कडे म्हणून जी काही इच्छा आहे की मागितली तर यामुळे मित्रांनो तुमच्या मनामध्ये असणारी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण होईलच आणि त्याच बरोबर लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!