चांगले आरोग्य ही सकारात्मक आणि आनंदी राहण्याची तसेच समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे. वास्तु शास्त्रानुसार अग्नीदेव, अग्नि म्हणून ओळखले जातात.
भारतीय वास्तुकलेनुसार त्यांचं वास्तव्य घरामध्ये दक्षिण पूर्वेकडे असते आणि आपल्या किचन साठी ते एक आदर्श असे स्थान असते. तसेच यासाठी एक पर्याय घराची ईशान्य दिशा देखील असु शकेल.
आपल्या राहत्या जागेचे वास्तु हे अपणा सर्वांच्या आरोग्यासाठी आणि सर्वांगीण समृद्धी मिळविण्याकरिता असते; वास्तुनुसार बनवलेल्या रचनेमुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो आणि आरोग्य, संपत्ती आणि तसेच समरसता मिळते.
प्रत्येक घरात एक तरी किंवा इतरही वास्तू दोष असतात आणि वास्तु या संकल्पनेविषयी माहिती नसलेले बरेच रहिवासी त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या दीर्घ आ’जाराच्या मागचे कारणं त्यांना खरोखरंच कधीही समजत नाहीत.
काही घरांमध्ये चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्यामुळे, किंवा तज्ञांच्या सल्ल्यानुसार बांधकाम न केल्याने इतर अनेक वास्तू दोषांमुळे रो’गांचा वारसा हा मिळत असतो जो केवळ काही निवडक व प्रभावी उपायांनी नक्कीच बरा होऊ शकतो.
आपल्या व घरातील इतरांच्या आरोग्याला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काही वास्तु टिप्स –
झोपतांना नेहमीच आपण दक्षिण किंवा पूर्वेकडे डोकं करुन झोपायची सवय लावावी.
आरोग्यासाठी वास्तु सल्ला कधीही घरातील तुळईखाली झोपू नये तसेच बसूही नये.
कधीही जेवण करतांना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करूनच जेवण करावे.
एक आदर्श स्वयंपाकघर दक्षिण-पूर्वेकडे स्थित असायला हवे.
ईशान्येकडील स्वयंपाकघरात स्त्रियांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.
उत्तर-पूर्व म्हणजे वाहणार्या पाण्याची जागा आहे, म्हणून पाण्याचा एक तरी स्त्रोत येथे असायलाच हवा.
दक्षिण-पश्चिम भाग चांगल्या आरोग्यासाठी घरातील वृद्ध व्यक्तींना किंवा घराच्या मुख्य मालकासाठी राखीव असला पाहिजे.
शांत झोपेसाठी, मोबाइल फोन आणि इतर कोणतेही गॅझेट तुमच्या बेडपासून दूर ठेवा. तसेच झोपण्याच्या बेडच्या खाली लोखंडी सामग्री ठेवल्याने लोकांच्या आरोग्यास त्रास व्हायला सुरुवात होते.
घरामध्ये बांबूची रोपे वाढवणे अशुभ आहे, म्हणून तसे करण्याचे टाळावे.
घरात कधीही उघडलेले आरसे ठेवू नका आणि लॅपटॉप स्क्रीन तसेच टीव्ही स्क्रीन इत्यादींसह सर्वांना कव्हर करुन ठेवावे.
उत्तर-पूर्वेस हिरवा रंग हा शुभ असतो.
स्वयंपाकघर आणि शौचालय एकत्रितपणे तयार करणे टाळावे तसेच दोन्ही ठिकाणांचे एकमेकांपासून जास्तीत जास्त अंतर आहे याची खात्री करुन घ्यावी.
बांधकाम करताना जिन्याखाली ठेवलेल्या जागेचा वापर स्टोरेजसाठी केला पाहिजे परंतु स्वयंपाकघर, प्रसाधनगृह इत्यादी कोणत्याही जागा वापरण्यायोग्य जागा बनवू नका किंवा अडगळीच असं कोणतंही सामान तेथे ठेऊ नका.
स्वयंपाकघर आणि शौचालयाच्या एकदम वर किंवा खाली खोली किंवा इतर कोणतीही वापरण्याची जागा असू नये.
तुमचा झोपण्याचा बेड भिंतीपासून कमीतकमी तीन इंच अंतरावर तरी ठेवावा.
टिप- इथे कोणत्याही प्रकारची अं’ध श्र’द्धा पसरवणे हा आमच्या पेज चा हेतू मुळीच नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आम्ही आपल्या पर्यंत पोहचवतो आमचं पेज कोणत्याही प्रकारच्या अं’ध श्र’द्धेला खतपाणी घालत नाही.