ही आहेत सर्वात जास्त ऑक्सिजन देणारी झाडे..!!
मित्रांनो आपल्या शरीरासाठी ऑक्सिजन किती आवश्यक आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु कोणती झाडे सर्वात जास्त ऑक्सिजन बनवतात आणि कोणत्या वेळेपर्यंत बनवतात हे आपल्याला माहिती आहे का..??
आपल्या शरीरासाठी ऑक्सिजन किती आवश्यक आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु कोणतं झाडं सर्वात जास्त ऑक्सिजन बनवतं आणि किती काळ हे काम करतं हे आपल्याला माहिती आहे का..?? नाही ना..?? आज आम्ही तुम्हाला त्या झाडांबद्दल सांगणार आहोत जे वातावरणात सर्वाधिक ऑक्सिजन सोडतात.
सागरी वनस्पती: ( मरिन प्लांट्स ) –
पृथ्वीवरील बहुतेक जमीन किंवा भूभाग हा सागराने व्यापलेला असल्याने या सागरी वनस्पती पृथ्वीला सर्वाधिक ऑक्सिजन प्रदान करतात. असे म्हणतात की वातावरणात उपलब्ध असणाऱ्या ऑक्सिजनपैकी 70 ते 80 टक्के ऑक्सिजन या वनस्पतींद्वारे तयार होतो. ही झाडे जमिनीवरील झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन बनवतात.
गर्द हिरव्या पानांची झाडे –
आपल्या सर्वांना माहित आहे की झाडाची पाने हीच ऑक्सिजन तयार करण्याचं काम करतात. एका तासामध्ये पाने 5 मिली ऑक्सिजन बनवतात असे म्हणतात. म्हणून, ज्या झाडाकडे जास्त पाने आहेत ते ऑक्सिजन बनवतात.
पिंपळाचं झाड –
पिंपळाच्या झाडाचा विस्तार, आणि उंची खूप असते. अनेक धार्मिक भावनाही पिंपळाच्या झाडाशी निगडीत आहेत. असे म्हणतात की पिंपळाचं झाड रात्री सुद्धा ऑक्सिजन देते.
पिंपळाचं झाड इतर झाडांपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजन देते, दिवसातून एकूण 22 तासांपेक्षा जास्त ऑक्सिजन देणाऱ्या झाडांमध्ये पिंपळाचा सामावेश होतो.
बांबूचे झाड –
बांबूचे झाड हे सर्वात वेगाने वाढणारे झाड किंवा गवत आहे. त्याचा वाढण्याचा वेग खूप वेगवान आहे. बांबूच्या झाडाचा उपयोग हवा ताजी ठेवण्यासाठी देखील केला जातो. बांबूच्या झाड इतर झाडांच्या तुलनेत 30 टक्के जास्त ऑक्सिजन तयार करतं.
कडुलिंब, वटवृक्ष, तुळस –
पिंपळच्या झाडाप्रमाणेच कडुनिंब, वड आणि तुळस या वनस्पती देखील ऑक्सिजनची मात्रा मोठ्या प्रमाणात वातावरणास उपलब्ध करुन देतात. कडुनिंब, वटवृक्ष, तुळस ही झाडे दिवसात 20 तासांपेक्षा जास्त ऑक्सिजन तयार करतात.
पीस लिली –
वातावरण शांत करण्यासाठी आणि वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी पीस लिलीचा वनस्पती घरात लावला जातो. बरीच पाने असलेले हे झाड ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते.