विजया एकादशी.. श्री विष्णूंना अर्पण करा या वस्तू.. प्रत्येक कामात यश मिळणार.. पैसा तर एवढा येईल की..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. मित्रांनो 16 फेब्रुवारी गुरुवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे विजया एकादशी. हिंदू धर्मात या एकादशीचे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते. त्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आज आपण पाहणार आहोत विजय एकादशीचे महत्त्व आणि त्या दिवशी करण्याची काही खास उपाय जे केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी तर येतेच पण त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळते.

मित्रांनो शास्त्रानुसार जेव्हा माता सीतेचे अपहरण झाले तेव्हा त्यांना सोडवण्याकरता भगवान श्रीराम समुद्र मार्गाने रावणाच्या लंकेवर गेले पण हा समुद्र पार करायचा असताना त्यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न जेव्हा भगवान श्रीरामांपुढे पडला तेव्हा त्यांनी ऋषीमुनींना विचारलं की याच्यावर प्रभावी उपाय काय आहे तेव्हा ऋषीमुनींनी भगवान श्रीरामांना विजया एकादशीच्या व्रताची माहिती दिली. त्यांनी सांगितले की हे व्रत त्यांना सर्व कार्यांमध्ये यश मिळवून देईल.

ऋषीमुनींनी सांगितलेला हा उपाय ऐकून भगवान श्रीरामांनी आपल्या वानर सेनेसह विजया एकादशीचे व्रत करण्याचे ठरवले आणि या व्रताच्या प्रभावाने समुद्राने भगवान श्रीरामांना लंकेला जाण्याचा मार्ग दिला आणि रावणाचा वध करून भगवान श्रीरामांनी विजय मिळवला.

जो व्यक्ती हे व्रत करतो त्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळते. गेल्या जन्माचे तसेच या जन्माच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता प्राप्त होते. जर आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील.

बरेच प्रयत्न केल्यानंतर देखील या समस्या सुटत नसतील, त्यातून मार्ग निघत नसेल किंवा एखादं काम कितीही प्रयत्न केले तरी पूर्ण होत नसेल तर विजय एकादशीच्या दिवशी आपण काही खास उपाय केले तर त्यामुळे आपले प्रत्येक कार्य सिद्धीस जाते.

या दिवशी सकाळी स्नानादिनी निवृत्त झाल्यानंतर सूर्य देवांना अर्ध्य द्यायचे आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा अर्चना करायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत.

यामध्ये पिवळी मिठाई असेल पिवळ्या रंगाची फुले असतील पिवळे वस्त्र असतील अशा प्रकारे ज्या काही पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत त्या आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायच्या आहेत. धूप दीप प्रज्वलित करायचा आहे. 11 केळी 11 खजूर आणि 11 बदाम भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहेत.

मित्रांनो लक्षात घ्या 11 केळी 11 खजूर आणि 11 बदाम हे सर्व आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायच आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा शक्य तितका वेळा जप करायचा आहे.

मंत्र जाप झाल्यानंतर आपली जी काही समस्या आहे किंवा आपल्या ज्या कामात आपल्याला यश हव आहे. जे काम पूर्ण व्हावास आपल्याला वाटत आहे ते भगवान विष्णूंना बोलून दाखवायचे आहे.

आपल्या कार्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. या ज्या वस्तू आपण अर्पण केल्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी आपण प्रसाद रुपात ग्रहण करायच्या आहेत. आपल्या घरात जे सदस्य आहेत त्यांना देखील आपण प्रसाद म्हणून या वस्तू खाऊ घालायच्या आहेत.

मित्रांनो या एकादशीच्या नावावरूनच आपल्याला समजते की प्रत्येक कार्यामध्ये यश मिळवून देणारी विजय मिळवून देणारी ही एकादशी आहे. आपण विजया एकादशीला हे खास उपाय नक्की करा. काही दिवसांमध्येच तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तर अशा विशिष्ट कामात यश मिळवण्यासाठी विजय एकादशीला तुम्ही देखील हा उपाय अवश्य करा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment