Tuesday, February 27, 2024
Homeजरा हटकेविमानाच्या इंजिन मध्ये उड्डाणाच्या वेळीच अचानक लागली आग

विमानाच्या इंजिन मध्ये उड्डाणाच्या वेळीच अचानक लागली आग

वॉशिंग्टन डी सी , 21 फेब्रुवारी : या दिवशी अमेरिकेत मोठा विमान अपघात होता होता टळला. डेनवरहून होनोलुलु जाणारे बोइंग 777 या विमानाच्या इंजिनमध्ये उड्डाणाच्या काही वेळातच अचानक आग लागली. या विमानाच्या इंजिनमध्ये ज्यावेळी आग लागली त्यावेळी विमान मात्र 15 फूट उंचीवर होतं. परंतु विमानाच्या वैमानिकाच्या तत्परतेमुळे मोठा अपघात होता होता टळला आहे. वैमानिकाने त्वरित कंट्रोल स्टेशनमध्ये मेसेज करून पुन्हा डेनवरमध्ये विमानाचं लँडिंग केलं. या विमानात एकूण 231 पॅसेंजर्स आणि 10 क्रू मेंबर्सही होते.

या घडलेल्या घटनेच्या तपासणीसाठी नॅशनल ट्रान्सपोर्ट सिक्योरिटी बोर्डने (NTSB) एक टीम तयार केली आहे. विमानाचा मलबा मोठ्या भागात, मोठ्या प्रमाणात पसरला आहे. पोलिसांनी लोकांना या मलब्याला हात न लावण्याचं, तसंच त्या भागात न फिरण्याचंही आवाहन केलं आहे.

या विमानाच्या इंजिनाला आग लागल्यानंतर विमानात एकच हळबळ उडाली होती. परंतु वैमानिकाने मोठ्या हिंमतीने या सगळ्याचा सामना करत यशस्वी रित्या तसंच सुरक्षित लँडिंग केल. याचदरम्यान एका प्रवाशाने जळत्या इंजिनाचा व्हिडीओ काढला व सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

बोइंग 777 हे विमान 26 वर्ष जुनं आहे. यात दोन प्रॅट अँड व्हिटनी PW4000 या क्षमतेचे इंजिन लावण्यात आलेले होते. या सारखा अपघात फेब्रुवारी 2018 मध्येही घडला होता . तेव्हा सुद्धा बोइंग 777 च्या एका जुन्या विमानाचं इंजिन फेल झालं होतं. त्यावेळी देखील अतिशय कमी वेळात सुरक्षित लँडिंग करण्यात आलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स