Vish Yoga In Kumbh Sign सव्वा दोन दिवस कुंभ राशीत असेल विष योगाची स्थिती.. या 3 राशींच्या जातकांनी सांभाळून राहावं..

Vish Yoga In Kumbh Sign सव्वा दोन दिवस कुंभ राशीत असेल विष योगाची स्थिती.. या 3 राशींच्या जातकांनी सांभाळून राहावं…

(Vish Yoga In Kumbh Sign) नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… कुंभ राशीत शनि आणि चंद्राची युती होत आहे. या युतीमुळे विष योग तयार होणार आहे. सव्वा दोन दिवस कुंभ राशीत युती होत असल्याने तीन राशीच्या जातकांनी सांभाळून राहावं लागेल.

ज्योतिषशास्त्र हे ग्रह, नक्षत्र आणि 12 राशींवर अवलंबून आहे. कारण ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती खूप काही सांगून जाते. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा (Vish Yoga In Kumbh Sign) सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. तर शनि हा मंद गतीने म्हणेज अडीच वर्षाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.

आता अवघ्या काही तासात चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कुंभ राशीत चंद्र आणि शनिच्या युतीमुळे विष योग तयार होणार आहे. हा योग सर्वात अशुभ योग म्हणून गणला जातो. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना नकारात्मक परिणाम भोगावे लागणार आहेत.

चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत 6 जुलै 2023 रोजी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी प्रवेश करेल.कुंभ राशीत शनि असल्याने विष योग तयार होणार आहे. चंद्र मीन राशीत दुपारी 2 वाजून 57 मिनिटांनी प्रवेश करेल. हा विष योग 8 जुलै 2023 रोजी (शनिवार) योग (Vish Yoga In Kumbh Sign) संपुष्टात येईल. तीन राशींच्या जातकांनी सव्वा दोन दिवस सांभाळून राहणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत त्या…

हे सुद्धा पहा : Aquarius Horoscope अतिशय बुद्धिमान असतात कुंभ राशीचे लोक.. जाणून घ्या कसा असतो त्यांचा स्वभाव.?

या तिन राशींच्या जातकांन सांभाळून राहावं लागणार..

कर्क रास – या राशीच्या जातकांना सव्वा दोन दिवस सांभाळून राहावं लागेल. कारण या राशीवर शनिच्या अडीचकीचा प्रभाव आहे. त्यामुळे या काळात अडचणीत वाढ होऊ शकते. (Vish Yoga In Kumbh Sign) या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार आहे. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. गुंतवणूक करताना काळजी घ्या अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो.

कन्या रास – या राशीच्या जातकांनाही कठीण प्रसंगाला समोरं जावं लागेल. नोकरीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागवलं जाईल. इतकंच काय आरोपही होऊ शकतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी जपून वागा. विनाकारण पैसे खर्च करू नका. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शक्यतो लांबचा प्रवास टाळा. अपघात होण्याची शक्यता आहे.

मीन रास – शनि आणि चंद्राच्या युतीमुळे या राशीच्या जातकांना सव्वा दोन दिवस त्रासाचे जातील. या कालावधीत विनाकारण वाद होऊ शकतो. (Vish Yoga In Kumbh Sign) तसेच चोरीची भीतीही राहील. त्यामुळे घरातील पैसे आणि ऐवज जपून ठेवा. इतकंच काय तर ऑनलाईन अमिषाला बळी पडू नका. या काळात उधारीने पैसे देऊ नका. साडेसातीचा काळ असल्याने अधिक जपून राहावं लागेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!