विवाहित महिला घरी एकट्या असतांना करतात ही कामं, याबाबत तर घरातील कुणालाही नसते कल्पना..!!

लग्नानंतर जवळ जवळ सर्वच महिलांवर बर्‍याचशा जबाबदाऱ्या असतात. लग्नानंतर कोणतीही स्त्री आपल्या घरगुती जीवनात इतकी व्यस्त होऊन जाते की तिला तिच्या आवडीचे कोणतेही काम करता येत नाही. पण लग्नाआधी त्यांना अडवणारे कुणीही नसते आणि त्या त्यांच्या मनाप्रमाणे सर्व करत असतात.

म्हणून जेव्हा एखाद्या महिलांना घरात एकटे राहण्याची संधी मिळते तेव्हा त्या हवं ते करू शकतात. अशा वेळी त्यांना त्यांचे सर्व छंद आठवतात आणि शांतपणे त्याचा पाठपुरावा करतात. घरात एकटं असताना स्त्रिया अजून काय करतात हे आपल्याला माहिती आहे का? चला तर मग आज आपण शोधूयात..

विश्रांती घेणे –
बहुतेक विवाहित महिला सकाळी लवकर उठतात आणि दूपारपर्यंत त्यांच्या कामात अगदी व्यस्त असतात. कारण त्यांच्यावर बर्‍याच घरगुती जबाबदाऱ्या असतात. अशा परिस्थितीत जेव्हा कोणतीही स्त्री घरात एकटी असते तेव्हा दुपार नंतर त्यांना आराम करायला जास्त आवडते.

नव नवीन कपडे ट्राय करुन पाहणे –
प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसणे मचळातच आवडत असते. म्हणूनच जेव्हा जेव्हा एखादी स्त्री घरात एकटीच असते तेव्हा ती नव – नवीन कपडे परिधान करते. विशेषत: ज्या महिलांना घरात जीन्स आणि फॅन्सी कपडे घालण्याची परवानगी नसते, त्या स्त्रिया एकटे असतात तेव्हा या सर्व गोष्टी नक्कीच वापरुन पाहतात.

सौंदर्य उपचार –
महिलांना आपला चेहऱ्याचा लूक उजळ बनवायला आवडते. म्हणून जेव्हा जेव्हा त्यांना घरातील इतर कामातून वेळ मिळतो तेव्हा त्या त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी सौंदर्य उपचारांचा वापर करताना दिसतात.

फोनवर तासन् तास बोलत बसतात –
आपल्या सर्वांना माहित आहे की स्त्रियांना गप्पा मारणे खुपच आवडते. अशा परिस्थितीत जेव्हा त्या घरी एकट्या असतात तेव्हा त्या त्यांच्या नातेवाईकांशी किंवा इतर मित्र मैत्रिणींशी फोनवर तासनतास बोलत असतात.

मैत्रिणींबरोबर पार्टी –
बऱ्याच प्रगत महिला नातेवाईक किंवा मैत्रिणींना आमंत्रित करून घरात एकट्या असतात तेव्हा एखादी छानशी पार्टी अरेंज करतात. इतर दिवशी त्यांचा नवरा आणि सासरे घरी असल्यामुळे त्यांना अशी पार्टी करता येणार नसते. म्हणून त्या मैत्रिणींसह बाहेर आउटींग करण्यासाठी वेळ घालवतात.

डांस –
अशा अनेक अशा स्त्रिया देखील आहेत ज्यांना नृत्याची फार आवड असते. पण घरात सासू-सासरे असल्या कारणाने त्या त्यांच्या छंद व आवडींवर नियंत्रण ठेवतात पण घरी कोणी नसताना त्या त्यांच्या आवडत्या सॉंगवर मनसोक्त डांस करतात.

आवडता खाद्यपदार्थ बनविणे –
घरात इतर वडीलधारी माणसे असल्याने त्या सामान्य दिवसांत त्यांच्या आवडीचे पदार्थ शिजवू शकत नाही. पण जेव्हा त्या एकट्या असतात तेव्हा आवडते पदार्थ बनवून खाण्यात गुंग असतात.

Leave a Comment