वृश्चिक रास ऑगस्ट 2022 या घटना 100% घडणार म्हणजे घडणारच.!!


मित्रांनो प्रत्येकाची एक राशी असते. या राशीवरून आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी घडणार आहेत आपले जीवन कसे असणार आहे? तसेच आपल्यासाठी काय शुभ व अशुभ असणार आहे याची सर्व माहिती आपणाला राशिभविष्य मध्ये कळते. कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे आणि ती स्थिती आपल्यासाठी फायदेशीर असणार आहे का नाही याची उत्सुकता सर्वांनाच असते. तर मित्रांनो ऑगस्ट महिना वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे याबद्दलची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह या महिन्यात तुमच्या शेष्ठ स्थानातून प्रवास करत आहे. पत्रिकेतील या शेष्ठ स्थानाला आपण नकारात्मकतेचे स्थान मानतो. 10 ऑगस्ट रोजी तो राशी परिवर्तन करून तो तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करेल. परंतु वृश्चिक राशीच्या लोकांना शेष्ठ स्थान देखील खूप चांगले मानवते. तुमच्या कर्तुत्वाला अनेक चांगल्या संधी मिळतात. शुभकार्य देखील घडून येतात.

ऑगस्ट महिन्यात वृश्चिक राशींच्या लोकांना वाहन योग तसेच वास्तू योग जाणवत नाही. तसे पाहायला गेले तर या वस्तू आपण दररोज घेत नाही. त्यामुळे तुम्ही जर यापैकी कोणत्याही जर वस्तूंची खरेदी करणार असाल तर तुम्ही या महिन्यांमध्ये खरेदी करू नका. थोडंसं थांबून तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता. वृश्चिक राशीतील लोकांनी आपल्या आईच्या तब्येतीची आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

शिक्षणाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर हा काळ वृश्चिक राशींच्या लोकांना उत्तम जाणवतो. कारण तुमचे पंचमेश गुरु महाराज हे पंचम स्थानात विराजमान असल्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ अतिउत्तम वृश्चिक राशींच्या लोकांना असणार आहे. या वृश्चिक राशीतील अनेक व्यक्तींना खूप शिक्षण घ्यावेसे वाटेल किंवा अनेक नवनवीन गोष्टी शिकाव्याच्या वाटत असतील तर या काळात याची सुरुवात केली तर हे खूपच उत्तम होईल. वेळेचा सदुपयोग करून नक्की घ्या. जर आपल्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केले आणि या प्रयत्नाबरोबरच आपल्याला भाग्याची देखील साथ मिळाली तर ते आपल्यासाठीच फायदेशीर ठरते. हा काळ वृश्चिक राशींच्या व्यक्तींना शिक्षणासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.

सहा ऑगस्ट नंतर उपवर वर वधूंचे विवाह जुळण्याचे योग निर्माण होतील. अनेक अविवाहित तरुण तरुणींचे विवाह या काळामध्ये जुळण्याचा योग आहे. संतती च्या दृष्टीने हा काळ वृश्चिक राशींच्या लोकांसाठी समाधानकारक असेल. तुमचे संतान हे प्रगतीकडे वाटचाल देखील करेल आणि याचा आनंद तुम्हाला फार होईल.

आरोग्य, कर्ज, स्पर्धक, मित्र, शत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा एक लाभदायी व प्रगतिशील काळ आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या समस्या वृश्चिक राशीतील लोकांना या काळामध्ये जाणवणार नाहीत. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हटले गेलेले आहे. तसे तर वृश्चिक राशींच्या लोकांसाठी कोर्टाचा अडखळलेला निकाल या राशींच्या बाजूने लागण्याचा योग संभवतो. परंतु यामध्ये तुमची बाजू ही योग्य असणे गरजेचे आहे.

अपेक्षितपणे एखादी गोष्ट घडने किंवा अ’ पघात होणे या गोष्टी देखील वृश्चिक राशींच्या लोकांना या काळामध्ये जाणवतील. त्यामुळे आपल्या वाहनांचा वेग हा थोडासा कमी ठेवणे गरजेचे आहे. नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ वृश्चिक राशींच्या लोकांसाठी अतिशय संघर्षमय असणार आहे. अनेक वेगवेगळ्या घडामोडींचा सामना या राशीतील लोकांना करावा लागणार आहे. नोकरी करत असणाऱ्या व्यक्तींना अनेक नवनवीन प्रश्न यांचा सामना करावा लागणार आहे. एक दिवस आनंदाचा तर दुसरा दिवस हा संघर्षाचा असणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने या काळामध्ये वृश्चिक राशींच्या लोकांसाठी वृद्धी देणारा काळ असेल. काही अनेक खर्च या व्यवसायामध्ये करावा लागणार आहे. तसेच अचानक भाग्योदय देखील होऊ शकतो. म्हणजेच व्यवसायामध्ये तुम्हाला अचानक मोठा फायदा देखील होऊ शकतो.

17 ऑगस्ट रोजी वृश्चिक राशीतील करमेश रवी ग्रह कर्म स्थानात पोहोचून विशेष असे शुभ संकेत निर्माण करेल. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी लाभेश हा लाभात असेल. एकूणच वृश्चिक राशीतील लोकांसाठी अनेक शुभ संकेत या महिन्यात मिळणार आहेत. सहा ऑगस्ट रोजी सप्तमेश भाग्यात असेल त्यामुळे तुमच्या जोडीदारांकडून अनेक भाग्योदयाच्या संधी प्राप्त होणार आहेत. वीस ऑगस्ट रोजी तुमचा लाभेश हा लाभस्थानी प्रवेश करेल. 17 ऑगस्ट रोजी करमेश कर्मस्थानी प्रवेश करेल. त्यामुळे सहाजिकच तुमच्या लाभात मोठी वृद्धी घडून येईल. या राशीतील लोकांनी फक्त कर्म करत राहायचे आहे. लाभ आपोआप मिळत जाईल.

या काळामध्ये या राशीतील लोकांना अनपेक्षित पणे खर्चाचे योग निर्माण होतील. हॉस्पिटल बाबतीत तुम्हाला मोठा खर्च देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमची मानसिक स्थिती तशी ठेवा. जे लोक परदेशात आहेत त्यांना प्रमोशन होऊ शकते. तसेच जे व्यवसाय करत असतील त्यांच्या व्यवसायामध्ये खूप मोठा विस्तार होण्याचा योग संभवतो. तसेच अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा जोपासलेली असेल अशा विद्यार्थ्यांना अनेक संधी प्राप्त होतील. तरी या संधीचे सोने नक्की करून घ्या. 6, 14 व 24 हे दिवस वृश्चिक राशीतील लोकांसाठी खूपच तणावाचे राहतील. 8, 16 व 26 ऑगस्ट हे दिवस शुभ राहतील.

या शुभ व अशुभ दिवसांवर या राशीतील लोकांनी आपल्या कामाचे नियोजन लावावे. ज्योतिष शास्त्रामध्ये राशीनुसार करावयाचे उपाय सांगितलेले आहेत. या उपायांमुळे मित्रांनो अशुभ आपल्या राशीतून जाऊन शुभ प्राप्त होते. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आलेली आहे. तर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधत असताना प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या समृद्धीसाठी या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे.

येन बद्दो बळीराजा दानवेनद्रो महाबल
तेनत्वाम प्रति बद्धनामी रक्षे माचल- माचल

किंवा आपल्या भावाच्या राशीचा जो काही मंत्र असेल त्या मंत्राचा दररोज जप करावा.

म्हणजेच ज्यांच्या भावाची वृश्चिक रास असेल त्यांनी
ओम क्रां क्रिं क्रौं स: भौमाय नमः

या मंत्राचा जप करावा. वृश्चिक राशीतील व्यक्तीने या मंत्राचा जप दररोज केला तरीही चालतो. तर अशा प्रकारे ऑगस्ट महिन्यातील ऋषिक राशीतील लोकांचा राशीयोग म्हणजेच त्यांचे जीवन असे असणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!