व्यवसाय आणि धंद्यामध्ये बरकतीसाठी करा वास्तुशास्त्रातील हे सोपे उपाय..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येकाची अशी इच्छा असते की त्यांची त्याच्या व्यवसायामध्ये कारभारामध्ये, रोजगारामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी. त्यांच्या सर्व कामांमध्ये कार्यामध्ये चारही बाजूंनी त्यांना यश मिळावे व व्यवसाय वृद्धिंगत व्हावा.

मित्रांनो परंतु होते काय बरेच प्रयत्न करुन देखील आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळत नाही. वारंवार नुकसान सहन करावे लागते. हवीतशी आपल्या धंद्याची किंवा व्यवसायाची प्रगती होत नाही.

त्याचसाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये बरेच असे काही उपाय सांगितलेले आहेत. त्याचा उपयोग करून आपण आपल्या धंद्यामध्ये बरकत आणू शकतो.

आपला व्यवसाय, कारभार, रोजगार वाढवण्यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यातील काही उपाय आपण पाहणार आहोत. हे उपाय कोणकोणते आहेत ते पुढीलप्रमाणे…

सर्वात महत्त्वाचा व प्रभावशाली उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीला नैवेद्य म्हणून जे दाखवतो.

तेच चणे आणि गूळ प्रसाद म्हणून सर्व लोकांना वाटावा. त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होतील व सर्व बाजूंनी त्यांची आपल्यावर कृपादृष्टी होईल.

दुसरा उपाय म्हणजे बुधवारच्या दिवशी बासमती तांदळाचे एक वाटी दान गरजू लोकांना द्यावी. त्यामुळे बुध ग्रह व लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल व त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर राहील.

तिसरा उपाय म्हणजे मित्रानो बर्‍याच वेळेला असे होते की आपण खूप प्रयत्न करून देखील निश्चित असे ध्येय आपल्याला साध्य होत नाही.

त्यावेळी घाबरून न जाता कोणत्याही मंदिरांमध्ये लावलेल्या तुळशी भोवतीचे गवत गुरुवारी काढून एका कापडामध्ये बांधावे.

आणि आपल्या धंद्याच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या ऑफिसमध्ये  देवाच्या फोटो जवळ कपडे ठेवावे व रोज सकाळ संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी धूप अगरबत्ती लावून ओवाळावे असे केल्याने धंद्यात निश्चितच यश मिळते.

चौथा उपाय म्हणजे शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारी माता लक्ष्मीचे ध्यान करून नामस्मरण करून हिरव्या कापडामध्ये बांधून वाहत्या पाण्यामध्ये सोडावे असे केल्याने धनलाभ होण्यास मदत होते.

पाचवा उपाय म्हणजे घरातील कर्त्या व्यक्तीने जेवण करताना आपल्या ताटातील एक घास काढून कुत्र्याला किंवा पक्ष्यांना किंवा गाईला द्यावा.

आपल्याला शक्य असेल त्या प्राण्याला हा घास द्यावा. नियमितपणे असे केल्याने आपल्या पितरांचा व देवाचा शुभ आशीर्वाद मिळाल्यामुळे सर्व कामात यश येईल.

मित्रांनो यातील अनेक उपाय करून आपल्या नोकरी व्यवसायात उद्योग-धंद्यात यश संपादन केलेले आहे आपणही याचा लाभ घेऊ शकता.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment