वास्तु शास्त्रानुसार या प्राण्यांची चित्र घरात कधीही लावू नये..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय सामंजस्य आणि समृद्ध जीवन जगणारे विज्ञान आहे जे आपल्या सभोवतालच्या नकारात्मक गोष्टींना दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवते. वास्तुमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या वास्तुसाठी तसेच सुरक्षीततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं.

कधी कधी भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरते. स्वयंपाक घरात तसेच बेडरूम मध्ये काही दोष असल्यास आरोग्यावर परिणाम होतो. आज जाणून घेऊया काही वास्तू टिप्स ज्यामुळे तुमच्या वास्तुतील असे दोष दूर होतील.

वास्तूचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. घरातील फोटो आणि वस्तू अतिशय काळजीपूर्वक ठेवल्या पाहिजेत कारण घरात चुकीच्या दिशेने ठेवलेल्या गोष्टी नुकसान करू शकतात. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की काही प्राण्यांची फोटो घरात ठेवू नयेत. काही लोक घर सजवण्यासाठी घरात प्राण्यांची फोटो लावतात, ज्याचा घरातील लोकांवर शुभ आणि अशुभ परिणाम होतो.

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती… या ओळी आपण अनेकदा ऐकतो आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशीलही राहतो. या धकाधकीच्या जीवनात बाहेरून घरी आल्यानंतर शांतता लाभावी, मन प्रसन्न राहावे, सौख्यप्राप्ती व्हावी, यासाठी मनापासून घर सजवले जाते.

घर नवीन असो वा वडिलोपार्जित त्याचा कोपरा अन् कोपरा कसा असावा, कसा दिसावा, याकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रत्येक कुटुंब आपल्या आवडीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे घराची सजावट करत असतात. घराची सजावट करताना असंख्य गोष्टींचा अंतर्भाव केला जातो. अनेकांना विशिष्ट प्रकारचे फोटो, पेंटिग्ज लावण्याचा, काही खास मूर्ती स्थापन करण्याचा छंद असत.

घरात लावल्या जाणारे फोटोज, पेंटिंग्ज, यासंदर्भात वास्तुशास्त्रात काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. नेमक्या कोणत्या प्रकारचे फोटो घरात लावावेत, त्याचा वास्तुवर काय परिणाम होतो, यावर वास्तुशास्त्र प्रकाश टाकते. काही फोटो व चित्रे घरातील सुख, शांतता, धनवृद्धी, भाग्य, समृद्धी वृद्धिंगत होण्यासाठी सहाय्यभूत ठरतात, असे सांगितले जाते.

आज आम्ही तुम्हाला काही प्राण्यांबद्दल सांगत आहोत ज्या प्राण्यांचे फोटो घरात लावू नये. प्राण्यांशिवाय पौराणिक चित्रेही घरात ठेवू नयेत. जाणून घेऊया कोणती आहेत ती छायाचित्रे …

हे फोटो घरात ठेवताना काळजी घ्या
वास्तुशास्त्रानुसार, कबूतर, घुबड, गरूड आणि गिधाड या पक्ष्यांची चित्रे घरात ठेवू नयेत. पौराणिक ग्रंथानुसार कबूतर, घुबड, गरूड आणि गिधाड या पक्ष्यांची छायाचित्रे भिंतीवर लावले जाऊ नये, असे मानले जाते कारण या पक्ष्यांची चित्रे लावणे घरासाठी अशुभ असते.

कधीकधी, आपण रोमांचक होऊन, घरात सापाचे चित्र लावतो, परंतु वास्तुशास्त्रानुसार साप किंवा यासारख्या प्राण्यांची चित्रे, घरात ठेवू नयेत कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा येते. घरात अशांती आणि अस्वस्थता निर्माण होते. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होतात.

वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे की मांजर, उंट, सिंह आणि लांडगा यासारख्या प्राण्यांचे चित्र घरात ठेवू नये. वास्तुनुसार, सिंह, चित्ता इत्यादी वन्य प्राण्यांची छायाचित्रे घरात कधीही ठेवू नयेत. विशेषतः ती चित्रे तुमच्या घरात अजिबात लावू नयेत, ज्यात प्राणी शिकार करत आहेत किंवा हिंसक मुद्रेत आहेत.

असे म्हटले जाते की जंगली प्राण्यांची चित्रे लावल्याने घरातील सदस्यांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढते. अशी चित्रे घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते. त्याचा घरातील लोकांवरही नकारात्मक परिणाम होतो. यामुळे एकमेकांबद्दल द्वेषाची भावना वाढते.

घरात महाभारत युद्धाची चित्रे लावणे शुभ मानले जात नाही, याशिवाय ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रांची चित्रेही घरात ठेवू नयेत. वास्तुशास्त्र महाभारत आणि रामायण या प्राचीन महाकाव्यांची युद्धचित्रे ठेवण्याची परवानगी देत ​​नाही. भारतीय संस्कृतीत महाभारत हा पवित्र ग्रंथ मानला गेला आहे.

महाभारताची मोहिनी युगांनंतरही आपल्यावर असलेली पाहायला मिळते. महाभारत युद्ध हा, तर अनेकांच्या अभ्यासाचा विषय. याच महाभारत युद्धाचे सुप्रसिद्ध चित्र अनेकांच्या घरी लावलेले आपल्याला पाहायला मिळते किंवा अनेकांची तशी इच्छा असते. मात्र, वास्तुशास्त्रानुसार, महाभारत युद्धाचा फोटो घरात लावू नये, असे सांगितले जाते. महाभारत युद्ध कलह आणि हिंसेचे प्रतीक आहे.

त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या गाजलेल्या या महाभारत युद्धाच्या चित्राचा वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कुटुंबात कलह, वाद वाढू शकतात, असे सांगितले जाते. अशा चित्रांमुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात आणि घरात कलह निर्माण होतो.

यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण वाढीस लागते. नातेसंबंधात कटुता निर्माण करणाऱ्या घटना घडू शकतात. यामुळे नकारात्मता वाढीस लागण्याची शक्यता असते. एकूण घरावर आणि कुटुंबावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जाते.

हे लक्षात ठेवा की घरात रडणाऱ्या लोकांची आणि भुतांची चित्रे लावणे अशुभ मानले जाते. अशा चित्रांमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. यामुळे कुटुंबातील सदस्यांबद्दल द्वेषाची भावना वाढते. दररोज वेगळा दिवस आणि वेगवेगळ्या घटनांमधून माणूस आपले जीवन व्यतीत करत असतो.

मात्र, घरातील अनेक गोष्टी माणसाला सकारात्मक आणि आशावादी राहण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. वास्तुशास्त्रानुसार, घरात हसऱ्या चेहऱ्यांची चित्रे लावणे फायदेशीर मानले जाते. अशा चित्रांमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभाव वाढीस लागतो.

नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. यामुळे एकूण कौटुंबिक वातावरण उत्तम राहते. मानसिक प्रसन्नता लाभते. कुटुंबातील सदस्य आनंदी राहण्यास या प्रकारचे चित्र सहाय्यक ठरतात. घरातील वातावरण प्रफुल्लित राहते. कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभण्यास मदत होते, असे सांगितले जाते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment