Saturday, June 10, 2023
Homeवास्तूशास्त्र आणि वास्तू दोषवास्तुशास्त्र सांगते तिजोरीचा दरवाजा या दिशेने असेल तर नशीब जोरदार चमकेल.!! जाणुन...

वास्तुशास्त्र सांगते तिजोरीचा दरवाजा या दिशेने असेल तर नशीब जोरदार चमकेल.!! जाणुन घेऊया तिजोरी ठेवण्याचे शुभ मुहूर्त आणि योग्य दिशा..!!

वास्तुशास्त्राचे काही विशेष नियम आहेत, ज्याचा अवलंब करून आपण अनेक प्रकारच्या समस्या टाळू शकतो. या उपायांमुळे घरावरील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते.

तिजोरी दक्षिणेकडील भिंतीपेक्षा कमीतकमी एक इंच पुढे ठेवली पाहिजे आणि आग्नेय कोपऱ्याला तर अजिबात ठेऊ नये. त्याची मागील बाजू दक्षिणेला असावी आणि दरवाजा उत्तरेकडे उघडावा.

वास्तुशास्त्रानुसार घरातील लॉकर किंवा तिजोरीचे दरवाजे नेहमी उत्तर दिशेला उघडले पाहिजेत. कारण उत्तर दिशा ही संपत्तीची देवता कुबेरची दिशा मानली जाते.

तिजोरी ठेवण्याच्या खोलीला फक्त एकच प्रवेशद्वार असावे आणि ते दोन दरवाजांचे असावे. या खोलीत दक्षिण व पश्चिम दिशेला कधीही दरवाजा असू नये.

जर तिजोरीच्या खोलीचे दरवाजे पूर्व किंवा उत्तर दिशेला असतील तर ते खूप शुभ मानले जाते. तिजोरी दरवाजासमोर उत्तर बाजूला ठेवू नये.

या खोलीत पूर्व किंवा उत्तर दिशेला थोड्या उंचीवर एक लहान खिडकी असणे आवश्यक आहे.

तिजोरीसमोर देवाचे कोणतेही चित्र नसावे. देवाचे चित्र पूर्व किंवा पश्चिम दिशेस भिंतीवर लावावे.

जर तिजोरी पश्चिम दिशेला ठेवली गेली आणि त्याचे तोंड आग्नेय दिशेस असेल तर पैसा टिकत नाही. पाय नसलेल्या तिजोरी किंवा कपाटात पैसे ठेवू नयेत.

तिजोरी नेहमीच सपाट पृष्ठभाग असलेल्या जागी ठेवावी. जागा असमतल असेल तर तिजोरीला हलण्यापासून रोखण्यासाठी, वीट आणि दगडाऐवजी लाकडी फळीचा आधार द्यावा.

कोणत्याही धातूवर तिजोरी ठेवणे अशुभ मानले जाते. जर कपाट असेल तर त्याच्या मध्यभागात किंवा वरच्या भागात तिजोरी बनवावी.

शक्यतोवर कपडे, भांडी, फाईल इत्यादी तिजोरीत ठेवू नयेत. पैश्यांवर कोणताही भार टाकू नका. स्प्रे, अगरबत्ती सारखे सुगंधी पदार्थ तिजोरीत ठेवू नयेत. या वस्तू अर्थार्जनात अडथळे निर्माण करतात. तिजोरीत खडखडाट सुरु होते.

तिजोरी ठेवण्याचे शुभ मुहूर्त –
तिजोरी ठेवण्याचे श्रावण, धनिष्ठा, स्वाती, पुनर्वसु, शतभीषा, उत्तरा, रोहिणी हे शुभ नक्षत्र आहेत.

तसेच सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे सर्वोत्तम दिवस आहेत. तिजोरीच्या खोलीचा पिवळा हा सर्वोत्तम रंग आहे. यामुळे संपत्तीत अधिकपटीने वाढ होते.

उत्तर दिशेची मुख्य देवता कुबेर आहे. कुबेराचा ग्रह बुध आहे, म्हणून कृष्ण पक्षाच्या बुधवारी सकाळी किंवा संध्याकाळी तिजोरीची पूजा केली पाहिजे.

मार्गशीर्ष महिन्यातही तिजोरीची पूजा प्रत्येक गुरुवारी आणि शुक्रवारी करावी. तिजोरीच्या कोणत्याही बाजूला किंवा कोपऱ्यात कुठेही कोळ्याचे जाळे नसावे.

कोळ्यच्या जाळ्यामुळे घरात गरिबी येत असते.
तिजोरीच्या खोलीतील फरशीचा रंग काळा, लाल किंवा निळा नसावा आणि मुख्य म्हणजे तिजोरी कोणत्याही बीमखाली(वासा) ठेवली जाऊ नये.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारित एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स