मित्रांनो, प्रत्येक विवाहित स्त्रिला आपला पती खुप प्रिय असतो. त्यामुळे त्याच्या दीर्घायुष्यासाठी भारतातील प्रत्येक स्त्री वटसावित्रीचं व्रत करत असते. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा हा सण विवाहित स्त्रियांसाठी मोठा महत्त्वाचा मानतात. यावर्षी वटपौर्णिमा हा सण 24 जून 2021, गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे.
आपल्या पारंपारिक पद्धतीनुसार ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीपासून तीन दिवस उपवास ठेवून वट सावित्रीचं व्रत केले जाते. मात्र, आजकाल अनेक स्त्रियांनी घर, संसार आणि करियर यांच्यामध्ये स्वतःला झोकून दिले आहे, त्यामुळे केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास तसेच वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
यंदा वट सावित्री व्रताचा आरंभ गुरुवार, आज 14 जून ला होणार आहे. तसेच वडाची पूजा करण्याची वेळ म्हणजेच पौर्णिमा मध्यरात्री वाजून 12:09 मिनिटाने सुरू होणार आहे. तर ही पौर्णिमा सायंकाळी 6: 41वाजता संपणार आहे.
कशी करावी पूजा –
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची किंवा वडाच्या फांद्यांचीही स्त्रीया पूजा करताना. तर या पूजे दरम्यान नेमकं काय करायच हे जाणून घेऊयात. वाण, हळदी कुंकू, 5 फळांचा नैवैद्य दाखवला जातो. सोबतच वडाला धागा बांधून सात फेर्या मारल्या जातात. पुढील सातही जन्म हाच पती मिळावा म्हणून,पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते.
मित्रांनो 24 जून खास सण म्हणजे वटपौर्णिमा येत आहे. विवाहित महिलांचा खास दिवस या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी व्रत करतात.
हे दान दान करण्यासाठी आपल्याला तीन नवीन झाडूची आवश्यकता असेल. आपण या झाडू एक दिवस अगोदर खरेदी करू शकता. वटपौर्णिमेच्या दिवशी आदल्या दिवशी आपण झाडू खरेदी कराल आणि आपल्या गावच्या मंदिरात किंवा जेथे लक्ष्मीचे मंदिर आहे तेथे आपल्या घरात लपवून एक झाडू ठेवू इच्छित आहात. याला आपण गुप्त देणगी असे म्हणतो. या गुप्त भेटवस्तूचा महिमा वर्णनात्मकपणापेक्षा कमी नाही. ही गुप्त देणगी घर आनंदी करते. घरातील लोकांचे आरोग्य चांगले होते. घरात नकारात्मक उर्जा कमी असते.
मित्रांनो या दिवशी हा खास नैवेद्य करून आपल्या देवांना स्वामींना दाखवला तर तुमच्या घरी सुख समृद्धी नांदेल अखंड सौभाग्याचे प्राप्ती होईल घरातील पिडा अडचणी संकटे समस्या सर्वकाही दूर होईल.
या दिवशी महिला सकाळी लवकर उठून स्नान, आन्हिकं आवरून सोळा शृंगार करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करुन वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारतात. आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व आरोग्यासाठी प्रार्थना करतात. या पूजेचं महत्वं फार मोठं आहे. हा उपवास काही महिला त्याच दिवशी रात्री सोडतात तर काही महिला दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात.
आपण जो उपाय येथे सांगणार आहोत त्याचा नैवेद्य तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी बनवायचा आहे. आपण पुरण पोळी पुरी किंवा चपाती करू शकतात, पण त्याचबरोबर आमरसाला या दिवशी खूप महत्त्वं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आमरसाला अमृताचा दर्जा दिला जातो. म्हणून या दिवशी आमरस पुरी चा नैवेद्य हा बनवावा.
आता सध्या कोरूना काळ सुरू आहे त्यामुळे बाजारात आपल्याला आंबे मिळाले तर आमरस करा अन्यथा कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून चालू शकतो.
आपण जो नैवेद्य बनवू तो देवघरात ठेवून आणि प्रत्येक पदार्थावर तुळशीचे एक पान ठेवा साधारण अर्ध्या तासाने तो नैवेद्य घेऊन आपले व्रत गृहिणींनी सोडायचे आहे. ज्यावेळी आपण उपवास सोडणार आहात त्याच वेळी हा नैवेद्य करावा रात्री सोडत असेल तर रात्री करा दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडत असेल तर त्यावेळी नैवेद्य करा.
जो नैवेद्य देवासमोर होता तसाच स्वामी समर्थांच्या जवळ सुद्धा ठेवा आणि हात जोडून प्रार्थना करा की हे परमेश्वरा माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभुदे त्याला प्रत्येक कामात यश मिळू दे. त्याच्या सगळ्या अडचणी दूर कर त्यांना चांगला आरोग्य लाभो दे आमचे रक्षण करा आमच्या मनोकामना पूर्ण करा. तुमच्या, तुमच्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य करा पण त्या मध्ये एखादा गोडाचा पदार्थ असू द्यात.
नैवेद्य दाखवल्यानंतर गृहिणींनी किमान अकरा वेळा स्वामींच्या नामाचा जप करा आणि त्यांनाही तुमच्या सुख-समृद्धीसाठी आणि पतीच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी तुमच्या मनोकामना जरूर पूर्ण होतील.
तसेच वटपोर्णिमेपासून पाच दिवस आपल्या घरी येणाऱ्या कुठल्याही सुवासिनीला किमान एकदा तरी हळदी कुंकू लावून ओटी भरावी. त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी सुबत्ता कायमस्वरूपी टिकून राहतील. पतीलाही दीर्घायुष्य मिळेल. याच बरोबर आपल्या घरातील पैसा व दाग-दागिने यांमध्ये अमाप वाढ होईल.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.