Weekly Horoscope साप्ताहिक राशी भविष्य.. या राशींच्या आयुष्यात होऊ शकते नवीन व्यक्तीचे आगमन.. महादेव करतील उद्धार..

Weekly Horoscope साप्ताहिक राशी भविष्य.. या राशींच्या आयुष्यात होऊ शकते नवीन व्यक्तीचे आगमन.. महादेव करतील उद्धार..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. जुलै 2023 वार सोमवार.. (Weekly Horoscope) आज आषाढ शुक्ल.. आज आपण या आठवड्यातील ग्रह गोचर आणि चंद्राचे भ्रमण यावर आधारित साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात..

या सप्ताहात गुरु मेष राशीत असून राहू गुरू योग बनत आहे. शनी कुंभ राशीत वक्री अवस्थेत असून मंगळ सिंह राशीत प्रवेश करीत आहे. शनि मंगळ प्रतियोग होत आहे . शुक्र कर्क राशीत गोचर करीत आहे. दिनांक 6 जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. (Weekly Horoscope) बुध सूर्य मिथुन राशीत असून राहू केतू मेष व तुला राशीत आहेत. या सप्ताहात चंद्र धनु, मकर, कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. या सप्ताहात 3 जुलै रोजी गुरुपौर्णिमा असून गुरूचे शुभ मंगल आशीर्वाद सर्व भाविकांना मिळो ही सदिच्छा. या ग्रह गोचर अनुसार व लग्नानुसार साप्ताहिक भविष्य.

मेष रास – राशी स्वामी मंगळ सिंह या राज राशीत आहे. त्याबरोबर असलेला शुक्र काहीसे आकवर्तमान र्षण निर्माण करेल. संतती ही तुमची प्राथमिकता करेल.. व्यवसायात उत्तम संधी निर्माण होतील. राशीतील राहू काळात प्रत्येक बाबतीत द्विधा मनस्थिती करेल. त्या सोबत असलेला गुरू लाभ देईल.. उच्च दर्जाची अभिरुची सं पन्न प्रवृत्ती होईल. लाभ स्थानातील शनि मोठ्या व्यक्तीं कडून फायदा घडवेल.. गुरू धर्म विषयक आस्था तसेच त्या क्षेत्रात अधिकारी व्यक्तीची भेट घडवून देईल. (Weekly Horoscope) उत्तरार्ध अनुकूल. भावंडाना उत्तम काळ. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. चंद्र आर्थिक लाभ घडवेल.. एकूण सप्ताह पूर्वार्धात उत्तम फळ देणारा ठरेल. गुरू उपासना करावी.

वृषभ रास – राशी स्वामी शुक्र हा राजयोग कारक असून चतुर्थ स्थानात शुभ योग निर्माण करेल. प्रवासात सुखद अनुभव येतील. स्वभावात सौम्यत्ता आणेल. गुरू मित्र आणि परदेश दौऱ्यापासून फायदा करून देईल. प्रवासाचे योग येतील. बहीण भावांशी संबंध सुधारतील. तसेच संपर्क, नवीन ओळखी यापासून फायदा होईल. चंद्र मानसिक त्रास देणारा ठरेल. (Weekly Horoscope) मनावर ताबा ठेवून हा आठवडा काळजीपूर्वक घालवावा. व्यय राहू आणि षष्ठ केतू खर्चाचे नियोजन योग्य प्रकारे करा तसेच परदेश संबंधी व्यवहार सावध राहून करा असे आवाहन करीत आहे. सप्ताह चांगला जाईल .

मिथुन रास – राशी स्वामी बुधाचे स्वस्थानातील भ्रमण व राशीतील सूर्य कार्यक्षेत्रात सहज संधी, तसेच शैक्षणिक क्षेत्रा संबंधी यश दाखवीत आहे. धन स्थानात शुक्र आर्थिक सावधानता बाळगावी असे सांगत आहे. लौकरच बदल होईल. संततीशी जमवून घ्या .शुक्र प्रवासावर भरपूर खर्च करील. दशम स्थान जागृत आहे. नोकरीत फायदा होईल. चंद्र भ्रमण खर्च, प्रवास योग, संतती संपत्ती प्राप्ती दाखवीत आहे. घरामध्ये काही आनंदी घटना घडेल. शुभ सप्ताह.

कर्क रास – राशी स्वामी चंद्र धनु राशीत कौटुंबिक लाभ होतील. मानसिक स्वास्थ्य मिळेल. . दशम गुरू परदेश गमनची संधी निर्माण करेल. तीर्थ क्षेत्राचे प्रवास घडतील. मित्र मैत्रिणीशी संबंध सुधारण्याची शक्यता आहे. दशम राहू हा कार्यक्षेत्रात होणाऱ्या बदलांचा कारक आहे. योग्य निर्णय घेऊन मार्ग काढावा लागेल. आर्थिक लाभ होतील. तसेच कुटुंबात काही शुभ घटना घडतील. आयुष्यात नवीन वक्तीचे आगमन होण्याची शक्यता आहे. शुक्र आर्थिक दृष्ट्या चांगले फळ देईल. (Weekly Horoscope) सप्ताह शुभ जाईल.

सिंह रास – राशी स्वामी रवि बुध लाभ स्थानात मित्रांकडून सहयोग दाखवीत आहे. राहू धर्म विषयक , तसेच व्यवसाय संबंधात कर्ज, बँकेचे व्यवहार इत्यादी घडवून आणेल. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील. त्याचा योग्य फायदा घ्या. आयुष्यात स्थैर्य राहणार नाही. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करा. फारशी अपेक्षा ठेवू नका. घरामध्ये बदल होतील. व्यय शुक्र भरपूर खर्च करतील. राशीतील मंगळ रागावर ताबा ठेवा असे सांगत आहे. उत्तरार्ध फायद्याचा असून एकूण सप्ताह मध्यम.

हे सुद्धा वाचा : Venus Retrograde Shukra Vakri : शुक्र प्रतिगामी.. या राशीचे लोक बनतील श्रीमंत.. तिजोरीवर असणार 7 ऑगस्टपर्यंत माता लक्ष्मींची कृपा..

कन्या रास – राशी स्वामी बुध रविसोबत असून कार्यक्षेत्रात दबदबा निर्माण करेल. काही व्यवसायाच्या संधी निर्माण करणार आहे. लिखाणातून फायदा होईल. प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदाराला देखील फायदे होऊ शकतात. सामाजिक जबाबदारी वाढेल. तसेच समाजात नाव होईल. अष्टम राहू आर्थिक दृष्ट्या सक्षम करेल. शेअर्स लॉटरी पद्धतीने लाभ होईल.  (Weekly Horoscope) मात्र स्त्री रोग तसेच पोटाचे त्रास होऊ शकतात. काहीही कारण नसताना हुरहूर लागून मन अस्वस्थ राहील. गुरू सर्व आपत्ती मधून मार्ग काढेल. शुक्र मंगळ योग असून अविवाहित व्यक्तीं जोडीदार निवडताना जपून. सप्ताह उत्तम.

तुला रास – शुक्राचे लाभ स्थानातील भ्रमण घरामध्ये उंची वस्तूंची खरेदी तसेच संततीची प्रगती दाखवीत आहे. मंगळ नवीन संधी देईल. बुध उदित होत आहे. नकारात्मक लहरी कमी करील. नोकरीत हालचाली कराव्या लागतील. मातृ पितृ भेट होईल. गुरू नोकरी आणि व्यवसाय यासाठी शुभ दायक असून मातुल घराण्या कडून शुभ वर्तमान देईल. जोडीदार निवडताना काळजी घ्या. नीट चौकशी करा. तसेच वैवाहिक जीवनात गैर समज होऊ देऊ नका. चंद्र भ्रमण सुखद आर्थिक लाभ देईल. सप्ताह उत्तम.

वृश्चिक रास – राशी स्वामी मंगळ दशम स्थानात असून शुक्र ही तिथेच आहे.अत्यंत यशस्वी उपक्रम हाती घ्याल प्रकृती संबंधी त्रास कमी करेल. भांडण टाळा. प्रवास, बंधू भगिनी भेट आणि कला प्रकारात रुची असा हा आठवडा आहे. अनेक नवीन व्यक्तींशी ओळख तसेच संपर्क होईल. संतती प्राप्ती साठी हा काळ शुभ आहे. भाग्य स्थानातील चंद्र पूर्वार्धात शुभ फळ देईल. धार्मिक कार्यक्रम होतील. प्रवास योग येतील..लाभ दायक सप्ताह आहे.

धनु रास – राशी स्वामी गुरू पंचम स्थानात गृहसौख्य . सामाजिक प्रतिष्ठा, संततीलाभ दाखवीत आहे. घरामध्ये काही सजावट, नवीन सुख सोयी करून घ्याल. पंचमातील राहू कुटुंबात वाढ सुचवीत आहे. अनेक नवीन विषयात रुची निर्माण होईल. पंचम स्थानातील ग्रहाधिक्य आर्थिक लाभ, तसेच घरात काही शुभ घटना दाखवीत आहे. भाग्य स्थानात मंगळ शुक्र पराक्रमात वाढ करेल. तसेच शत्रू निर्माण करेल. पण अखेर विजय तुमचाच होईल. चंद्र भ्रमण आर्थिक लाभ पण खर्चिक सप्ताह आणि मानसिक ताण दाखवीत आहे. उत्तरार्ध अनुकूल जाईल.

मकर रास – गुरू ग्रहांचे गोचर चतुर्थ स्थानातअसून शुभ फळ देतील. अष्टम मंगळ आहे उष्णतेचे विकार सतावू शकतात. शुक्र मंगळ आकर्षक घराचे स्वप्न पूर्ण करेल. जोडीदारांसाठी पैसे खर्च होतील. गुरू घरा बाबतीत शुभ ठरेल .तसेच काही चांगल्या घटना घडतील. प्रवास आणि बंधुभेट घडवेल. तुमच्या संभाषण कौशल्यात विशेष वाढ होईल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. मंगळ वैवाहिक जीवनात कुरबुरी करेल. प्रकृती जपा. (Weekly Horoscope) सप्ताह एकूण चांगला जाईल. शनीची उपासना करावी.

कुंभ रास – राशी स्वामी शनि स्वस्थानात आणि चंद्र लाभ स्थानात संतती कडून काही अनपेक्षित लाभ निर्माण करू शकतो. आरोग्याला जपा. दवाखान्याच्या फेऱ्या तसेच औषध पाण्यावर खर्च होऊ शकतो. काहीही अनाठायी धाडस करू नका. मंगळ सप्तम स्थानात जोडीदाराची आरोग्य चिंता निर्माण करेल. वाद करू नका. घरात शांतता ठेवा.आर्थिक लाभ तसेच पैतृक संपत्ती यासंबंधी हा आठवडा शुभ आहे. पूर्वार्ध जपून रहा. बुध कायद्याचे भान ठेवा असे सांगत आहे उत्तरार्ध मध्यम राहील.

मीन रास – धन स्थानातील गुरू तसेच चतुर्थ स्थानातसूर्य बुध, पंचम स्थानातील मंगळ शुक्र या आठवड्यात शुभ समाचार देतील. गृह लाभ होईल .शनी कुंभ राशीत काहीसा नकारात्मक अनुभव देईल. पैसा खर्च करेल. प्रवास तसेच बंधू भेट संभवते. पण प्रकृतीचे त्रास संभवतात. चंद्र प्रवासी असून पूर्वार्ध अनुकूल. (Weekly Horoscope) शनि उपासना करावी. पंचम स्थानात मंगळ संतती जपा असे सांगत आहे. शुभ सप्ताह.
शुभमं भवत..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!