शिव तांडव स्तोत्र घरामध्ये वाचणे अशुभ का मानले जाते.? एक चूक आणि अनर्थ..

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या देवी-देवतांचे भक्त असतात. तर कुणी श्री गणेशांचे, कुणी मारुतीचे तर बरेच जण हे महादेवाचे भक्त आहेत. अगदी मनोभावे महादेवांची पूजा करीत असतात. सोमवार हा महादेवांचा वार मानला जातो.

या दिवशी बरेच जण उपवास करीत असतात. तसेच महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या मंत्रांचा जप देखील करीत असतात. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे महादेवांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी शिव तांडव स्तोत्र पाठ म्हणतात.

त्यावर नृत्य देखील करतात. परंतु अशी शिवभक्ती खुद्द शिव शंभूलाही पसंत नाही. त्या उपासनेने होणारे तोटे जर तुम्हाला समजले तर यापुढे तुम्ही देखील वरील चुका करणार नाही. तर मित्रांनो, शिव तांडव स्तोत्र ही शिव स्तुती असून लंकाधीश रावण त्याचा रचेता आहे.

हे आपण प्रत्येकजण जाणतोच. परंतु ही स्तुती त्याने कोणत्या स्थितीत केली आणि त्या रचनेचा त्याला काय लाभ झाला हे जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. रावण हा शिवभक्त होता. लंकेत शिवाचे स्थान असावे या विचाराने त्याने शिवाची आराधना केली.

मात्र शिव प्रसन्न झाले नाही म्हणून रावणाने अहंकाराच्या भरात कैलास पर्वतच मुळासकट उपटून लंकेत नेण्याचा प्रयत्न केला. या कृतीचा शिव शंकरांना राग आला आणि त्यांनी आपल्या नुसत्या अंगठ्याने रावणाला पाताळाच्या दिशेने दाबले.

त्यामुळे रावण गयावया करू लागला आणि त्याने हि शिवस्तुती रचली. नंतर शंकराचा राग शांत झाला आणि रावणाची शिव कोपातून सुटका झाली. मात्र रामाविरुद्ध लढाईत रावणाने याच स्तोत्राचा पुनर्वापर करून पाहिला तेव्हा मात्र शंकरांनी दुसऱ्याच्या विनाशाची इच्छा धरणाऱ्या रावणाला तुझाच पराभव होईल असा शाप दिला.

तर मित्रांनो, यावरुन लक्षात घेतले पाहिजे की शिव तांडव स्तोत्र ही शिव स्तुती असली तरी ती फलदायी नाही. कारण त्याच्या रचनाकारावरच शिवकृपा झाली नाही. तर आपल्यावर शिवकृपा कशी होणार? त्यामुळे उपासना म्हणून हे स्तोत्र म्हणू नये असे धर्मशास्त्र सांगते.

तर मित्रांनो शिव तांडव स्तोत्रातील तांडव हा शब्द लक्षात घेतला तर तुम्हाला कळेल की हे शब्द विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर म्हटले गेलेले स्तोत्र आहे. त्यातील जे प्रखर शब्द, त्यांचे उच्चारण आपल्या शरीरासाठी खूपच अपायकारक ठरू शकतात.

हे स्तोत्र वीर रस जागृत करणारे असले तरी ते घरात म्हणण्याचे काहीच कारण नाही. तसे जर तुम्ही केले तर आपल्या घराची युद्धभूमी होऊ शकते. तुम्हाला जर तो धोका टाळायचा असेल तर घरात शिव तांडव स्तोत्राचे उच्चारण अजिबात करू नका.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment