स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… स्वत:ला साप चावल्याचं स्वप्न पडलंय का कधी? त्याचा सरळ असा निघतो अर्थ.. जवळपास सगळ्यांनाच झोपत स्वप्नं पडतात. काहींना चांगली तर काहींना वाईट स्वप्ने स्वप्ने पडतात. स्वप्नशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचे तपशीलवार वर्णन केले आहे. स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्न एखाद्या व्यक्तीच्या भविष्यातील काही घटनांचे संकेत असतात.
या घटना चांगल्या किंवा वाईट असू शकतात. अशीही अनेक स्वप्ने असतात, ज्याचा परिणाम उलटाच निघतो. म्हणजे चांगल्या स्वप्नांचे नकारात्मक आणि वाईट स्वप्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात.
स्वप्नात साप चावणे, साप दिसणे हा प्रकार या स्वप्नांपैकीच एक आहे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी स्वप्नात साप दिसण्याच्या शुभ आणि अशुभ गोष्टींबद्दल सांगितलेली माहिती जाणून घेऊयात.
साप चावल्याचं स्वप्न – स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात स्वत:ला साप चावल्याचे दिसले असेल तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल.
स्वप्नात मृत साप पाहणे – स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मृत साप दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की त्याच्या जीवनात आतापर्यंत ज्या समस्या होत्या त्या संपणार आहेत आणि ती व्यक्ती संकटातून मुक्त होणार आहे.
साप मागे लागल्याचे स्वप्न – स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात साप आपला पाठलाग करताना दिसला तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. अशा प्रकारचे स्वप्न एखाद्या व्यक्तीच्या जीवनात दुःख-संकटे वाढण्याचे संकेत दर्शवते.
साप मागे लागल्याचे स्वप्न – स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात साप आपला पाठलाग करताना दिसला तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. अशा प्रकारचे स्वप्न एखाद्या व्यक्तीच्या जीवनात दुःख-संकटे वाढण्याचे संकेत दर्शवते.
स्वप्नात उडणारा साप पाहणं – स्वप्न शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात उडणारा साप दिसला तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न आर्थिक संकटासारख्या गोष्टी सूचित करतं.
स्वप्नात साप आणि मुंगूस लढताना पाहणं – स्वप्न शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात साप आणि मुंगूस भांडताना दिसले तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ आगामी काळात तुम्हाला नाहक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!