गणपती अथर्वशीर्ष म्हणताना.. समोर पेल्यात पाणी का ठेवावे.?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… काल साधना सांगितल्यानंतर दोघा-तिघांनी मला हा प्रश्न विचारला. खुप चांगलं वाटलं. जिज्ञासा ही नेहमी चांगलीच असते. साधना ही झापडबंद नसावी. कुठलीही गोष्ट आपण करताना ती का करतो, कश्यासाठी करतो याची आपल्याला माहिती हवीच..

माहिती असली की ती गोष्ट करताना आपण पुर्ण तन, मन लावुन ती गोष्ट पुर्ण करतो. असो… अथर्वशीर्ष हे शरीरातील ऊष्णता बाहेर काढते. एकदा म्हटले तर याचा परिणाम जाणवणार नाही, पण त्याची आवर्तने केली तर तात्काळ परिणाम जाणवतात.

साधकाच्या अंगावर फोड येतात. तोंड येते. तोंड लालसर होते. हातापायांची जळजळ होते. हे सगळ्याच साधकांना होईल, असे नाही. प्रकृतीप्रमाणे कमी-अधिक परिणाम जाणवतात. मंत्रांमध्ये शक्ती असते. अथर्वशीर्ष हे वेदोक्त शास्र आहे.

अशा वेळी स्तोत्र म्हणताना समोर पेल्यात थंड पाणी ठेवावे आणि आपल्या उजव्या हाताची अंगठ्याजवळची दोन बोटे पाण्यात बुडवुन ठेवावीत. स्तोत्र म्हणताना शरीरातुन जी ऊष्णता बाहेर पडते, ती बोटांद्वारे पाण्यात विरघळते आणि आपले शरीर थंड रहाते.

बोटांद्वारे मंत्रशक्तीही पाण्यात भारित होते आणि ते साधे पाणी तीर्थ होते. आपल्या मंत्रपठणाने भारित झालेले पाणी आपणच प्यायला हवे. ते इतरांना देवु नये. स्तोत्रांची खरी ताकद ही आवर्तनांत असते.

स्तोत्र एकदाच म्हटले तर ते विशेष परिणामकारक नसते. ते आवर्तनांतच म्हणावे लागते. रोज एकदा म्हटले आणि त्याचा नेम आयुष्यभर ठेवला तरी ते फलदायी होते. म्हणुनच स्तोत्रे आवर्तनांत म्हणताना ‘एवढा वेळ कसा काढायचा?

‘हा विचार मनात आणु नका. मनात ईच्छा असेल तर वेळ काढता येतोच.!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment