या 3 मूर्ती शिवाय तुमच देवघर अपूर्णच.. बघा शास्त्र काय सांगते..

या 3 मूर्ती शिवाय तुमच देवघर अपूर्णच.. बघा शास्त्र काय सांगते..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरात देवघर हे असतेच. या देवघरामध्ये विविध प्रकारच्या देवीच्या मुर्त्या आसतात. आपण अगदी मनोभावें व श्रद्धेने देवपूजा करीत असतो. आपल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी, संकटे आपल्या घरातील सर्वजण हे खुश रहावे यासाठी आपण प्रार्थना देखील करत असतो. (Pujaghar) परंतु मित्रांनो आपल्या या देवघरांमध्ये अशा तीन देवता आहेत या तीन देवता आपल्या देवघरात असणे गरजेचे असते. कारण या देवता जर आपल्या देवघरांमध्ये नसतील तर आपला देव्हारा अपूर्ण राहतो. तर या देवता कोणत्या आहेत याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे.

आपल्यापैकी बरेच जण हे कुठल्याही यात्रेला गेले की तिथून देवांच्या मूर्ती किंवा फोटो खरेदी करतात आणि ते आपल्या देवघरांमध्ये ठेवीत असतात.

परंतु मित्रांनो आपल्या देवघरांमध्ये मुर्त्यांची संख्या देखील योग्य ती असणे गरजेचे आहे. कारण अति प्रमाणात जर आपण मुर्त्या, (Devghar) फोटो देवघरांमध्ये ठेवल्या तर आपणाला नंतर यांची पूजा करणे देखील कठीण जाते. कारण आपल्याला देवपूजा करणे इतका टाईम देखील मिळत नाही.

मग आपण जर योग्य वेळेत देवपूजा केली नाही तर त्याचा विपरीत परिणाम देखील आपणाला भोगावे लागू शकतो. त्यामुळे मित्रांनो आपल्या देवघरातील मूर्तींची संख्या देखील कमीच असावी. ती वाढू देऊ नये. सगळ्याच मूर्ती देवघरात ठेवून गर्दी करू नका.

तर मित्रांनो देव्हाऱ्यात कोणते देव असावेत? असा प्रश्न आपल्याला पडतो. तर मित्रांनो तुम्ही ज्या देवघरांमध्ये मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या योग्य तो विचार करून ठेवाव्यात. कारण नंतर त्याची उचलबांगडी करणे योग्य नाही. त्यामुळे विचारपूर्वक आपणाला मूर्ती देवघरामध्ये ठेवायचे आहेत.

देवघरात मोजकेच देव ठेवले पाहिजेत. मग ते देव कोणते कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊया. प्रत्येक घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी अर्थात अन्नपूर्णा असते आणि बाळकृष्ण सुद्धा असतो. सून आल्यावर तिच्या माहेरच्यानी दिलेली अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आपणाला आपल्या देवघरात ठेवायचे आहे. याशिवाय आपले जे कुलदैवत आहे त्या कुलदेवतेची (Kuldevata) फोटो किंवा मूर्ती किंवा ताकही असतात.

हे आपणाला आपल्या देवघरांमध्ये ठेवायचे आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. कुलदेवतेच्या मूर्ती किंवा फोटो शिवाय आपला देव्हारा हा अपूर्णच राहतो.

तसेच त्यांच्या जोडीला आपल्या इष्ट देवतेची किंवा एखाद्या संत पुरुषांची किंवा आपल्या गुरूंची तस्वीर किंवा मूर्ती ठेवावी. तसेच मित्रांनो आपल्या देव्हाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती असणे गरजेचे आहे. कोणत्याही शुभकार्यात आपण पहिल्यांदा गणेश पूजा करीत असतो. (Ganpati Bappa) त्यामुळे मित्रांनो गणपतीची मूर्ती आपल्या देवघरात असणे गरजेचे आहे आणि या गणपतीच्या मूर्तीशिवाय आपला देव्हारा हा अपूर्ण असतो.

तर मित्रांनो यापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटोची संख्या वाढवू नये. अनेकांच्या घरांमध्ये यंत्र, शाळीग्राम, दोन शिवलींग, दोन शंख अशाही गोष्टी आढळतात. तसं करणं योग्य नाही. देव्हारा हा कधीही सुटसुटीत असावा. तिथे फुलांची आरास असावी. घरातील देवघरामध्ये मूर्ती किंवा तस्वीर केवढ्या आहेत यापेक्षा आपला देव्हारा हे मनाचे प्रतिबिंब असते.

हे ही वाचा : जर देवघरातील दिव्याची ज्योत अशी दिसत असेल यर ते देतं असतं घरात साक्षात लक्ष्मीचा वास असण्याचा संकेत.!!

कारण आपणाला सकारात्मक ऊर्जा देण्याची शक्ती ही आपल्या देवघरांमध्ये असते म्हणजेच आपल्या देव्हाऱ्यात असते. (Ganesh Murti) त्यामुळे मित्रांनो देव्हाऱ्यामध्ये जास्त गर्दी करणे चुकीचे आहे. म्हणून मित्रांनो कुलदेवतेच्या मूर्ती, इष्ट देवतेची मूर्ती, गणेश मूर्ती असणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो, याच्यापेक्षा जास्त मुर्त्या किंवा फोटो असतील तर तुम्ही अन्यत्र तुम्ही स्वच्छ जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही अशा मूर्ती (Daivat) ठेवल्या तरीही चालतील. परंतु मित्रांनो देव्हाऱ्यामध्ये जास्त गर्दी करू नये.

तर मित्रांनो तुम्ही देखील आराध्य दैवत, मुख्य देवता, गणेश मूर्ती या ठेवाव्यात. या तीन मुर्त्या आपल्या देव्हाऱ्यामध्ये असणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपला देव्हारा हा अपूर्ण मानला जातो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!