या 4 राशींच्या लोकांचा आपल्या बॉसशी असतो 36 चा आकडा.!! म्हणजे पंगा ठरलेलाच..‌


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो ऑफिस मध्ये तुम्ही बॉस सोबत पंगा घेता का? म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने का होईना पण तुमचं तुमच्या अधिकारी वर्गाशी भांडण होतं का? किंवा खटके उडतात का किंवा अगदीच पटत नाही मतभेद आहेत का? अस असेल तर याला कारण तुमची रास सुद्धा असू शकते. कारण ज्योतीष शास्त्रात 12 राशीचे वर्णन केले गेले आणि त्यानुसार राशींचे स्वभाव वैशिष्ट्ये आणि उणिवा सुद्धा सांगितले आहेत.

ज्योतिष शास्त्रात अशा काही राशी आहेत ज्यांना कामाच्या ठिकाणी अधिकारी किंवा सहकार्‍यांसोबत जमवून घेताना समस्या येतात आणि मग यावर उपाय काय हे आपण जाणून घेणार आहोत. मंडळी कामाच्या  ठिकाणी अधिकारी वर्गासोबत होणारा मतभेद किंवा न पटन या सगळ्या गोष्टी मागे अनेक कारणे असतात आणि ती कारण तुमच्या राशीनुसार वेगवेगळी असू शकतात.

त्यात सगळ्यात पहिली रास आहे..

मेष रास – मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांना खूप लवकर राग येतो. या राशीचे लोक कामाच्या ठिकाणीही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. या लोकांना स्वतःच्या अटींवर काम करायला आवडतं याच कारणामुळे कधीकधी त्यांचं बॉस आणि इतर सहकाऱ्यांशी जुळत नाही. त्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरं जावं लागतं.

राशीच्या लोकांचा स्वभाव असा आहे आणि त्यांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही लोक स्वतःच्या कामांमध्ये अगदी पर्फेक्ट असतात. तसेच वेळेवर काम पूर्ण करणारी असतात. यांना कामात दिरंगाई अजिबात चालत नाही आणि याउलट समोरची व्यक्ती जर कामांमध्ये ढीलीढाली झाली असेल तर मात्र मग विचारायलाच नको.

यांचा होणारा तोंड दाबून बुक्क्याचा मार यांना बिलकुल सहन होत नाही आणि मग यांचा समोरच्यावर राग निघतो पण यावर उपाय सुद्धा आहे. नियमित हनुमान चालीसा पठण मेष राशीच्या लोकांनी करावं हे यांच्यासाठी फायद्याच ठरू शकत.

वृश्चिक रास – वृश्चिक राशीचा स्वामीहि मंगळ आहे. अनेक वेळा या लोकांमध्ये त्यांच्या बॉस विरोधात सुडाची भावना दिसून येते. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामावर नीट लक्ष केंद्रित करता येत नाही आणि मग त्यांचं कामही वेळेवर पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या करियरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

स्वतः मध्ये सूडाची भावना असल्याने काही वेळा त्यांना अधिकाऱ्यांशी समन्वय साधता येत नाही. अशा परिस्थितीत मन शांत ठेवण्यासाठी ध्यान कारण आणि कोणतीही गोष्ट मनात ठेवून बसण्याची वृत्ती सोडणे आवश्यक आहे यासाठी उपाय म्हणजे तुम्ही सुद्धा हनुमान चालीसा पठण करायला हवे.

धनु रास – आता वळूयात राशीकडे. धनु ही गुरूची रास आहे या राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात परंतु या लोकांना अनेक गोष्टींचा पटकन राग येतो आणि काही वेळा ते आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी नीट समजून घेत नाही. स्वतःला श्रेष्ठ समजू लागतात या स्वभावामुळे या लोकांना नोकरीमध्ये वारंवार बदल करावे लागतात. यासाठी उपाय आहे रविवारच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू ना दीप दाखवा याशिवाय सूर्य चालीसा च सुद्धा पठण तुम्ही करू शकता.

मकर रास – ही शनिची रास आहे. तसेच सूर्य आणि शनी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या अधिकारी किंवा बॉसशी चांगले संबंध ठेवण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात. जर एखाद्याच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती योग्य नसेल तर ते आपल्या जोडीदाराशी देखील सुसंवाद ठेवू शकत नाही.

त्यासोबतच या राशीचे लोक एकांतातही राहण्याचा प्रयत्न करतात आणि अचानक रागवतात यांच्यासाठी सुद्धा उपाय आहे. आणि तो म्हणजे शनिवारी पिंपळच्या झाडाला जल अर्पण कराव याशिवाय सूर्योदयाच्या वेळी सूर्याला दीप दाखवा. याशिवाय सोमवारी गाईला गुळ आणि हरभरा खाऊ घालावा. मित्रांनो तुम्ही कोणताही उपाय करा मात्र तो नियमित करण महत्त्वाचं आहे. एक दिवस करून तुम्हाला कोणताही फरक जाणवणार नाही.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!