नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, या पाच व्यक्ती धोका देतातच. होय या पाच व्यक्ती विश्वास घात 100% करतात. प्रेम असो, मैत्री असो, विवाह असो. मित्रांनो पदोपदी लोक धोका देत आहेत.
पती पत्नीला धोका देत आहे पत्नी पतीला धोका देत आहे. एक मित्र दुसऱ्या मित्राला धोका देत आहे. एवढेच काय जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती प्रेमी आणि प्रेमिका सुद्धा एकमेकांना कधी ना कधीतरी धोका देत आहेत.
मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला धोका देते आपला विश्वास घात करते तेव्हा प्रचंड वेदना होतात. आणि असे वाटते की आपण त्या व्यक्तीला ओळखू शकलो नाही. आणि जर वेळीच त्या व्यक्तीला ओळखलं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला धोका मिळाला नसता.
मित्रांनो आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य ग्रंथातून पाचव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे. ज्याप्रकारे सोन पारखायचा असेल. जर सोनं खरं आहे की खोटं हे पारखायचा असेल. तर त्याला दगडावर रगडाव लागेल. सोन कापून पहावं लागतं.
सोन्याला आगीमध्ये तापवाव लागतं व हातोडीने त्यावर वार सुद्धा करावे लागतात. मित्रांनो ज्याप्रकारे सोन पारखण्याची ही अनेक मार्ग आपण अवलंबतो अगदी त्याच प्रमाणे समोरची व्यक्ती विश्वास पात्र आहे की नाही .
हे सुद्धा तपासून पहा. चाणक्य म्हणतात की अशा पाच व्यक्ती आहेत त्यांच्यावर माणसाने चुकूनही भरोसा ठेवू नये चला तर पाहूया या पाच व्यक्ती कोणते आहे.
नंबर एक. ज्या व्यक्तीची चुकीचं काम करतात. ज्या व्यक्ती चुकीचं काम करून पैसे कमावतात. मित्रांनो तुमच्या आसपास असे व्यक्ती असतील कदाचित तुमचे मित्र सुद्धा असतील की जे चुकीचा मार्ग अवलंबतात आणि पैसे कमवतात.
मित्रांनो अश्या लोकांवरती चुकूनही विश्वास ठेवू नका. चाणक्य म्हणतात यांच्यापासून चार हात लांब रहा. याचं कारण असा आहे की हे लोक स्वतःच्या स्वार्था प्रसंगी कोणालाही धोका देऊ शकतात.
अगदी तुम्हाला सुद्धा जर तुम्ही त्यांच्या खूप जिवलग आहात खूप जवळ आहात. मात्र जेव्हा तुमच्याकडून एखादा स्वार्थ साधायचा आहे तेव्हा हे लोक धोका द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत.
याउलट जे लोक धार्मिक आहेत नीतिवान आहेत. चांगल्या मार्गाने पैसा कमवतात अशा लोकांवरती डोळे झापून विश्वास ठेवा.
नंबर दोन आचार्य चाणक्य म्हणतात समोरचा चरित्र बघा व ठरवा कि ती व्यक्ती धोका देईल की नाही. चरित्रावरून समजते की एखादी व्यक्ती विश्वास पात्र आहे की नाही. ज्या व्यक्तीचं चारित्र्य चांगले नाही आहे जो व्यक्ती चारित्र्यसंपन्न नाही आहे.
अशा व्यक्ती वरती भरोसा ठेवू नका. मित्रांनो या व्यक्ती कोणाच्याही बाबतीत चांगला विचार करत नाहीत. आणि कधी ना कधीतरी धोका नक्कीच देतात. आणि म्हणून एखादी व्यक्ती चारित्र्यसंपन्न आहे की नाही याची खात्री नक्कीच करा. जर त्याचे चारित्र्य चांगले नसेल तर त्या व्यक्ती कडून धोका नक्की मिळणार आहे.
तिसरी गोष्ट. क्रोधी व्यक्ती. ज्यांना खुप लवकर राग येतो. खूप रागीट असतात. आळशी असतात. सतत आळस भरलेला असतो. स्वार्थी असतात. घमंडी म्हणजे गर्विष्ठ असतात. स्वतःला खूप मोठे समजतात. नेहमी खोट बोलतात.
मित्रांनो अशा व्यक्तींवर कधीही भरोसा ठेवू नका. कारण हे लोक वेळ आल्यानंतर विश्वास घात नक्कीच करतात. आणि याउलट जे लोक शांत असतात. नेहमी खरं बोलतात .मित्रांनो अशा या शांत स्वभाव लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे या लोकांवर ते आपण डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. हे लोक कधीच कोणाला धोका देत नाहीत.
मित्रांनो शेवटची खूण मी सांगणार आहे ही खूण अशी आहे की यावरून तुम्ही अगदी 100% ओळखू शकता समोरची व्यक्ती विश्वास पात्र आहे की नाही. जी व्यक्ती स्वतःच्या सुखांचा विचार न करता दुसऱ्याच्या सुखासाठी राबते. जी व्यक्ती दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःच्या सुखदुःखाचा विचार करत नाही.
मित्रांनो अशा व्यक्तींवर ती डोळे झाकून विश्वास ठेवा. आणि या उलट अशी व्यक्ती की जिला तुमच्या सुखदुःखांची काही घेणेदेणे नसतं. तुम्ही सुखात आहात की दुःखात हे पाहत नाही केवळ स्वतःच्या सुख दुःखाचा विचार करते. ती व्यक्ती कधी ना कधीतरी धोका नक्की देते.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!