या 7 गोष्टींचे जो कुणी पालन करेल, त्याला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही..!!

मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाभारतातील या सात गोष्टी किंवा नियम समजा हवं तर.. अशा गोष्टी ज्या तुम्हाला यशाच्या एका उंच शिखरावर नेऊन ठेवतील..!!

मित्रांनो, महाभारत केवळ एक महान महाकाव्य नव्हे, परंतु हे एक अफाट असे ज्ञानाचे भांडार आहे जे नेहमीच भरलेले असते आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात राहण्यासाठी, सावधगिरीने आणि योग्य दिशेने चालत राहण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहते.

आज आम्ही आपल्याला महाभारताच्या सात अशा मौल्यवान गोष्टी सांगणार आहोत, ज्यांचे आपण आपल्या आयुष्यात पालन केलेच पाहिजे, त्यांचे अनुकरण केले पाहिजे, जर आपण असे केले तर आपल्या आयुष्यात कोणताही शत्रू आपल्याला हरवू शकणार नाही. कुणीही तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबवू शकणार नाही.

चला तर मित्रांनो, जाणून घेऊया महाभारतातील जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा मौल्यवान अशा सात गोष्टी…!!!

1) आपण आपल्या उभ्या आयुष्यात कधीही कुणाचा अ’पमान करू नये. ही एक अशी चुकीची कृती आहे जी समोरच्या व्यक्तीच्या मनात निराशेची भावना निर्माण करते आणि यामुळे आपण बरेच काही गमावू शकतो. किंवा ती व्यक्ती कायमची आपला शत्रू देखील बनू शकते. म्हणून कुणाचा अ’पमान करणे आपण टाळायला हवे.

2) आपल्या मित्रांशी मैत्री कायम ठेवणे योग्य आहे, परंतु जर मित्र चुकीच्या गोष्टी करत असेल तर त्याला कायम पाठिंबा देणे देखील योग्य नाही. म्हणूनच मैत्री करतांना किंवा मैत्रीमध्ये आपण विशेष काळजी घेतली पाहिजे.

3) इतरांचा हक्क हिसकावून घेणे योग्य नाही, हे अत्यंत अ-नैतिक कृत्य आहे. त्याची शिक्षा आज नाही तर उद्या नक्किच आपल्याला मिळत असते .

4) कधीही खोटे बोलू धये. कुणी कितीही सामर्थ्यवान असो, विजय हा फक्त सत्याचाच होतो. म्हणून जो सत्याचा आणि ईश्वराचा सुद्धा संरक्षक आहे, विजय हा नेहमी त्याचाच होतो. असत्य वचन फार काळ टिकत नाही.

5) आपल्या शक्ती आणि संपत्तीचा कधीही अभिमान किंवा गर्व बाळगू नका. आपल्याकडे हे सर्व असल्यास आपण नेहमी त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत. या भूतलावर शक्ती आणि संपत्तीची बढाई मारणाऱ्या लोकांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही, आणि इतिहास या गोष्टींसाठी साक्षीदार आहे.

6) महाभारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धडा म्हणजे आपण कुणाविरूद्ध क-ट रचू नये. तसेच मनात द्वे-ष, इ-र्ष्या बाळगू नये. यामध्ये गुंतून आपण स्वतःच स्वतःचा ना-श करुन घेत असतो. तसेच आपण कधीही जुगार खेळण्याचा विचारही करू नये, या जुगारामुळेच महाभारतात कौरव आणि पांडवांची दयानिय अवस्था झाली होती.

7) ज्यांच्याकडे आपल्या चुकांबद्दल आधीच सतर्क करुन देणारा, तसेच वाईट गोष्टींपासुन आपल्याला दुर ठेवणारा सच्चा मित्र असेल त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊच शकत नाही. म्हणुन नेहमी तुमचं हित जाणणारे, जपणारे मित्र बनवा आणि असतील तर जपा. शंभर चुकिच्या मित्रांपेक्षा एकच चांगला मित्र असणे कधीही हितकारक असते.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment