या आहेत जगातील 3 सर्वश्रेष्ठ गोष्टी, सर्वश्रेष्ठ मंत्र, सर्वोत्तम तिथी आणि सर्वश्रेष्ठ व्यक्ती जाणून घ्या त्या गोष्टी कोणत्या आहेत..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो,आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते.

राजनीती आणि कू ट नी ती तही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रा वरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खास करून यात मार्गदर्शन आहे.

याशिवाय चाणक्यांनी लिहिलेला अर्थशास्त्रावरील ग्रंथही प्रसिद्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ आजही अभ्यासला जातो. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति मध्ये सामान्य माणसाचे जीवन सुधारणाऱ्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. या सर्वांमध्ये, आचार्यांनी सर्वोत्तम व्यक्ती, तिथी, मंत्र आणि दान याबद्दल देखील सांगितले आहे.

आचार्य चाणक्य हे राजकारण, अर्थशास्त्र, शेती, सामाजिक धोरण इत्यादी सर्व विषयांचे जाणकार मानले जातात. आचार्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला, पण संघर्षाला स्वतःवर अधिराज्य गाजवू दिले नाही, पण आयुष्याच्या शिक्षणाच्या दृष्टीकोनातून पाहिले.

आचार्यांनी चाणक्य नीति मध्ये आपल्या अनुभवांचे सार लिहिले आहे आणि सामान्य माणसाला जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणे सांगितली आहेत. तुम्ही देखील जाणुन घ्या की आचार्य यांच्यानुसार, सर्वात श्रेष्ठ मंत्र, सर्वात मोठी तिथी, सर्वोत्तम व्यक्ती आणि सर्वात मोठे दा न कोणते आहे.

हा आहे सर्वश्रेष्ठ मंत्र – मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात गायत्री मंत्राला सर्वश्रेष्ठ आणि उत्तम मानले गेले आहे. गायत्री मातेच्या प्रसन्नतेसाठी गायत्री मंत्राचा जप सर्वश्रेष्ठ उपाय आहे. जो व्यक्ती या मंत्राचा दररोज विधिव्रत जप करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

गायत्री मंत्राचा जप केल्याने लवकर शुभफळ प्राप्त केले जाऊ शकतात. गायत्री माता ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद यांच्या जननी मानल्या जातात. वेदांच्या देवीसाठी ज्या मंत्राचा जप केला जातो, तो मंत्र संपूर्ण विश्वातील सर्वोत्तम मंत्र आहे.

प्रत्येक व्यक्तीने गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. मंत्राच्या जपामुळे बौद्धिक क्षमता आणि बुद्धिमत्ता वाढते. ज्यामुळे माणसाचे तेज वाढते आणि सर्व दुःखां पासून मुक्त होण्याचा मार्ग देखील सापडतो.

ही आहे सर्वोत्तम तिथी – आचार्य चाणक्य यांनीही एकादशीच्या उपवासाचे वर्णन अतिशय उत्तम केले आहे, परंतु ते द्वादशी तिथीला सर्वोत्तम तिथी मानत असत कारण एकादशीचे निर्जल उपवास ठेवून भक्त द्वादशीच्या दिवशी उपवास सोडतात.

आचार्य चाणक्य यांनी हिंदू महिन्यातील द्वादशी तिथीला सर्वात पवित्र म्हटले आहे. कारण ही तारीख भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे.

हिंदु दिनदर्शिकेच्या बाराव्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला पूजा आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. द्वादशी तिथी ही भगवान विष्णूची तिथी आहे, त्यामुळे एकादशीचे पारायणही द्वादशीच्या दिवशी येते.

जगात सर्वश्रेष्ठ व्यक्ती आई आहे – आचार्यांच्या मते, जगातील सर्व लोकांचे स्वतःचे महत्त्व आहे. पण संपूर्ण सृष्टीत सर्वोत्तम स्थान आईचे आहे. आईच आहे जी मुलाला जगात आणते आणि त्याच्यासाठी आयुष्यात काहीही निस्वार्थीपणे करायला तयार असते.

आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आपल्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतू शिवाय आपल्या मुलाला भरपूर प्रेम देते, त्याची काळजी घेते.

मूल म्हणजे आईसाठी सर्वकाही. ती एक चांगली श्रोता आहे आणि आपण बोलत असलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ती ऐकत असते. ती आपल्याला कधीही रोखत नाही आणि कोणत्याही प्रकारे आपल्याला बंधनात ठेवत नाही.

ती आपल्याला चांगल्या आणि वाईट मधील फरक शिकवते. आई आपल्याला प्रत्येक आनंदात आणि दुःखात मदत करते, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा ती आपल्यासाठी रात्रभर जागी राहते आणि आपल्या चांगल्‍या आरोग्‍यासाठी देवाची प्रार्थना करते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आईची सेवा केली पाहिजे कारण आईची सेवा ही पृथ्वीवरील स्वर्गासारखी आहे.

अन्न दा न हे सर्वश्रेष्ठ दा न आहे – आचार्य चाणक्य अन्न दा ना ला एक महान दा न मानत असत. आचार्यांचा असा विश्वास होता की जर तुम्ही एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न दिले तर यापेक्षा मोठे दा न कोणतेच असू शकत नाही. अन्न माणसाला जगण्याची शक्ती देते आणि जेव्हा शक्ती येते तेव्हा व्यक्ती शक्तिशाली बनते.

अन्न दा न हे असे दा न आहे जेथे दाता-भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष स्वरूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दा ना चे फळ अप्रत्यक्ष असते. जो पर्यंत दा न देणारा व दा न घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तो पर्यंत अन्न दा ना पेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही नाही. लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल, हे सांगता येणार नाही म्हणून दा न तात्काळ करावे.

यथाशक्ती, यथासामर्थ्य दा न देत राहावे. अन्न दा ना साठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते, जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वछ होऊन पाण्याचा साठाही वाढतो.

संसारात अन्न दा ना सारखे श्रेष्ठ दा न पूर्वीही नव्हते आणि यापुढेही नसणार आहे. अन्नामुळेच श री राचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्रा ण टिकून राहतात म्हणून अन्न दा न करणारा प्रा ण दा ता सर्वस्व देणारा समजला जातो. म्हणून गरजूंना अन्न दा न नक्कीच करावे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment