या चुकांमुळे सतत चेहऱ्यावर येतात पिंपल्स : जाणून घ्या काय उपाय करावा.!!

मित्रांनो स्किन चा रंग कोणताही असो आपली स्कीन स्मुथ दिसावी, शिवाय पिंपल्स मुक्त त्वचा असावी असे सर्वांना वाटत असतं. अनेक तरुण-तरुणींना पिंपल्स चा सामना करावा लागतो.

पिंपल्स येण्याची अनेक कारणे असतात. प्रदूषण, शरीरात होणारे बदल, धुळ, घाण, तेलकट पदार्थाचे जास्त सेवन ही कारणे पिंपल्स येण्यासाठी जबाबदार असतात. चेहऱ्याची काळजी न घेणे त्यासोबतच तुम्ही केसांकडे दुर्लक्ष केला तरीही पिंपल्स येऊ शकतात.

आश्चर्य वाटलं ना हे ऐकून पण असं होतं. या काही चूका आहे त्यामुळे तुम्हाला सतत पिंपल्स येत राहतात. या चुका काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 सतत केस चेहऱ्यावर येणे.
केस सतत चेहऱ्यावर आल्यामुळे पिंपल्स येऊ शकतात आणि ते बराच वेळ राहू सुद्धा शकतात. जर तुमचे केस जर सतत तुमच्या चेहऱ्याच्या संपर्कात येत असतील तर ते बॅक्टरियल इंटर्फरन्स होण्याचं महत्त्वाचं कारण ठरतं. त्यामुळे केस सतत चेहऱ्यावर येणार नाहीत याची काळजी घ्या.

2 घाम आल्यावर आंघोळ न करणे
वर्कआउट केल्यानंतर तेव्हा खूप घाम आल्यानंतर काही लोक आंघोळ करत नाहीत. खरंतर आंघोळ करणं गरजेच असतं. वर्कआऊट करताना आपल्याला खूप घाम येत असतो आणि आपल्या शरीरा द्वारे अनेक विषारी घटक बाहेर टाकले जातात.

तर वर्कआउट केल्यानंतर आंघोळ न केल्यास हे घटक शरीरावर तसेच राहतात आणि परिणामी तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. वर्कआऊट केल्यानंतर आणि खूप घाम आल्यानंतर आंघोळ करा आणि चेहरा नीट धुवुन घ्या. आणि केस धुणं तितकाच महत्त्वाचा आहे.

3 केसांमध्ये होणारा कोंडा.
चेहऱ्यावर पिंपल्स येणे याचे लक्षण म्हणजे केसात होणारा कोंडा कारणीभूत ठरतो. केसात होणारा कोंडा म्हणजे स्कालपला होणार बॅक्टरियल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन असत. जे केसांमार्फत आपल्या त्वचेवरही पसरू शकत. त्यासाठी शाम्पू चा वापर करा. आणि केस मोकळे सोडू नका.

4 हेअर स्टाइल्स
केसांची स्टाईल करण्यासाठी हेअर ब्लोअर चा वापर होतो. आज कालचे तरुण-तरुणी हे बऱ्याचदा याचा वापर करताना दिसतात. त्यामुळे स्कालप कोरड होतं. हा कोरडेपणा दूर करण्यासाठी स्काल्प मध्ये अनेक तेल तयार होतं.

तसेच त्वचा ही तेलकट होऊ लागते. परिणामी चेहऱ्यावर पिंपल्स होतात. आपण अनेकदा हेअर प्रोडक्ट चा वापर करत असतो. ते त्वचेसाठी नुकसानदायी ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. जर तुमचे केस हेल्दी असतील तर तुमचा चेहरा हेल्दी राहतो.

5 आहारातील बदल
तिखट, चमचमीत, तळलेले पदार्थांचं वारंवार सेवन केल्याने त्वचेवर पिंपल्स येऊ लागतात. त्यामुळे आहारात फळांचा जास्तीत जास्त समावेश करणे गरजेचे आहे.

दिवसातून एक फळ नक्की खा आणि दिवसातून एक ज्यूस तरी नक्कीच घ्या. संत्री, द्राक्षे फळांचा आहारामध्ये समावेश करून घेणं त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. त्वचेच्या तेल ग्रंथी ॲक्टिव होऊन त्वचेच्या समस्या वाढत जाते त्यामुळे भरपूर पाणी पिण्याची सवय ठेवा.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment