Saturday, June 10, 2023
Homeअध्यात्मया एका मंत्राच्या उच्चाराशिवाय अपूर्ण आहे हरितालिका पूजा : जाणून घ्या शुभ...

या एका मंत्राच्या उच्चाराशिवाय अपूर्ण आहे हरितालिका पूजा : जाणून घ्या शुभ मंत्र आणि उपाय.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्याा पेजवर..!! आज आपण हरतालिका व्रताची तारीख, शुभ मुहूर्त, व्रत विधी आणि हरतालिका व्रत कथा जाणून घेणार आहोत.

हरतालिका व्रत 2021 – हरतालिका व्रत हे विवाहित महिलांसाठी महत्वाचे व्रत मानले जाते. या दिवशी स्त्रिया अखंड सौभाग्य आणि त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी उपवास ठेवतात.

या व्रतामध्ये महिला सौभाग्यवती म्हणून गौरी देवीचे आशीर्वाद घेतात. वास्तविक हा उपवास पाणी विरहित ठेवण्यात येतो. म्हणूनच हा उपवास सर्वात कठीण उपवास मानला जातो.

दुसरीकडे, अविवाहित मुली देखील हरतालिकेचे व्रत करतात. योग्य वराच्या प्राप्तीसाठी हे व्रत ठेवले जाते. हरतालिका व्रतासाठी महिलांना त्यांच्या माहेरुन मिठाई, फळे आणि कपडे पाठवले जातात.

हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिका व्रत दरवर्षी साजरे केले जाते. या वर्षी हे व्रत गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी पाळले जाईल. हरतालिका व्रताचा शुभ मुहूर्त, व्रत विधी आणि कथा याबद्दल जाणून घेऊया.

हरतालिका व्रत मुहूर्त – तृतीया आरंभ- 8 सप्टेंबर बुधवारी सकाळी 3.59 पासून.

तृतीया समाप्ती- गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी दुपारी 2:14 पर्यंत.

पहाटे पूजा मुहूर्त- गुरुवार 9 सप्टेंबर रोजी सकाळी 06:03 ते 08.33 पर्यंत.

प्रदोष काळ पूजा मुहूर्त- गुरुवार 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06:33 ते 08:51 पर्यंत.

हरतालिका व्रत पूजा विधी – हरतालिका व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. महिलांनी हरतालिका व्रताच्या पूजेदरम्यान काळे, निळे आणि जांभळे कपडे घालू नयेत. लाल, गुलाबी, पिवळे आणि हिरवे कपडे घालून पूजा करावी.

यानंतर गणपती, शिव आणि माता पार्वती यांच्या मूर्ती वाळूने बनवाव्यात.

एका चौरंगवर अक्षदांनी (तांदूळ) अष्टदल कमळाचा आकार बनवावा.

एक कलश पाण्याने भरावा आणि त्यात सुपारी, अक्षदा आणि नाणे टाकावे आणि अष्टदल कमळाच्या आकारावर त्या कलशाची स्थापना करावी. कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावे.

यानंतर चौरंगावर पान ठेवून त्यावर सुपारी ठेवावी.

माता पार्वती, श्री गणेश आणि भगवान शिव यांना टिळक लावुन, तुपाचा दिवा आणि धूप लावावे.

त्यानंतर भगवान शिव यांना त्यांचे आवडते बेलपत्र, धोतरा, भांग आणि शमीचे फुल अर्पण करावे.

देवी पार्वतीला फुले आणि गणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात.

भगवान गणेशाला आणि माता पार्वती यांना पिवळे तांदूळ, आणि भगवान शिवाला पांढरे तांदूळ अर्पण करावे.

आपण माता पार्वतीला श्रूंगाराचे सर्व साहित्य देखील अर्पण करणे आवश्यक आहे. गणेशाला जान्हवे आणि शंकरजींना मौली धागा अर्पण करावा.

चंद्राला प्रार्थना करण्याची विधी – हा उपवास भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पुनर्मिलनानिमित्त साजरा केला जातो. असे मानले जाते की माता पार्वतीने भगवान शिव यांना त्यांचे पती बनवण्यासाठी कठोर तप केले होते.

या व्रताच्या संध्याकाळी पूजा केल्यानंतर चंद्राला अर्ध्य अर्पण केले जाते. मग त्यांना कुंकू, अक्षदा आणि मौली सुद्धा अर्पण करावे. चंद्राला अर्ध्य अर्पण करताना हातात चांदीची अंगठी आणि गव्हाचे दाणे घेऊन, आपल्या जागी उभे राहून प्रदक्षिणा घालावी.

हरतालिका व्रत कथा – हरतालिका हा शब्द हरत आणि आलिक या दोन शब्दांनी बनलेला आहे, यात हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मैत्रिण. या संबंधित एक पौराणिक कथा आहे, त्यानुसार माता पार्वती यांच्या मैत्रिणी त्यांचे अ’पहरण करून त्यांना जंगलात घेऊन जातात.

जेणेकरून पार्वती मातेचे वडील त्यांचे लग्न इच्छेविरुद्ध भगवान विष्णूशी करू शकणार नाहीत. पार्वती मातेने त्यांच्या मैत्रिणींच्या सल्ल्यानुसार घनदाट जंगलात जाऊन एका गुहेत भगवान शिवाची पूजा केली.

भाद्रपद तृतीया शुक्लच्या दिवशी, हस्त नक्षत्रात, पार्वती मातेने मातीचे शिवलिंग बनवून त्याची विधिवत पूजा केली आणि रात्रभर जागरण कले. पार्वती मातेच्या दृढतेने प्रसन्न होऊन भगवान शिवाने माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले.

हरतालिकेची पूजा करतांना उपवासाच्या वेळी या मंत्रांनी भगवती-उमाची पूजा करा-


‘उमामहेश्वरसायुज्य सिद्धये हरितालिका व्रतमहं करिष्ये’

कात्यायिनी महामाये महायोगिनीधीश्वरी
नन्द-गोपसुतं देवि पतिं में कुरु ते नम:

गण गौरी शंकरार्धांगि यथा त्वं शंकर प्रिया।
मां कुरु कल्याणी कांत कांता सुदुर्लभाम्।।

हरतालिका व्रत हिंदु धर्मात विवाहित महिलांनी पाळलेले अत्यंत कठीण आणि अतिशय शुभ फलदायी व्रत मानले जाते. हरतालिका व्रतात भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते, या अद्भुत योगामध्ये उपवास आणि पूजा केल्याने विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

तसेच ज्या मुलींच्या लग्नात अडथळे आणि विलंब होत असतील, तर हे व्रत पाळून त्यांचे लग्न लवकरच होईल. हा धार्मिक विश्वास आहे की रवियोगात हरतालिका व्रताची उपासना केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स