या एका श्रापामुळे.. गाईला उष्ट अन्न खावं लागतं.!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर… आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्राणी, पशु यांना सर्वसाधारणपणे एक वेगळेच महत्त्व देण्यात आलेले आहे. प्रत्येक प्राणी, पशु हा प्रत्येक देवाचा अवतार आहे असे मानले जाते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, हिंदू धर्मशास्त्रामध्ये गाईला अत्यंत पुजले जाते व महत्त्वाचे देखील मानले जाते. गोमाता म्हणून गायीचा सन्मान केला जातो. आपल्या घरामध्ये जी पहिली चपाती तयार होत असते त्या चपातीचा पहिला मान देखील गोमातेलाच दिला जातो.

आपण आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा जर करत असेल तर अशावेळी गाईद्वारे बनवलेले जे काही पदार्थ असतात म्हणजेच गाईचे शेण, तूप, दूध,दही, ताक या सर्वांचा आवर्जून वापर करत असतो. या पंचामृत शिवाय कोणतेही पूजा अर्चना अपूर्ण मानली जाते. इतके सारे असून देखील आपल्यापैकी अनेकांनी गाईला एखाद्या कचराकुंडीच्या बाजूला किंवा एखादी उष्ट पदार्थ खाताना पाहिले असेल परंतु असे नेमके का घडते? असे घडण्या मागील काही कारण आहे का? याबद्दलची महत्त्वाची माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की,एकेकाळी माता पार्वती यांनी गायीला एक श्राप दिलेला होता आणि या श्रापा मुळेच आपल्याला गाय कचराकुंडीच्या येथील परिसरात उष्ट अन्नपदार्थ खाताना पाहायला मिळते. आपल्या हिंदु धर्म शास्त्रामध्ये एक कथेचा उल्लेख पाहायला मिळतो. त्या कथेनुसार माता पार्वती यांनी एके दिवशी व्रत ठेवलेला होता आणि हा व्रत पूर्ण झाल्यानंतर त्यांना उपवास सोडायचा होता परंतु भगवान शिवशंकर यांना माता पार्वती यांची फजिती करायची होती..

म्हणून ते एका गूफेमध्ये अज्ञात स्वरूपामध्ये गायब झाले. गायब झालेल्या शंकरांना शोधण्यासाठी माता पार्वती इकडे तिकडे भटकू लागल्या परंतु शिवशंकर काही सापडले नाही आणि एका नदीच्या ठिकाणी ते बसून ध्यानस्थ होऊन भगवान शिव शंकरांना परत येण्याची विनवणी करत होते परंतु सकाळ होऊन दुपार झाली..दुपारनंतर संध्याकाळी झाली सूर्य अस्ताकडे निघालेला होता परंतु भगवान शंकर काही पार्वती मातेला सापडले नाही.

माता पार्वती यांनी नदीच्या किनारी ठिकाणीच बसलेले असताना एक विचार केला की आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणाहून जर आपण शंकराची म्हणजेच महादेवांची पूजा केली तर महादेव अदृश्य स्वरूपामध्ये जिथे असतील ते पाहतील आणि म्हणूनच माता पार्वती यांनी नदीच्या किनारीच शिवलिंग प्रस्थापित केले आणि शिवशंकराच्या परत येण्यासाठी ची प्रार्थना सुरू केली. हे सर्व घडत असताना शिवशंकर देखील अज्ञात स्वरूपामध्ये पार्वती यांची संपूर्ण पूजा पाहत होते.

हा सर्व प्रकार पाहून महादेव यांना एक वेगळाच आनंद होत होता. कालांतराने माता पार्वती यांची पूजा पूर्ण झाली आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर पूजेचे सर्व सामग्री माता-पार्वती यांनी नदीमध्ये विसर्जित करायला गेले त्याच क्षणी शिवशंकर त्या जागेवर प्रकट झाले. माता पार्वती जी काही पूजा करत होते ते पाहून शिवशंकर यांना हसू आवरत नव्हते आणि अशावेळी शिवशंकर माता पार्वती यांना म्हणाले की, माझ्या शिवाय तुम्ही पूजा कशी केली? आणि ही सर्व पूजा करत असताना तुम्ही मनापासून केली की नाही हे मला कसे कळणार. कोणी साक्षीदार आहे का? की ज्यांनी तुम्हाला पूजा करताना पाहिले?

तेव्हा माता महालक्ष्मी म्हणाले की मी पूजा करताना अगदी मनापासून तुमची आठवण केली आणि म्हणूनच अप्रत्यक्षिकरीत्या देखील तुम्ही माझ्यासोबतच होते परंतु इतका सांगून देखील शिवशंकर यांना माता पार्वती यांचे म्हणणे पटत नव्हते, अशावेळी माता पार्वती यांनी एक शकल लढवली आणि मग सांगितले की मी पूजा करत असताना माझ्यासमोर ती गाय उभी होती. त्या गाईने मला तुमची पूजा करताना पाहिलं. अशावेळी माता पार्वती यांनी गाईला बोलवले असता गायीने देखील शिवशंकर यांच्या नकारांमध्ये हो मिसळून सांगितले की, मी तुम्हाला पूजा करताना पाहिले नाही.

आणि हे सांगताच शिवशंकर जोरजोरात हसू लागले परंतु आपल्यासमोर गायीने खोटे बोललेले हे माता पार्वती यांना सहन झाले नाही आणि पार्वती देवी यांनी गायीला श्राप दिला आणि म्हटले की, तुला मोठ्या प्रमाणावर नैवेद्य चांगले पदार्थ खायला दिले तरी तुला शेवटी उष्टे पदार्थ खावे लागतील. हे सर्व ऐकून गोमाताला रडू आले आणि त्यानंतर शिवशंकर यांनी माता पार्वती यांना सांगितले की, माझ्या सांगण्यावरूनच गाईने माझ्या नकारामध्ये नकार मिळवला होता.

हे ऐकताच माता पार्वती यांना आपल्या श्रापाचा खूप मोठ्या प्रमाणावर पश्चाताप होत होता, त्यानंतर माता-पार्वती यांनी गायीला बोलवून वृ श्राप दिला आणि सांगितले की, तुझी पूजा अर्चना करणाऱ्यांना पुढील जन्म चांगला मिळेल आणि तुला मातेचा सन्मान देखील दिला जाईल परंतु माता पार्वती यांना दिलेला शाप काही परत घेता आला नाही आणि म्हणूनच हा हा नियम आहे की, आज देखील संसारामध्ये व संपूर्ण विश्वामध्ये गायी अनेकदा आपल्याला कचराकुंडीमध्ये टाकून दिलेले, पडलेले अन्नपदार्थ खाताना पाहायला मिळतात.

या सर्व बोध कथेमधून एक अर्थ आपल्या सर्वांना शिकायला मिळतो तो म्हणजे, असत्य कधीही बोलू नये. जर तुम्ही कितीही मोठे विद्वान असाल, गुरु असाल तरी तुमच्या द्वारे जे असत्य बोलले जाते ज्यामुळे तुमची किंमत शून्य होते आणि भविष्यात कधीही असत्य बोलू नये. नेहमी सत्य बोलावे अन्यथा आपल्याला भविष्यात परिणाम भोगावे लागू शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!