या एकाच चुकीमुळे यमराजाला घ्यावा लागला होता पृथ्वीतलावर जन्म..!!!

एका छोट्याशा चुकीमुळे यमराजांना पृथ्वीवर कसा जन्म घ्यावा लागला ते जाणून घ्या..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, केवळ आपण मानवच नाही तर देवी-देवताही नकळत चुका करतात, त्यासाठी त्यांना शिक्षाही मिळते. अशीच एक गोष्ट यमराजांच्या बाबतीत घडली होती.

ज्याची शिक्षा त्यांना मिळाली ती म्हणजे त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. असे म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माचे नुकसान होते आणि अनीती वाढते, तेव्हा देवी-देवतांनी वेळोवेळी पृथ्वीवर मानवाच्या रूपात जन्म घेतला.

देव त्यांच्या अवतार स्वरूपात पृथ्वीवर प्रकट होतात. जर आपण भगवान विष्णूच्या अवतारांबद्दल बोललो तर त्यांनी आतापर्यंत मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार यासह 23 अवतार घेतले आहेत. भगवान विष्णूंनी कृष्ण अवतार आणि बुद्धांच्या रूपात अवतार घेतला आहे.

असे म्हटले जाते की भगवान विष्णूचा चोविसावा अवतार अद्याप कलियुगात ‘कल्की अवतार’ च्या रूपात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की मृत्यूचा हिशोब ठेवणाऱ्या यमराजांनीही पृथ्वीवर अवतार घेतला होता. जर नाही, तर आज आम्ही तुम्हाला सांगू की यमराज, ज्यांना मृत्यूचा देव म्हटले जाते, त्यांना का, केव्हा आणि कोणाच्या स्वरूपात अवतार घ्यावा लागला.

मृत्यूनंतर, यमराज मनुष्यांना त्यांच्या कर्मानुसार स्थान प्रदान करतात अर्थात स्वर्ग किंवा नरक. परंतु एकदा असे काही घडले की यम, मृत्यूच्या देवतेला स्वतः पृथ्वीवर अवतार घ्यावा लागला. चला तर जाणून घेऊया की स्वतः यमराजांना आपल्या कोणत्या चुकीची शिक्षा घेण्यासाठी म्हणून पृथ्वीवर मानवी स्वरूपात जन्म घ्यावा लागला.

या शापामुळे झाला पृथ्वीवर जन्म –

असे मानले जाते की कोणत्याही मनुष्याच्या मृ त्यू नंतर, यमदूत मानवांना मृ त्यू चे देव यमराज यांच्याकडे त्यांच्या कर्मांनुसार फळे देण्यासाठी घेऊन जातात, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे की यमराज यांना देखिल आपल्या चुकीची शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर यावे लागले असेल. आश्चर्य पण खरे, एकदा एका ऋषींच्या शापामुळे यमराजांना स्वतःच्या चुकीची शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीतलावर मनुष्य रुपात जन्म घ्यावा लागला.

यमराजांच्या अवताराची कथा –

असे म्हटले जाते की महाभारत काळात मांडव नावाच्या ऋषींना एका राजाकडून चुकून चोरी केल्याबद्दल फाशी देण्यात आली होती, फाशीची शिक्षा सांगितल्या नंतर राजाच्या सैनिकांनी त्यांना वधस्तंभावर लटकवले.

पण एक आश्चर्य कारक गोष्ट अशी घडली की फाशी देऊन काही दिवस झाले तरी त्यांचा जीव बाहेर आला नाही, राजाला समजले की कदाचित त्याने चुकीचा निर्णय घेतला आहे. त्याने मांडव ऋषींना ताबडतोब खाली उतरवून आपल्या चुकीची क्षमा मागितली आणि आदराने त्यांना आपल्या दरबाराबाहेर पाठवले.

या महात्म्याच्या रुपात घेतला जन्म –

राजाचा राजवाडा सोडल्यानंतर मांडव ऋषी यमराजांकडे पोहचले आणि त्यांनी यमराजांना विचारले की मी कोणता गु न्हा केला आहे, ज्याची मला मोठी शि क्षा मिळाली आहे, मला तसेच तडफडावे लागले पण तरीही माझा जीव गेला नाही.

तेव्हा यमराजांनी ऋषींना सांगितले की, तुम्ही 12 वर्षांचे असतांना एका कीटकाच्या शेपटीत सुई टोचली होती, ज्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला होता, फक्त त्या कारणाने तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला.

तेव्हा ऋषींना खूप राग आला आणि ते म्हणाले 12 वर्षाच्या मुलाला धर्म आणि अ ध र्मा चे ज्ञान नसते, आणि तुम्ही मला एका छोट्या गु न्ह्या साठी एवढी मोठी शिक्षा दिली, मांडव ऋषी संतापले आणि त्यांनी लगेच यमराजांना शाप दिला आणि म्हणाले की तुम्हाला शू द्र यो नी तील दा सी च्या घरी जन्म घ्यावा लागेल आणि सामान्य माणसाला होणारे सर्व त्रास तुम्हाला भोगावे लागतील. यानंतर, ऋषींच्या शापामुळे यमराज महाभारत काळात विदुराच्या रूपात जन्माला आले.

विदुर हे एक महान तत्त्वज्ञ आणि महाभारत काळातील महत्त्वाचे पात्र होते. ते हस्तिनापूरचे प्रधानमंत्री होते, कौरव आणि पांडवांचे काका होते, आणि धृतराष्ट्र आणि पांडु यांचे बंधू होते. विदुर एक महान विद्वान होते. त्यांनी आपल्या निती मत्तेच्या जोरावर महाभारताचे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश मिळाले नव्हते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment