या गणेश चतुर्थीला अशा प्रकारे करा घराची सजावट, काही अप्रतिम आयडिया आजच येथे जाणून घ्या..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! गणेशोत्सवासाठी पूजेचे घर सजवणे उत्सवाच्या वैभवात भर घालते. या गणेश चतुर्थीला अशा प्रकारे करा घराची सजावट, काही अप्रतिम आयडिया येथे जाणून घ्या..

आज देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. या विशेष दिवशी लोक घरात गणपतीची स्थापना करतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे मानले जाते की गणपती बाप्पाची पूजा केल्याने कोणत्याही शुभ कार्यात अडथळा येत नाही. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा करण्याचा नियम आहे. गणपती बाप्पाला सजवण्यासाठी काय वेगळं करता येईल याचा तुम्ही विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सजावटीच्या काही अप्रतिम आयडिया सांगणार आहोत..

गणेशोत्सवासाठी पूजेचे घर सजवणे उत्सवाच्या वैभवात भर घालते. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरातील पुरूषांची आणि गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. फराळ काय करायचा, यंदाचं डेकोरेशन कसं असेल, साफ-सफाई बाकीये.. असे अनेक विचार तुम्हीसुद्धा करत असाल. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात गणपतीचा जन्म झाल्याचे सांगितले जाते.

इंग्रजी दिनदर्शिकेनुसार गणेश चतुर्थीचा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. या विशेष प्रसंगी लोक आपले संपूर्ण घर सजवतात. लॉकडाऊनमुळे साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला तरी उत्साह मात्र तेव्हढाच असेल. गणपती बाप्पाला सजवण्यासाठी काय वेगळं करता येईल याचा तुम्ही विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सजावटीसाठी काही अप्रतिम आयडिया सांगणार आहोत. चला तर मग, पूजेचे घर सजवण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया…

दिव्यांची सजावट – आजकाल तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे सुंदर लाईटस् उपलब्ध आहेत किंवा तुम्ही ते ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. तथापि, हे लाईटस् खरेदी करण्यापूर्वी, हे सुनिश्चित करा की ते आपल्या घराच्या सजावटीशी देखील जुळतील. बाप्पाच्या मूर्तीभोवती तुम्ही दिव्यांची सजावट करु शकता.

रात्रीच्या वेळी ही सजावट खुपच आकर्षक दिसते. दिवे आपल्या सजावटीमध्ये भरपूर चमक आणि आकर्षण देतील. याशिवाय रंगीबेरंगी लाईटस् लावता येतात. याशिवाय आपण मातीच्या दिव्यांचा देखील वापर करु शकतात यामुळे पूजागृहाचे सौंदर्य आणखी वाढेल.

फुलांची सजावट – हिंदू धर्मात फुलांना खूप महत्त्व आहे. पुजेबरोबरच फुलांचा वापर अनेक सणांमध्ये सजावटीसाठी केला जातो. देवाच्या पूजेमध्ये फुलांचा वापर केला जातो. म्हणून, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही गणपतीचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण पूजा घर फुलांनी सजवू शकता. यासाठी अशी फुले निवडा जी फार लवकर कोमेजत नाहीत आणि जास्त काळ टवटवीट दिसतात.

यात आपण झेंडूची फुले वापरू शकता. या गणेश चतुर्थीला फुलांची सजावट करुन आपल्या आवडत्या गणेशाचे स्वागत करा. आपण आपले घर रंगीबेरंगी फुलांनी सजवू शकता. आपण फुलांची बाग बनवून गणपतीची स्थापना देखील करू शकता. एक सुंदर फुलांचा पुष्पगुच्छ बनवून आणि त्यात काही पाने टाकून आपण ते सजवू शकतात. फुलांची सजावट नेहमीच सुंदर दिसते. ही फुले किमान २-३ दिवस ताजी दिसतात.

थीम सजावट – गणेश चतुर्थीला तुम्ही कोणत्या थीमवर आपले घर सजवणार आहात याचा विचार करा. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पुठ्ठ्याचे पर्वत बनवू शकता आणि कापूस लावून सजवू शकता. हे बर्फाच्या डोंगराचे स्वरूप देईल. आजकाल बाजारात सजावटीच्या अनेक वस्तू उपलब्ध आहेत.

घंटा, फुगे, बनावटी झाडे यासारख्या अनेक गोष्टी वापरून तुम्ही पूजेचे घर सजवू शकता. आपण जंगल थीम, जगाची सात आश्चर्ये, एक्वा थीम इत्यादी विविध थीम करु शकता. समजा तुमची थीम निसर्ग आहे मग तुम्ही धबधबे, पर्वत, नद्या आणि जंगले इत्यादींचा समावेश करु शकतात. अशा प्रकारे तुमचे उपासना घर अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसेल.

आकर्षक रांगोळीची सजावट – या गणेशोत्सवात तुम्ही गणपती बाप्पाला अनेक प्रकारे सजवू शकता. या गणेश चतुर्थीला, गणपतीच्या स्वागतासाठी तुम्ही आकर्षक रांगोळी बनवू शकता. यासाठी तुम्ही नवनवीन रांगोळी डिझाईनची कल्पना इंटरनेटवर घेऊ शकता. या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीसाठी अशी सजावट करा ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होईल आणि तुमचे मित्र आणि नातेवाईकही हे पाहून आश्चर्यचकित होतील.

थर्माकॉलने सजावट – गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी हा एक अतिशय अप्रतिम मार्ग असू शकतो. पूजेचे घर सजवण्यासाठी तुम्ही थर्माकॉलचा वापर करु शकता. यासाठी तुम्हाला फक्त थर्माकॉल शीट्सची आवश्यकता असेल. या शीटवर सुंदर आकार बनवा आणि नंतर ते आकार कापून घ्या. यावर तुम्ही रंगबीरंगी चमकिचा वापर करु शकतात. थर्माकॉलच्या या सजावटीने तुमचे पूजाघर अतिशय आकर्षक दिसेल.

मित्रांनो, गणपती बाप्पाला सजवण्यासाठी या नवनवीन गोष्टींचा वापर नक्कीच करा. यामूळे तुमचे पूजाघर खुपच आकर्षक दिसेल आणि तुमचे मित्र व नातेवाईक आश्चर्यचकित होतील. जर आपणास ही माहिती आवडली असेल तर पेजला लाईक करा, आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा.. धन्यवाद!

Leave a Comment