स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी होय. संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. होळी हा सण रंगाचा असल्यामुळे लहान मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचते. साधारणता फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रपूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्यात दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे.
देशात होळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. असलं तरी हिंदू शास्त्रात होळीतील भस्माला मात्र विशेष महत्त्व आहे. या सणाशी निगडीत बऱ्याच समजुती आणि प्रथा आहेत. होळीतल्या भस्मामुळे अनेक दोष दूर होतात अशी मान्यता ही आहे. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सण साजरा केल्याने त्याचे चांगले फळ मिळते, त्यामुळे या काही विशेष गोष्टीं केल्यास त्यांचे शुभफल प्राप्त होते.
होळी सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी आणि भगवान श्रीहरी विष्णूचा नृरसिंह अवताराची पूजा करावी. असं केल्याने भगवान श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होते आणि तसं होळी दहना वेळीसुद्धा अवश्य सहभागी व्हावं. काही कारणास्तव होळी दहनाच्या दिवशी आपण तिथे उपस्थित राहणं शक्य नसेल, तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
होळीमध्ये जवस, वाटाणा, गहू किंवा हरभऱ्याच्या जोड्या यांपैकी जे तुमच्याकडे असेल, होळीच्या आगीत भाजून प्रसादाच्या स्वरूपातील सर्वांना वाटावं. होळीतील भस्म पुरुषांनी मस्तकावर लावावा आणि स्त्रियांनी गळ्याभोवती लावावं. त्यामुळे समाजात कीर्ति वाढते आणि संपत्तीतही वाढ होते, असा समज आहे. होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, लवंग, जायफळ आणि केळ तसेच तीळ काळ्या कपड्यात बांधून होळी टाका.
असं केल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होतो. होळीतील भस्म लॉकर मध्ये किंवा ज्याठिकाणी आपण पैसा ठेवतो तिथे ठेवावा, असं केल्याने तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही, असं म्हटलं जातं. घरांमध्ये छोटीशी शेनाची होळी अवश्य करा, तसेच त्यात कापूर जाळा. असा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याशिवाय होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांचा पायांच्या बोटांवर गुलाल लावून त्यांचा आशीर्वाद घ्या.
लहानांना रंग लावून त्यांना आशीर्वाद द्या. पंचांगानुसार होळी दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होत. होलिका दहनासाठी प्रदोष काळाची वेळ निवडली जाते. या काळात भद्रा काळाची सावली नसते. यंदा होलिका दहन मंगळवारी 6 मार्च रोजी आहे आणि होलिका दहनाचा शुभ मुहूर्त सायंकाळी 4:17 ते 10:25 पर्यंत आहे.
।। होळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा ।।
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे सालर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!