मित्र आणि मैत्रिणींनो, आजकाल सर्वच घरांमध्ये सतत काही ना काही कुरबुरी चालत असतात, किट किट होत असते,भांडणं होत असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या सगळ्यांमुळे बाबींमुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाही, पैसा टिकत नाही.. तर मग आपण घरातील या पीडा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा असा उपाय करू शकतो. त्यामुळे आपणाला नक्कीच फायदा होईल.
त्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त दही, तुम्ही घरी बनवू शकत असाल तर अतिशय उत्तम बाजारात मिळणारे दही विकत आणू नका. तर आपल्याला घ्यायचं आहे थोडेसं दही आणि थोडेसे तांदूळ.. आपणासाठी या घ्यावयाच्या वस्तूंना काही प्रमाण नाही.
तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये आणि आपल्या घराच्या आसपास अनेक प्रकारच्या दृश्य-अदृश्य अशा शक्ती वावरत असतात. यापासून आपण अनभिज्ञ असतो. व या शक्तींच्या प्रभावामुळेच आपल्या घरावरती काही संकटं येतात. अशा अनेक प्रकारच्या समस्या येतात.
बरेचदा तर असं होतं की काहींच्या हातामध्ये आलेला पैसा सुद्धा निघून जातो किंवा ज्याला आपण म्हणतो की तोंडातला घास हिरावून घेणे. अशा प्रकारच्या गोष्टी घडतात.
तर या सगळ्यासाठी दृश्य-अदृश्य शक्तींचा मोठा हात त्यामागे असतो. या शक्तींना प्रसन्न करावं लागतं, त्यात शक्तींना खुश ठेवावे लागते. आणि ज्योतिषशास्त्र तसेच समुद्र शास्त्रांमध्ये अनेक मार्ग सांगितले आहेत त्यापैकी एक अतिशय सोपा मार्ग जो की प्रत्येक गृहस्थ करू शकतो. तो म्हणजे दही आणि भाताचा उपाय.
करावयाचे उपाय –
ज्या प्रकारे या दृश्य अदृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोचवतात. तसंच या शक्ती तुम्हाला खुश सुद्धा ठेवू शकतात. तुमच्या जीवनामध्ये आनंद सुद्धा आणू शकतात. बऱ्याच जणांना अगदी अनपेक्षितपणे लॉटरी लागते.
तर काही जणांकडे अचानकपणे नोकरीचे योग येतात. प्रमोशन मिळतात. या पाठीमागे त्यांनी केलेली काही अशा प्रकारची प्रवृत्ती असतात. त्यामुळे या दृश्य अदृष्य शक्ती या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी हा एक उपाय आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत.
यासाठी आपण दही आणि भात याचा वापर करणार आहोत. आपण सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि भात बनवावा. एका ताटात किंवा छोट्याशा प्लेटमध्ये भाताची मुंद करून त्यावर दही घालावे किंवा दही आणि भात एकत्र कालवून त्याची मुंद करावी.
हा दही भात आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे यासाठी तुम्ही दिवसातील कोणतीही वेळ निवडू शकता.
शक्यतो श्वान म्हणजे कुत्रे असतात त्या कुत्र्यांना दहीभात खाऊ घालता येईल किंवा मांजर असेल चिमणी, कावळा किंवा इतर कोणतेही पक्षी असतील त्यांना हा दही भात सहज खाता येईल अशा ठिकाणी हा दहीभात आपल्याला आपल्या घराबाहेर ठेवायचा आहे.
तर तो ठेवल्यानंतर काही वेळाने निरीक्षण करा अगदी तीन-चार तास जाऊ द्या. हा दहीभात या प्राण्यांना पक्ष्यांना खाऊ द्या जर हा दहीभात त्यांनी खाऊन संपवला किंवा बऱ्यापैकी जर खाल्ला तर लक्षात घ्या आपल्या घरामध्ये पीडा आहे किंवा आपल्या घरामध्ये पीडा खूप मोठ्या प्रमाणात आहे.
जर हा दहीभात त्यांनी खाऊन संपवले नाही तर आपल्या घरामध्ये पीडा नाही म्हणजे त्या दृश्य अदृश्य शक्तीमुळे आपल्या घरामध्ये कोणतेही नुकसान होत नाही. अशा प्रकारे या गोष्टीचा वापर आपल्याला करता येईल.
एक गोष्ट लक्षात घ्या शक्यतो गाईच्या दुधापासून बनलेले दही असेल तर त्याचे परिणाम अतिशय तात्काळ आपल्याला मिळतात. खूप जलद मिळतात. त्याचे कारण असे आहे की गाईच्या दुधामध्ये तिच्या रक्तपेशी सुद्धा आलेल्या असतात. तसेच हा जो दहीभात आहे तो केळीच्या पानावर ठेवावा.. तसा नियम आहे.
असं हे गायीच्या र’ क्तपेशी पासून तयार झालेले दही ज्यावेळी आपण त्या पशूंना प्राण्यांना खाण्यासाठी घराबाहेर ठेवतो त्या वेळी या दह्याचा स्पर्श हा आपल्या घरातील दृश्य व अदृश्य शक्तींना आपोआप होत असतो.
एक प्रकारे आपण र’ क्त हे त्या दृश्य अदृश्य शक्तींवर ती शिंपडत आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे कोणत्याही प्राण्याचा ब’ ळी न घेता या दृश्य अदृश्य शक्ती आपल्यावर ती प्रसन्न होतात.
हा उपाय आपण दररोज नित्य नियमाने करा. एक विशिष्ट वेळ ठरवा. ही वेळ पाहण्याचा प्रयत्न करा. त्या वेळी हा दहीभात आपण बाहेर नेऊन ठेवा तो पशू प्राण्यांना खाऊ घाला.
दुसरी आणि महत्वाची गोष्ट हे सर्व करत असताना आपल्या घरामध्ये आपण मां’ साहार करणार नाही. तो कोणत्याही प्रकारची ह’ त्या म्हणजे असं की एखाद्या देवाला ब’ ळी वगैरे देणे किंवा कोंबडा कापणे अशा प्रकारच्या प्राणि ह’ त्या पशुह’त्या होणार नाही याची काळजी घ्या.
जर आपण असं केलं तर आपल्या लक्षात येईल की काही दिवसातच तुमच्या घरातील पीडा होत कमी होईल. घरातील वाद कमी होतील. घरामध्ये सुख शांती नांदू लागेल. पैसा, धनलक्ष्मी चे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेमसुद्धा दूर होऊ शकतील. त्यांना जॉब नाहीये त्यांना जॉबच्या संधी निर्माण होतील.
मात्र हा उपाय दररोज करायचा आहे. तोपर्यंत आपल्या घरातील पीडा संकट दूर होत नाहीत तोपर्यंत नित्यनियमाने हा उपाय तुम्ही करत चला. तुम्हाला याचे शुभ परिणाम नक्कीच मिळतील.
वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोषानुसार व वेगवेगळ्या शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कुणीही अं’ धश्रद्धे शी संबंध जोडू नये ही विनंती.
ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र, लक्ष्मी प्राप्ति, संतान प्राप्ति, पितृदोष यासह सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.