ज्योतिषमध्ये सांगण्यात आलेल्या नऊ ग्रहांमध्ये शनिदेवाला न्यायाधीश मानले गेले आहे. साक्षात शनिदेवच आपल्या कर्माचे शुभ-अशुभ फळ प्रदान करतात. शनिदेवांनी गुरुवार, 23 जानेवारीला धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. या राशीमध्ये या ग्रहाचा काळ हा एका राशीमध्ये जवळपास अडीच वर्ष निश्चित असतो.
अनेकवेळा शनी वक्री होऊनही राशी बदलतो, परंतु यावर्षी असे होणार नाही. 2021 मध्ये शनी वक्री होईल परंतु राशी बदलणार नाही म्हणजेच संपूर्ण वर्षभर हा ग्रह मकर राशीतच राहील. शनी, सोमवार 11 मे रोजी वक्री होईल. मंगळवार 29 सप्टेंबरला पुन्हा शनी मार्गी होईल.
कोण – कोणत्या राशींसाठी सुरु होणार शनिची साडेसाती
शनिदेवाच्या राशी परिवर्तनामुळे जूनज्ञ 23 तारखेनंतर वृश्चिक राशीची साडेसाती समाप्त होईल. वृषभ आणि कन्या राशीची ढय्या उतरेल.
मकर राशीमध्ये शनीचा प्रवेश झाल्यामुळे कुंभ राशीवर साडेसाती सुरु होईल. या राशींवर साडेसातीचा पहिला ढय्या राहील.
मकर राशीवर दुसरा आणि धनु राशीवर शेवटचा राहील. मिथुन आणि तूळ राशीवर शनीची ढय्या सुरु होईल. (ढय्या – अडीच वर्ष शनिचा असणारा प्रभाव)
खालील 3 राशींवर साडेसातीचा प्रभाव कसा राहील
धनु – या राशीवर साडेसातीची शेवटची ढय्या राहील. उतरती साडेसाती धनु राशीसाठी लाभदायक राहील, परंतु या लोकांना जास्त कष्ट करावे लागतील. कष्टाचे फळंही मिळेल. धन-संपत्तीमध्ये वाढ होईल.
मकर – या राशीवर शनीच्या दुसऱ्या साडेसातीचा ढय्या राहील. या लोकांना अथक परिश्रम घ्यावे लागतील, त्यानंतरच यश प्राप्त होईल. खर्च वाढू शकतात. कुटुंबात वाद होऊ शकतात, धैर्य बाळगावे. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये.
कुंभ – या राशीवर शनीची साडेसाती सुरु आहे. यामुळे या राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगावी. या लोकांसाठी शनी लाभदायक राहील. परिश्रम करत राहिल्यास यशही मिळत राहील. दूरचे प्रवास करण्याचे योग जुळून येत आहेत.
या 2 राशींवर ढय्याचा प्रभाव कसा राहील
मिथुन -. 23 जानेवारीनंतर या राशीवर शनीची ढय्या सुरु होईल. या लोकांसाठी शनी कठीण परिश्रम करून घेणारा राहील. खर्च वाढेल, वाद-विवाद, नोकरीत बाधा निर्माण होऊ शकते. सध्याचा काळ हा धैर्य बाळगण्याचा आहे.
तूळ – या राशीवरसुद्धा शनीची ढय्या सुरु होईल. या लोकांसाठी शनीची ही स्थिती लाभदायक राहील. नोकरीत यश प्राप्त होऊ शकते. व्यापाऱ्यांना लाभाची संधी आहे. अविवाहित लोकांचे लग्न जुळून येईल. भूमी-भवन संबंधित कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते.
वरील माहिती ही सामाजिक व धार्मिक आधारांवर माहितीच्या विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. यामुळे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरेल अथवा प्रोत्साहित होईल असा कुठलाही उद्देश येथे नाही.
अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.