‘या’ ठिकाणी लावा हळदीचा एक दिवा, बोला हा मंत्र : अडचणी दूर होतील..!!!

मित्रांनो घरात ‘इथे’ एक हळदीचा दिवा लावा. त्यानंतर लगेच ‘हा’ मंत्र म्हणा त्यामुळे आपली साडेसाती तात्काळ निघून जाईल. अडचणी संपून जातील. आणि आपल्या घरामध्ये पैसा, धनधान्याची बरसात होईल.

आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही देवाची पूजा ही दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. मग तो दिवा काहीजण तुपाचा लावतील, काहीजण गोडे तेलाचा लावतील, काहीजण मोहरीच्या तेलाचा लावतील तर काहीजण तिळाच्या तेलाचा दिवा लावतील.

मात्र हिंदू धर्मामध्ये दिवा लावल्याशिवाय पूजा पूर्ण झाली असे म्हणत नाहीत. याहीपेक्षा आणखीनही कारणे आहेत की देवपूजा केल्यानंतर अथवा सायंकाळच्या वेळी घरामध्ये, अंगणातील तुळशी समोर, अगदी आपल्या उंबरठा जवळ दिवा लावतात.

आज आपण आपल्या घरामध्ये हळदीचा दिवा कसा लावावा व कुठल्या वेळी लावावा आणि त्या नंतर काय करावे याबद्दलची सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेत आहोत.

आपल्या घरातील आपली जी काही असेल ती देवपूजा आपापल्या पद्धतीने करून झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये अथवा घरातील जो देवारा असेल अशा ठिकाणी नेहमीप्रमाणे आपण ज्या तेलाचा अथवा तुपाचा दिवा लावतो तो लावावा. आणि यानंतर त्या दिव्यांमध्ये चिमुट्भर हळद घालावी.

मित्रांनो हळदीला देव-देवता तसेच शुभ कार्यात खूप महत्त्व आहे हे आपणाला माहिती आहे. हळदीला जसे मसाले पदार्थांमध्ये विशेष महत्त्व आहे. तसेच देवकार्यात व वेगवेगळ्या शुभमंगल प्रसंगी महत्त्व आहे.

यामुळे देव पूजेनंतर लावलेल्या दिव्यामध्ये हळद घातली जाते. आणि तो दिवा प्रज्वलित केला जातो.

मित्रांनो, हा हळदीचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण खालील प्रमाणे एक मंत्र म्हणावा…

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते । दिव्या दिव्या दिपोत्कार कानी कुंडले मोतीहार ।
दिव्याला देखून नमस्कार ॥

मित्रांनो यानंतर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या आपण या हळदीच्या दिव्या मार्फत आपण भगवंताकडे मागायच्या आहेत.

या हळदीच्या दिव्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आपल्या सर्व अडचणी निघून जातात. साडेसाती संपते. घरात पैशा बरोबरच धनधान्याची बरसात होते.

आपण करत असलेली सर्व कामे मार्गी लागतात. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. घरातील सदस्यांमध्ये प्रेम भावना वाढीस लागते.

अशाच प्रकारची सखोल माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा. तसेच आपल्या प्रियजनांना ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका.

वरील माहिती ही सामाजिक व धार्मिक आधारांवर माहितीच्या विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. यामुळे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरेल अथवा प्रोत्साहित होईल असा कुठलाही उद्देश येथे नाही.

अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment