या ठिकाणी ठेवा फक्त एक नारळ, स्वामींच्या आशिर्वादाने सगळंच होईल ठिक..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो,एक नारळ, श्रीफळ आपण इथे ठेवायचा आहे. पैशाच्या सर्व समस्या दूर होतील, अचानक धनलाभ होईल. पैसा इतका येईल की तुम्ही विचारही केला नसेल.

आपण पैसे कमवण्यासाठी निरनिराळ्या प्रकाराच्या युक्ति आणि उपाय करत असतो. आपल्या पैकी बरेच जण व्यवसाय करतात तर काही जण नोकरी करतात. आणि येथे प्रत्येक माणसाचा हा एकच उद्देश असतो तो म्हणजे पैसे कमविणे, अफाट धनाची अपेक्षा घेऊन येथे प्रत्येकजण धावत असतो कमाईचे नविन पर्यायही शोधत असतो, कारण या पैशांवरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्याला करायचा असतो.

परंतु मित्रांनो, धनसंपत्ती, पैसा-अडका कमविताना आपल्याला भरपूर प्रकारच्या अडचणी या येत असतात. कधी-कधी तर आपण जिवापेक्षा जास्त मेहनत करतो. काबाड कष्ट करतो‌. मात्र त्याच्या मोबदल्यात आपल्याला खुपच कमी प्रमाणात पैसा मिळत असतो .

मित्रांनो, असे होण्यामागे कधी कधी अनेक कारणंही असतात. कदाचित आपण करत असलेल्या घरातील अनेक चुकीच्या पद्धती, किंवा परंपरा या गोष्टींसाठी कारणीभूत ठरत असतात. म्हणूनच आपल्यासाठी या चुका वारंवार घडू नये साठी काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिष शास्त्रांमध्ये नमूद केलेले आहेत.

त्याचपैकी एक उपाय म्हणजे आपण जर पूजेत वापरात येणाऱ्या नारळाचा योग्य प्रकारे वापर केला तर, आपल्याला धनसंपत्ती, पैशांच्या बाबतीत काही अडचणी, समस्या‌ असतील तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला पूजेतील नारळाची खूप मोठी मदत होत असते.

या उपायाने आपल्याकडे अमाम पैसा अडका येऊ शकतो. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपण आता बघूया. चला तर मित्रांनो, ते उपाय कोणते आहेत ते आता आपण पाहूया.

मित्रांनो आपण पहिलं काम करणार आहोत ते म्हणजे आपल्या घराच्या जवळ जर नारळाचं एखादं झाड असेल तर ते शोधा झाड असेल तर उत्तमच नाहीतर तुम्ही नारळ विकतही आणून घेऊ शकतात. तर त्या झाडाचं एक नारळ आपण घ्यायचं आहे. जर घरी झाड नसेल तर बाजारातून एक चांगल्या प्रकारचा नारळ विकत घेऊन या.

परंतु ते नारळ घेताना ते नारळ सोलायचं नाही. त्याचं वरील आवरण तसंच ठेवायचं आहे ते काढायचे नाही. तर असा हे नारळ आपण आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तेथे, म्हणजेच देव घरातच त्यासमोर आपण हा जे आहे ते नारळ ठेवायचं आहे.

फोटोसमोर बसून मनोभावे श्री स्वामी समर्थांची पूजा आपण करायची आहे. तसेच त्या नारळाचीही पूजा आपण करायची आहे आणि पूजा केल्यानंतर हे नारळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि दोन्ही हातामध्ये आपली जी इच्छा आहे, आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या या नारळाला हातात घेऊन स्वामींना सांगायची आहे.

पुन्हा आपल्याला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे त्या मूर्तीच्या शेजारी, त्यांच्या पायथ्याशी हा नारळ ठेवायचा आहे. सात दिवस आपणही पूजा करायचे आहे. पण हा उपाय सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस खूप शुभ व लाभदायक मानला जातो.

म्हणजे या गुरुवारपासून ते पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. सात दिवस हा उपाय केल्यानंतर आपल्याला हा नारळ आपल्या जवळच्या नदीमध्ये विसर्जित करायचा आहे. ज्याठिकाणी वाहत पाणी आहे म्हणजेच नदी त्यामध्ये आपल्याला हा नारळ विसर्जित करायचा आहे.

मित्रांनो असा हा नारळ विसर्जीत केल्यानंतर काही दिवसांतच आपल्याला ज्या काही पैशांच्या संबंधित अडचणी आहेत त्या सुटलेल्या दिसतील. तुमच्या घरामध्ये पैसा, धनसंपत्ती येऊ लागेल. तुम्हाला जाणवेल आणखी थोड्या दिवसानंतर तुमच्या समस्या पूर्णपणे सुटलेले असतील.

मित्रांनो, या उपायानंतर तुमचं घर धनधान्य, पैशांनी भरुन गेलेले असेल. तुमच्या घरात सुख समृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही नांदू लागेल. तरी मित्रांनो हा उपाय नक्की करून पहा. स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करतील.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment