या वस्तु अर्पण केल्याने महादेव होतात प्रसन्न या वस्तुचा अभिषेक केल्यास मिळेल महादेवांचा विशेष आशिर्वाद..!!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आज, श्रावणातील पहिला सोमवार आहे. मित्रांनो, भगवान शिव हे अतिशय भोळे आहेत म्हणूनच त्यांना भोलेनाथ असे म्हणतात. या श्रावणात रोज एक तांब्याभर पाणी त्यांना अर्पण करुनही ते प्रसन्न होतात.

आपण जर प्रामाणिक अंतःकरणाने भोलेनाथची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते. भोलेनाथच्या आश्रयाला जाऊन व्यक्ती कोणत्याही समस्येपासून मुक्त होत असतो.

साधारणपणे पाणी, दूध, भां ग, मध, चं द न इत्यादी वस्तू भगवान शिव यांना अर्पण केल्या जातात. शास्त्रात भोलेनाथांच्या पूजेमध्ये शिवलिंगचा अभिषेक आणि त्यावर अर्पण केले जाणाऱ्या गोष्टींचे वेग वेगळे महत्त्व आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत, कोणती वस्तु अर्पण केल्याने आपल्या कोणत्या इच्छा पूर्ण होत असतात.

सकाळी आंघोळीच्या कार्यातून निवृत्त झाल्यानंतर शिवालयात जा आणि मंत्रांचे पठण करताना शिवलिंगावर पाणी अर्पण करा. यामुळे माणसाचा स्वभाव शांत आणि प्रेमळ होत असतो.

तसेच शिवलिंगावर केशर अर्पण करा. असे केल्याने व्यक्तीला सौम्यता स्वभावात नम्रता प्राप्त होते.

भोलेनाथचा साखरेने अभिषेक करा. यामुळे आनंद आणि समृद्धी वाढते. यासोबतच गरिबी देखील माणसाच्या आयुष्यापासून दूर जाते.

शिवलिंगावर अत्तर लावल्याने व्यक्तीचे विचार शुद्ध आणि शुद्ध होत असतात. याचबरोबर, जीवनात चुकीच्या कर्मांच्या मार्गावर जाण्याचे टाळा.

शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्य नेहमी चांगले राहते आणि अनेक रोगही दूर होतात.

भगवान शंकरांना दही अर्पण केल्याने स्वभावात गंभीरता येते आणि जीवनातील त्रासांपासून व्यक्तीला मुक्तता मिळते.

भोलेनाथांना तूप अर्पण केल्याने व्यक्तीची शक्ती वाढते.

भगवान शिवांना चंदनाची आवड आहे. भोलेनाथांना चंदन अर्पण केल्याने व्यक्तीचे व्यक्तिमत्व आकर्षक बनते. यासह, व्यक्तीला समाजात आदर आणि प्रसिद्धी मिळते.

शिवलिंगाला मध अर्पण केल्याने व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा येतो.

भगवान शंकराला भां ग अर्पण करा. असे केल्याने एखाद्याच्या कमतरता आणि वाईट गोष्टी न ष्ट होऊन जातात.

त्याचप्रमाणे भारतीय शास्त्रांमध्ये, बिल्वपत्र हे भगवान शिवांचे तिसरे डोळे असल्याचे म्हटलेलं आहे. बिल्वपत्र त्यांना खूप प्रिय आहे, जर पूजेमध्ये बिल्व पानांचा वापर केला तर भक्तांच्या इच्छा नककीच पूर्ण होतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment