मित्रांनो.., आपल्या समाजात अशी मान्यता आहे की नवरा-बायकोचं नातं हे एका कच्च्या धाग्याप्रमाणे असते. आणि हेच कारण आहे की बर्याचदा लोक नेहमीच ते नातं प्रामाणिकपणे निभावण्याचा सल्ला देत असतात, कारण तुमच्या छोट्या छोट्या चुकादेखील हे नाजूक नातं तोडण्यासाठी पुरेशा असतात.
खरं तर या नात्यामध्ये एका पतीने बर्याच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जर तो आपल्या पत्नीवर प्रेम करत नसेल किंवा तिचा आदर करत नसेल तर त्यांचे वैवाहिक आयुष्य अनेक समस्यांनी भरलेले असते. अशा परिस्थितीत प्रत्येक पतीने या गोष्टींची काळजी घेणे खुप गरजेचे असते.
आज आम्ही तुम्हाला अशाच राशींबद्दल सांगणार आहोत, जे लोक अगदी नाजूक फुलांप्रमाणे आपल्या बायकोची काळजी घेतात. जिवापेक्षा ही जास्त जपतात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात त्या राशी कोणत्या आहेत?
आपल्या बायकोवर जास्त प्रेम करणाऱ्या नवऱ्यांचे नाव अ , स , आणि प या तीन अक्षरावरून सुरू होते. ज्यांचे नाव सुरू या तिन्ही अक्षरांवरुन सुरू होते ते लोक आपल्या बायकोला अगदी फुलांप्रमाणे जपतात . त्या राशींचे स्वभाव आणि गुण पुढीलप्रमाणे –
मेष –
प्रथम राशि चक्रातील रास आहे मेष, होय, या राशींचे नवरोबा आपल्या पत्नीवर खुप खुप प्रेम करतात. तसेच या राशींचे लोक आपल्या पत्नीच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणाऱ्या स्वभावाचे असतात.
ते त्यांच्याबद्दलच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात. मग तो आनंद असो की दु: ख, त्याचा त्यांच्या विवाहित जीवनावर कुठलाही परिणाम ते होऊ देत नाही. त्यांच्यामध्ये आपल्या पत्नीसाठी काहीही करण्याची एक शक्ती असते.
सिंह –
या राशींचे लोक आपल्या पत्नीला एक सेकंदही एकटं सोडत नाहीत. ते त्यांच्या बायकांशिवाय जगूही शकत नाहीत. यांच आपल्या बायकोवर खूप प्रेम असते, आणि त्यांच्यासाठी त्यांची पत्नी म्हणजे सर्वस्व असते. ते बायकोशिवाय कुणाचंही ऐकून घेत नाही.
त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या पत्नीबद्दल अधिक संरक्षक असतात. यांच्या पत्नीचा अपमान करुन कोणीही सहज पळून जाऊ शकत नाही. हे लोक आपल्या पत्नीचा झालेला अपमान सहन करण्यास असमर्थ असतात.
धनु –
आता धनु रास, या राशींचे पतिदेवांची आपल्या पत्नीशी एक विशेष जवळीक असते. यांचा स्वभाव पूर्णपणे रोमँटिक असतो, ते आपल्या पत्नी कधीही दुःखी होऊ नयेत यासाठी नेहमी प्रयत्न करतात. यांना आपल्या बायकोला आनंदी पाहणे नेहमीच आवडते.
यांना आपल्या पत्नीच्या डोळ्यांत अश्रू सहन होत नाहीत. ते नेहमीच आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करत असतात. याचबरोबर ते आपल्या पत्नीची उत्तम काळजी घेतात. या राशींच्या माणसांच्या बायका राणीसारख्या राज्य करतात. आणि प्रत्येक बाबतीत ते एक परिपूर्ण पती असल्याचे सिद्ध करुन दाखतात.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.