या 5 प्रमुख कारणांमुळे धनाची देवता माता लक्ष्मी तुमच्या पासून दूर पळतात..!!

मित्रांनो येथे प्रत्येकाची अशी इच्छा आहे की आपले घर संपत्तीने कायम भरलेले असावे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कधीही कोणतीही कमतरता नसावी.

याचसाठी ते लोक काही ना कही उलट सुलट उपाय देखील करत राहतात. आणि मग एवढं करुही त्यांना धनलाभ होण्यासाठी योग्य तो उपाय कधीच सापडत नसतो.

मित्रांनो, जर तुम्ही कर्मकांडांवर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला हे माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे की धनाची देवता माता लक्ष्मींच्या कृपेशिवाय पैशाची प्राप्ती कधीही शक्य होत नाही.

आणि म्हणूनच आपण धनाची देवता माता लक्ष्मींना कायम प्रसन्न ठेवणे खुपच गरजेचे आहे.

मित्रांनो पुराण कथांनुसार अशी मान्यता आहे की सागर मंथन होण्यापूर्वी राक्षसांबरोबर झालेल्या युद्धात पराभव झाल्यानंतर स्वर्गातील सर्वच देवता हे अत्यंत गरीब आणि ऐश्वर्यविरहीत झाले होते. तेव्हा मग धनाच्या देवता माता लक्ष्मी प्रकट झाल्या होत्या.

तेव्हा देवराज इंद्रांनी देवी लक्ष्मींची स्तुती केली, यामुळे माता महालक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि देवराज इंद्र यांना वरदान दिले की, जो व्यक्ती तुमच्याद्वारे दिलेल्या द्वादशाक्षर मंत्राचे तिन्ही सांजेला दररोज भक्तिभावाने जप करेल, त्याला कुबेरांसारखे वैभव प्राप्त होईल.

द्वादशाक्षर मंत्र –
ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मीयै ह्रीं रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नमः स्वाहा।।

श्री विष्णू पुराणात धनाची देवता लक्ष्मींची देवराज इंद्रांनी स्तुती केली आहे. देवराज इंद्राच्या विनंतीवरून देवी लक्ष्मी या म्हणाल्या की त्या माणसांवर कृपादृष्टी करतील, मानवाला आशीर्वाद देतील.

परंतु ज्यांच्या घरात या 5 गोष्टी असणार त्या घरात मी राहणार नाही. यावर जेव्हा देवराज इंद्रांनी विचारले की त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत, देवी लक्ष्मींनी पुढीलप्रमाणे नावे सांगितली…

कामाची भावना –

ज्या घरात स्त्री-पुरुष जास्तीत जास्त कामात गुंतलेले असतात, ज्या घरात धर्माच्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते. धनाच्या देवता लक्ष्मी अशा घरात जास्त दिवस राहत नाहीत.

अहंकार –

ज्या घरातील लोकांमध्ये अहंकार जास्त असतो, ज्या घरात अज्ञान आणि राग विनाकारण वाढतो. अशा घराध्ये धनाच्या देवी लक्ष्मी कधीही राहत नाहीत.

लोभ –

ज्या घरातील लोक अतिशय लोभी होतात तेथे सुद्धा लक्ष्मी जास्त काळ राहत नाही. आपल्या शास्त्रात देखील सांगितले आहे..  ‘लोभस्य पाप कारणम्’ .

हिंसा –

ज्या घरात जास्त मांस आणि मच्छी वापरले जातात तेथे देवी लक्ष्मी कधीही राहत नाहीत.

स्त्रीचा अपमान –

ज्या घरामध्ये एखाद्या स्त्रीचा अनादर होत असेल सारखं सारखं तिला हिन शब्दांत उल्लेखले जात असेल अशा घरात सुद्धा माता लक्ष्मी जास्त काळ राहत नाहीत.

बऱ्याचदा असे होत असते की, खुप कष्ट करूनही घरात पैशांचा अभाव असतो. केलेल्या कष्टाचे चीज होत नसते. अशा वेळेस देवधर्म तर करावाच त्याचबरोबर माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी या उपायांचा अवलंब करायला हावा.

तर मित्रांनो, तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर इंद्रदेव यांना धनाची देवता माता लक्ष्मी यांनी सांगितलेल्या, या 5 नियमांचे पालन करा, संपत्तीच्या देवी लक्ष्मींच्या या उपायांचे अनुसरण करा. तुम्हाला कधीही धनाची धान्याची कमी पडणार नाही.

टिप – वरील माहिती ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

Leave a Comment