या 5 राशींच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा आणि कौतुक करुन घ्यायला जास्त आवडते : तसे जर घडले नाही तर होतात नाराज..!!!

मित्रांनो, राशीचक्रामधील निरनिराळ्या राशींचे लोक निरनिराळ्या स्वभावाचे असतात. तसेच काही ठराविक राशींचे लोक अतिशय नाटकी आणि अतिशय शहाणे देखील असतात. इतके की आपण त्यांचे कौतुक करायला किंवा त्यांच्याकडे लक्ष द्यायला विसरलात तर ते तुमच्या बरोबर असलेले सं-बंध तोडण्या इतपत क्रो-धित होऊ शकतात. तसेच या राशींच्या लोकांचे कौतुक करायला जर तुम्ही विसरलात तर ते अनेकदा तुमच्यावर नाराजही होतात.

मित्रांनो बघायला गेलं तर स्वतः ची प्रशंसा ऐकणे, किंवा करुन घेणे, आकर्षणाच्या व चर्चेच्या केंद्रस्थानी राहणे कुणाला आवडत नाही, परंतु अशी काही राशी चिन्हे आहेत अशा काही राशी आहेत, ज्या राशीच्या लोकांना नेहमीच केंद्रस्थानी राहून त्यांचं कौतुक ऐकून घ्यायला फारच आवडत असते.

आणि जर त्यांचं कुणाकडून कौतुक केलं गेलं नाही किंवा त्यांच्या कडे दुर्लक्ष केलं गेलं तर ते स्वतः वरील संयम देखिल गमावून बसतात. तसेच ते त्यांच्या साथीदाराला खुपच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या साथीदाराने नेहमी त्यांची प्रशंसाच करावी अशी त्यांची मनोमन इच्छा असते.

चला तर मित्रांनो, आज आपण अशा काही राशींबद्दल जाणून घेऊ की, जर या राशींच्या लोकांना तुम्ही कुठेही भेटलात तर त्यांचं कोड कौतुक करायला अजिबात विसरू नका. नाहीतर ते तुमच्यावर विनाकारण रागं भरतील.

मेष –

मेष राशीचे लोक नेहमीच त्यांची स्तुती ऐकण्यात दंग असतात. त्यांना त्यांचे गुणगान ऐकायला खुप आवडते. तसे, मेष राशीचे लोक स्वभावाने खूप मनमोकळे असतात. ते आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात, परंतु इतरांनी त्यांचे लक्ष वेधले पाहिजे असे त्यांना नेहमीच वाटत असते.

कोणत्याही कारणास्तव जर असे घडले की लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत किंवा ते आकर्षणाचे केंद्र होऊ शकत नाहीयेत, तर त्यांना खूपच वाईट वाटते. मेष राशीच्या लोकांना जेव्हा जास्त महत्त्व दिले जात नाही तेव्हा त्यांना सहजपणे रागही येतो.

कर्क –

जेथे कुणाचीही अटेंशन मिळविण्याचा आणि स्वतःची प्रशंसा ऐकुन घेण्याचा प्रश्न येतो, तेव्हा कर्क राशीचे लोक या कामात मुळीच मागे नसतात. नेहमीच सर्वांनी त्यांनाच महत्त्व द्यावे असे त्यांना वाटते.

प्रत्येक लहान सहान गोष्टींमध्ये आणि कामामध्ये त्यांचे कौतुक केले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटते. आणि जरी ती प्रशंसा खोटी आहे आणि आसपासच्या प्रत्येकाला हे ठाऊक असले की त्यांचे खोटे कौतुक केले जात आहे.

तरीही कर्क राशीच्या लोकांना याचा काही फरक पडत नाही. जोपर्यंत आपण त्यांचे कौतुक करीत आहात आणि त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत तोपर्यंत ते आनंदीच राहतील. कर्क राशीच्या साथीदाराला सुद्धा त्यांना आनंदी ठेवण्यासाठी आणि त्यांची मनं जिंकण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागतात.

सिंह –

सर्व 12 राशी चिन्हांपैकी जर अशी कोणतीही राशी असेल ज्यामध्ये त्यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव सर्वात प्रबळ असते तर ती सिंह रास आहे. सिंह राशीच्या लोकांमध्ये आत्मसन्मान आणि आत्म-प्रभुत्वाची भावना एकूणच खूप मजबूत असते.

त्यांना अगदी सहज खूष केले जाऊच शकत नाही. ज्या लोकांचे जोडीदार पती किंवा पत्नी सिंह राशीचे असतात, आपल्या जोडीदारास आनंदीत करणे किती अवघड आहे हे त्यांना चांगलेच समजू शकते, त्यांचे हृदय जिंकण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात. परंतु त्याच वेळी, कोणीही असे करण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर सिंह राशींच्या लोकांचा रोष अगदी गगनाला भिडतो.

कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे त्यांना सहन होत नाही, मग ते एखाद्या व्यक्तीशी असलेल्या नात्यांच्या संदर्भात असो किंवा मित्र ते ओळखीच्या लोकांच्या मेळाव्यात त्यांची उपस्थिती असो, सिंह राशीच्या लोकांना नेहमीच आकर्षणाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी रहायला आवडते.

तुळ –

सिंह, कर्क आणि मेष यांच्या तुलनेत तुळ राशीच्या लोकांची लक्ष वेधून घेण्याची आणि प्रशंसा ऐकण्याची इच्छा खूपच कमी असते, परंतु तरीही त्यांना हे आवडते की लोक त्यांना महत्त्व देतात आणि प्रत्येकाचे लक्ष त्यांच्याकडे असते.

तूळ राशीचे लोक देखील त्यांच्या पर्सनालिटी आणि सौंदर्याबद्दल अतिशय जागरूक आणि संवेदनशील असतात आणि जर कोणी त्यांच्या सौंदर्य व व्यक्तिमत्वाकडे लक्ष दिले नाही तर त्यांना खूप वाईट वाटते.

तुळ राशीच्या लोकांना त्यांची प्रशंसा ऐकायला आवडते आणि आकर्षणाच्या केन्द्रस्थानी रहायला आवडते. जर सहजपणे ते लोकांचे लक्ष वेधू शकले नाहीत तर, ते लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करु शकतात.

वृश्चिक –

वृश्चिक राशीच्या लोकांशी नाते ठेवणे किंवा लग्न करणे हे एक अतिशय आव्हानात्मक कार्य असते. वृश्चिक राशीचे लोक इतरांना ताब्यात ठेवतात आणि त्यांना आपल्या जोडीदारावर पूर्ण नियंत्रण हवे असते. तसेच, कुणी त्यांच्याकडे लक्ष देण्याची तीव्र इच्छा देखील असते.

त्यांना दुर्लक्ष केलेले आणि कुणी त्यांना महत्त्व न दिलेले अजिबात आवडत नाही. तसेच वृश्चिक राशीचे लोक स्वतः नाते निभावण्यात पूर्णपणे प्रामाणिक आणि निष्ठावान असतात, परंतु त्या बदल्यात त्यांना त्यापेक्षा अधिक हवे असते.

अटेंशन आणि समर्पण या दोन्ही गोष्टी न मिळाल्यास त्यांची प्रतिक्रिया कधीही सामान्य नसते. ते नेहमीच केंद्रस्थानी असले पाहिजेत हे तेवढे आवश्यक नाही, पण हे सत्य स्वीकारण्यास त्यांच्या मनाची तशी तयारी त्यांनी केलेली नसते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment