या अशा दहा महान व्यक्ती आहेत ज्यांनी खेळण्याच्या , मज्जा मस्ती करण्याच्या वयात इतिहास रचला ..!!!
या जगात अशा अनेक महान व्यक्ती आहेत ज्यांनी त्या वयात इतिहास रचला आहे जे मुलांचे खेळण्याचे , फिरण्याचे ,मित्रांबरोबर मस्ती करण्याचे वय असते. एखाद्याने केवळ वयाच्या 19 व्या वर्षी गणनयंत्र (कॅल्क्युलेटर) बनविले ,तर एखाद्याने वयाच्या आठव्या वर्षी संगीत रचनेमध्ये महत्त्वपूर्ण स्थान मिळविले.
विल्यम पिट अवघ्या 24 वर्षात इंग्लंडचे पंतप्रधान झाले ..!!!
विल्यम पिट –
28 मे, 1759 रोजी जन्मलेले विल्यम केवळ 24 व्या वर्षी 1783 मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान झाले होते.
क्लारा शुमान –
13 सप्टेंबर 1819 रोजी जन्मलेल्या क्लारा शुमान वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी जगविख्यात पियानो वादक बनल्या. आणि वयाच्या 18 व्या वर्षी तर त्यांनी आपल्या क्षेत्रातील कारकीर्दीची उंची गाठली होती.
14 वर्षांत ऑलिम्पिक विजय ..!!!
जिम्नॅस्ट नादिया कोमॅनेसी –
रोमानियाच्या जिम्नॅस्ट नादिया कोमॅनेसी यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी मॉन्ट्रियल येथे 1976 मध्ये उन्हाळी ऑलिंपिकमध्ये मोठा विजय मिळविला. कॉमन ऑलिम्पिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमध्ये सर्वोत्तम गुण मिळविणारी ती प्रथम जिम्नॅस्ट होती. त्यावर्षी त्यांनी आणखी तीन सुवर्ण पदके जिंकली आणि सहा वेळा उत्कृष्ट गुणांची नोंद केली.
ब्लेझ पास्कलने अवघ्या 19 वर्षात गणनयंत्र (कॅल्क्युलेटर) बनविले ..!!
ब्लेझ पास्कल –
17 व्या शतकातील फ्रेंच गणितज्ञ ब्लेझ पास्कल यांनी वयाच्या 19 व्या वर्षी गणन यंत्राचा (कॅल्क्युलेटरचा) शोध लावला. आणि जेव्हा ते बारा वर्षांचे होते तेव्हाच त्यांनी भूमितीचा अभ्यास करण्यास सुरवात केली.
वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी संगीताची रचना..!!!
वुल्फगँग अमाडियस मोझार्ट –
वुल्फगँग अमाडियस मोझार्ट हा 18 व्या शतकाचा अगदी बाल कलाकार होता. इतक्या लहान वयातच त्याने नाव कमावले आणि यशाची उंची गाठली. जेव्हा त्याचे वडील आपल्या मोठ्या बहिणीला पियानो शिकवत असत तेव्हा ते फार काळजीपूर्वक ऐकत असत. जेव्हा तो केवळ पाच वर्षांचा होता ,तेव्हा त्याने काही संगीत तयार करण्यास सुरवात केली. आणि वयाच्या आठव्या वर्षी त्याने प्रथम ‘सिंफोनी’ (संगीताचा एक प्रकार ) हे संगीत लिहिले. संगीताच्या जगात इतिहास रचणार्या या महान संगीतकाराचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले.
मलाला यूसुफजई यांनी वयाच्या 17 व्या वर्षी नोबेल पारितोषिक जिंकले ..!!!
मलाला युसुफजाई –
पुराणमतवादी आणि कट्टरपंथी विचारसरणीच्या समाजाविरुद्ध लढा देणार्या केवळ 15 वर्षाच्या मुलीला जिवे मारण्यासाठी तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर मलालाचे नाव जगात प्रसिद्ध झाले. आणि मलालायूसुफजईला या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली होती पण तरीही ती मृत्यूशी झुंज लढण्यात यशस्वी ठरली. तिला वयाच्या 17 व्या वर्षी 10 ऑक्टोबर 2014 रोजी कैलाश सत्यार्थी सोबत सामायिक नोबेल पुरस्कारही देण्यात आला.
लॉरेन्स ब्रॅग यांना वयाच्या 25 व्या वर्षी नोबेल पारितोषिक देण्यात आले..!!!
लॉरेन्स ब्रॅग –
सन 1915 मध्ये ऑस्ट्रियामध्ये जन्मलेल्या भौतिकशास्त्रज्ञ लॉरेन्स ब्रॅग यांना नोबेल पुरस्कार मिळाला. एक्स-रे तसेच क्रिस्टल स्ट्रक्चरवरील संशोधन आणि चाचणी कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यावेळी ते फक्त 25 वर्षांचे होते.
जोन ऑफ आर्कने वयाच्या अवघ्या 17 वर्षात लढाईचा विडा घेतला..!!!
जोन ऑफ आर्क –
शंभर वर्षे चाललेल्या रक्तरंजित युद्धामुळे मध्ययुगीन फ्रान्स देखील उध्वस्त झाला. पण 1429 मध्ये एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका कन्येने संपूर्ण देशाची परिस्थिती बदलली. समर्थकांच्या एका छोट्या समुहाच्या मदतीने जोन ऑफ आर्कने देशाच्या नेतृत्वात सैन्यात कमांडिंगची भूमिका तिला देण्यात यावी ही खात्री पटवून देण्यात ती यशस्वी झाली. त्यावेळी ती फक्त 17 वर्षांची होती जेव्हा तिने आपले केस कापले आणि पुरुषाप्रमाणे कपडे घातले आणि घोड्यावर स्वार होऊन लढाई साठी निघाली. सैन्यात भरती झाल्यानंतर 9 दिवसांनंतर जोनने इंग्लंडच्या सैन्याला पराभूत केले आणि संपूर्ण देशाची राष्ट्रीय नायक बनली.
वॉटरगेट घोटाळ्याचा पर्दाफाश..!!!
वॉटरगेट घोटाळा
1972 मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात लूटमारीच्या घोटाळ्याची माहिती उघडकीस आली तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना आपले अध्यक्षपद गमवावे लागले. त्यावेळी 29 वर्षीय बॉब वुडवर्ड आणि 28 वर्षीय कार्ल बर्नस्टीन या दोन पत्रकारांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. हा ऐतिहासिक घोटाळा वॉटरगेट घोटाळा म्हणूनही ओळखला जातो.
गॅलास पेनीपीकर वयाच्या 20 व्या वर्षी ब्रिगेडियर जनरल झाले..!!!
गॅलास पेनीपीकर –
पेनसिल्व्हेनियाचे रहिवासी असलेले गॅलास अमेरिकेच्या इतिहासात अगदी लहान वयात ब्रिगेडिअर जनरलच्या मानाच्या दर्जावर गेले. त्यावेळी तो फक्त 20 वर्षांचा होता. आणि वयाच्या 16 व्या वर्षी ते युनियन आर्मीमध्ये दाखल झाले. 1865 मध्ये फोर्ट फिशरच्या दुसरया युद्धाच्या वेळी कर्नल म्हणुन कामगिरी बजावली. पेनिपॅकरच्या या शौर्यासाठी त्यांना ‘मेडल ऑफ ऑनर ‘देऊन सन्मानित करण्यात आले होते, आणि केवळ वयाच्या अवघ्या वीस व्या वर्षी त्यांना ब्रिगेडिअरच्या पदावरही बढती देण्यात आली.