बऱ्याच लोकांना यशस्वी लोकांचा पैसा, राहणीमान, सन्मान याविषयी जाणून घ्यायची फार जास्त उत्सुकता असते आणि त्यांना तेच करायला आवडते मात्र हे सर्व त्यांना कसे मिळाले? कसे कमावले? यासाठी त्यांनी भूतकाळात किती व कसे परिश्रम घेतले? त्यावेळेची त्यांची परिस्थिती कशी होती? हे प्रश्न मात्र ते स्वतःला विचारत नाहीत.
यशस्वी कुणी जन्मजातच नसते, प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. कुणी त्यामध्ये डळमळतात तर कुणी त्यामधून उभारतात.
आपल्याला यश मिळवण्यासाठी ते करावं लागेल जे आज यशस्वी लोकांनी केलं आहे किंवा अजूनही करत आहेत. यात सर्वात महत्वाच्या आहेत त्याम्हणजे त्यांच्या सवयी आणि यश मिळवण्यासाठी स्वतःला बदलवणे, चांगल्या सवयी लावणे खूप गरजेचे असते.
आज आपण यशस्वी लोकांच्या काही सवयी जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला यशस्वी होण्यासाठी नक्कीच मदत करतील.
- स्वतःच्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करणे:
यशस्वी लोकांचा आपल्या क्षमतांवर खूप लक्ष देतात त्यासोबतच ते इतर लोकांच्या क्षमतांवर देखील लक्ष देतात. त्यांच या गोष्टीकडे खूप लक्ष असतं की ते काय करू शकतात तर काय करू शकत नाही याकडे खूप कमी लक्ष देत असतात.
अपयशाला ते हार समजत नाही तर त्याकडून ते काहीतरी नक्की शिकतात. यशस्वी लोकं आपला जास्तीत जास्त वेळ हा आपल्या कमतरतेवर नाही तर आपल्या गुणांवर, क्षमतांवर खर्च करतात आणि विकसित करण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात.
- जबाबदारी स्वीकारणे :
यशस्वी लोकांकडून जेव्हा पण एखादी चूक होते तेव्हा ते शहानिशा करून त्याची जबाबदारी स्विकारतात आणि तीला सुधारण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी लोकं फक्त स्वतःवरीलच जबाबदारी स्विकारत नाही तर इतरांनी घेतलेल्या जबाबदारीला देखील महत्व देतात आणि मदद करतात.
यशस्वी लोकं वेळेला खूप महत्व देतात. ते आपला एक क्षणही वाया घालवत नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीची जबाबदारी स्विकारायला आणि तीला पूर्णत्वास न्यायला आवडते.
- योग्य प्रश्न विचारणे:
यशस्वी माणूस नेहमी काहीतरी वेगळ करतात आणि यासाठी त्यांच्याजवळ एक खात्रीचा मार्ग असतो, तो म्हणजे प्रश्न विचारणे आणि योग्य प्रश्न विचारणे. कोणतीही गोष्ट, काम करताना अनेक अडचणी येतात त्यामधून मार्ग काढण्यासाठी गरज असते ती योग्य प्रश्न विचारून त्याची उत्तरे शोधण्याची, जी या अडचणीमधून मार्ग काढण्याची.
प्रश्न विचारूनच आपल्याला समजते की आपण कुठल्या दिशेने जात आहोत आणि का?
- स्वतःला ओळखून ध्येय निवडणे:
यशस्वी माणूस दिवसभर बेधुंद होऊन काम करतात मात्र त्यापूर्वी ते त्यांचं ध्येय खूप विचार करून निवडतात.
कोणतही काम करण्याचा एक उद्देश असावा. यशस्वी लोकं नेहमी कामाच्या परिणामाकडे लक्ष देतात आणि ते परिणाम सत्यात यावे यासाठी ते खूप परिश्रम करतात.
- अपयशाचा सामना करणे:
यशस्वी लोकं हे संकटाचा, अपयशाचा आधी स्वीकार करतात नंतर ते त्यांना ओळखून त्यांचा सामना करतात त्यांच्याकडून काहीतरी शिकून समोरच्या दिशेने पुढे चालतात.
अपयश आल्यावर यशस्वी लोकं स्वतःला नेहमी प्रेरित ठेवतात. आपला आत्मविश्वास ते ढळू देत नाहीत. हे लोकं नेहमी नव्या संधीच्या शोधात असतात. सुरुवातीपासूनच त्यांना काहीतरी वेगळं करायची ईच्छा असते.
- कुठलंही काम मनापासून करणे :
कुठल्याही कामात यश मिळवायचं असेल तर त्याचा एक खात्रीचा मार्ग आहे तो म्हणजे त्याकामात स्वतःला झोकून देणे. ते काम करत असतांना फक्त त्याच्याशी निगडित गोष्टींचाच विचार करणे. अश्याप्रकारे जर प्रयत्न करत राहिलं ते आपल्याला यशापासून कुणीही दूर ठेऊ शकत नाही.
कुणीतरी म्हटलेलं आहेच ना… की एखादी ऑक्सिजन एवढी महत्वाची न झाल्यास ती मिळत नाही. म्हूणन जे काम आपण करत आहोत त्यालाच आपला श्वास बनवा, त्यावर मनापासून काम करा.मग बघा यश तुमचंच आहे.
- प्रत्येकक्षणी सक्रिय राहणे:
यश मिळवलेले लोकं हे त्यांनी निवडलेले काम आणि वेळ याबाबतीत खूप सक्रिय असतात. त्यांचा प्रत्येक दिवस हा काय महत्वाचं आणि गरजेचं आहे हे करण्यापासून सुरु होतो.
ते आपल्या कामात एवढे सक्रिय असतात की समोर कोणत्या अडचणी येऊ शकतात याचा ते आधीच विचार करतात आणि अडचणींचा सामना करण्यासाठी ते आधीच स्वतःला कणखर बनवतात. संकटाशी कसं लढावं याच नियोजन त्यांनी आधीच केलेलं असते.
- उद्याची तयारी आजच करणे:
यशस्वी लोकं ही फार Advance मध्ये विचार करतात. जे गरजेचं पण असते कारण असे केल्याने येणाऱ्या संकाटाची भीती आधीच नाहीशी होऊन जाते आणि त्याच्याशी लढायला आत्मविश्वास मिळतो.
त्यामुळे यशस्वी लोकं हे उद्या आपल्याला काय कामं करायची आहेत याचा ते आजच विचार करून नियोजना करतात. असं केल्यामुळे उद्याचे कामं पूर्ण होण्याचे प्रमाण हे निश्चितच वाढलेले असते.
- दररोज वाचन करणे:
यशस्वी लोकांची ही सर्वोत्तम सवय आहे असं मला वाटते कारण ज्यांना खूप पुढं जायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे त्यामध्ये सर्वात गरजेचं आहे शिकत राहणे आणि ते साध्य होते वाचन केल्याने.
चांगले पुस्तके वाचणे हे आपल्या तणाव, डिप्रेशन घालवण्यासाठी तसेच नवनवीन कल्पना सुचण्यासाठी खूप आवश्यक असतो. Warren Buffett हे दररोज पुस्तकाचे 500 page वाचत असतात तसेच Bill Gates हे एका आठवड्यात किमान एक पुस्तक वाचतात.
- स्वतःवर विश्वास ठेवणे:
यशस्वी लोकांच्या सर्वात चांगल्या सवयीपैकी एक म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. कोणत्याही कामाची सुरुवात करताना आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आणि तोही स्वतःवर असणारा.
यशस्वी लोकं हे स्वतःवर खूप जास्त विश्वास ठेवतात. हा आत्मविश्वासच त्यांना आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकत हे स्पष्ट कळते आणि यामुळेच त्यांच्यासमोर येणाऱ्या कोणत्याही संकटाला पराभूत करण्यात यशस्वी होतात. हाच त्यांच्यात आणि सामान्य लोकांमध्ये फरक असतो.
ह्या सर्व सवयी आपण आपल्या जीवनात अमलात आणून आपलं जीवन बदलवू शकतो. जर आपल्याला
आपलं ध्येय मिळवायचं असेल तर काही तरी वेगळं करावं लागेलच त्याशिवाय ते नाही मिळणार नाही हाच निसर्गाचा नियम आहे.