या आषाढी एकादशीला करा या एका मंत्राचा जप, विठुराया करतील सर्व इच्छा पूर्ण..!!!

जय हरी मित्रांनो,

मित्रांनो, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. तीला पद्म एकादशी असेही म्हणतात. पद्मनाभ एकादशीच्या सर्व उपवासांपैकी देवशयनी एकादशी व्रत सर्वोत्तम असल्याचे शास्त्रात देखील सांगितलेले आहे.

हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व पा पांचा ना श होतो. ह्या एकादशीला भगवान श्री विष्णु यांची पूजा ही महत्वपूर्ण मानली जाते..

कारण या रात्रीपासून श्री विष्णु यांचा निद्रासमय प्रारंभ होतो, ज्यास चातुर्मास किंवा चौमासाचा प्रारंभ देखील म्हणतात. या काळात श्रीहरी आपला विठुराया पाताळलोकचा राजा बळी यांच्या घरात चार महिने राहत असतो.

देवशयनी एकादशी तिथी शुभ मुहूर्त –
देवशयनी एकादशी व्रत करण्यासाठी शुभ काळ
सुरु होते: 19 जुलै रात्री 10 वाजता
समाप्तः 20 जुलै रोजी संध्याकाळी 7.17 वाजता
उपवास: 21 जुलै रोजी सकाळी 5.36 ते सकाळी 8.21 या वेळेत

देवशयनी एकादशीच्या चार महिन्यांनंतर भगवान श्री विष्णू प्रबोधिनी एकादशीला झोपेतून उठतात. यावर्षी देव उठनी एकादशी 15 नोव्हेंबर रोजी आहे.

देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह
देखील आयोजित केले जातात. तुळशीचे रोप आणि शालिग्रामचे हे लग्न सामान्य लग्नाप्रमाणे पूर्ण धार्मिक परंपरेनुसार केले जाते.

देवशयनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो, तसेच ही एकादशी स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त करून देते.

देवशयनी एकादशी पूजा विधी –
देवशयनी एकादशी पूजा पद्धत…
सकाळी उठून अं घोळ करावी. पूजास्थळाची साफसफाई झाल्यानंतर श्री विष्णू यांची मूर्ती आसनावर ठेवावी व श्री हरी श्री विष्णूंना स्ना न घालवे. नंतर त्यांची पूजा करावी. भगवान श्री हरी श्री विष्णूंना पिवळे वस्त्र परिधान करावेत, पिवळी फुले, पिवळे चंदन अर्पण करावे. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म देऊन त्यांना सजवावे.

भगवान श्री विष्णूंना पान आणि सुपारी दिल्यानंतर धूप, दीप लावून फुले अर्पण करून मनोभावे पूजा अर्चा करावी. आणि भगवान श्री विष्णू यांची स्तुती करावी. पूजेनंतर प्रथम ब्राह्मणांना जेऊ घालावे नंतर आपण स्वतः अन्न किंवा फळ ग्रहण करावे.

मित्रांनो, हिंदू शास्त्रांमध्ये या दिवशी करण्याच
साठीचे अनेक उपाय शास्त्रात सांगितलेले आहेत. त्या पैकी पहिला उपाय म्हणजे एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंना केशरमिश्रित दुधाचा अभिषेक केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना श्रीहरी श्री विठूराया पूर्ण करत असतात.

तसेच देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री श्री विष्णू यांचे नामस्मरण करावे. आरती आणि स्तवन करावे ज्यामुळे श्री हरी प्रसन्न होतील आणि शांत चित्ताने निद्राधीन होतील…. अशी त्यामागील साधारण धारणा असते.

मित्रांनो, आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या समोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून ‘ओम वासुदेवाय नमः” या पवित्र मंत्राचा उच्चार करत तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात, म्हणजे यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी तथा शांतता नांदते. तसेच येणाऱ्या अनेक संकटांपासून आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे संरक्षण होत असते.

चातुर्मासात आध्यात्मिक कार्यांबरोबरच उपासनेलाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. चातुर्मासात (श्रावण महिना) हा सर्वात चांगला महिना मानला जातो.

तसे श्रावण महिना भगवान श्री शंकर यांच्या साधनेकरिता महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीला भेट देतात आणि पृथ्वीवरील सर्व कार्य सुरळीतपणे चालूअसल्याची दखल घेतात. असे मानले जाते की चातुर्मासात गरजू लोकांना दान केल्याने देव प्रसन्न होतो.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment