नमस्कार मित्रांनो, रॉयल कारभार या पेज वर आपले स्वागत आहे..!!
नमस्कार मित्रानो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्याला आणि पौर्णिमेला विशेष असं महत्वं दिले जाते. आज दिनांक 23 जुलै रोजी गुरुपौर्णिमा ही तिथी पडत आहे.
मित्रांनो, ही तिथी धर्म शास्त्रात अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हटले जाते. आणि हा दिवस अतिशय पवित्र मानला असा जातो.
गुरु पौर्णिमा ही गुरुंच्या सन्मानासाठी एक प्रतीक म्हणून सर्व ठिकाणी साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील ही पौर्णिमा मानवाच्या भविष्यास आकार देणार्या गुरूंच्या सन्मानार्थ गुरु पौर्णिमेच्या नावाने साजरी केली जाते.
जो मनुष्य माणसाला अज्ञानाच्या अंधकारातून काढून ज्ञानाच्या प्रखर प्रकाशाकडे घेऊन जातो. त्यांच्यासाठी साजरा करण्यात येणारा सोहळा म्हणजे गुरुपौर्णिमा.. अनेक ठिकाणी त्या उत्सवाची तयारीही जोरात सुरू झाली आहे, मित्रांनो, तसेच या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते.
या दिवशी करावयाचे काही खास उपाय –
मित्रांनो, या पवित्र दिवसाची सुरुवात एका अध्यात्मिक भावाने व्हायला हवी. रोजच्या पेक्षा आपण सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपल्यावर, भगवान श्री हरी श्री विष्णूंची विधिवत पूजा करुन त्यांना नमन करावे.
भगवान विष्णूंची उपासना करावी जरीही आपली शिष्यावस्था संपून गृहस्थाश्रमात आपण रमले असाल तरीही गुरुंची गरज आणि गुरुंच मार्गदर्शन हे आपल्याला आयुष्यभर मिळावं अशी विनंती श्री हरीं च्या कडे आपणाला करायची आहे. आणि आनंदी जीवनासाठी वर किंवा आशिर्वाद मागावा .
तुम्ही किंवा घरातील लहान मुलं अभ्यासामध्ये आचरणामध्ये कमकुवत असतील किंवा मागे पडत असतील तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गीतेचे पठण करावे. तसेच भगवान श्रीकृष्णाची पूजाअर्चा करावी.
या दिवसाची मान्यता काय आहे –
मित्रांनो, या दिवसाला हिंदू धर्मशास्त्रात विशेष असं महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला होता. वेद व्यास यांनी महाभारताबरोबरच अनेक महान ग्रंथांची रचना केली आहे.
एवढेच नाही तर पांडवांबरोबरच कौरवांनी देखील त्यांना आपले गुरु मानले. महाभारतातील सर्वच पात्रांसाठी ते वंदनीय होते. म्हणूनच हा दिवस त्यांच्या सन्मानार्थ गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरु पौर्णिमेला व्यास पूर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.
टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!