या शुक्रवारच्या दिवशी करा फक्त हे १ काम, धन, पैसा, वैभव सर्व काही इच्छित फळ मिळेल..!!

मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला आपली आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती चांगली असावी, सुखसमृद्धी आणि सुबत्ता आपल्या घरात कायम असावी असे वाटत असते. त्या त्या परीने आपण प्रयत्न देखील करत असतो.

पण बऱ्याचदा आपल्या प्रयत्नांना यश येत नाही. याचे बरेचसे कारणं असु शकतात. आपल्या घरात एखादा वास्तुदोष असु शकतो. आपल्या वास्तु शास्त्रांमध्ये,ज्योतिष शास्त्रात,भविष्य शास्त्रात असे अनेक प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. त्या त्या दोषांसाठी काही उपाय सुद्धा सुचविलेले आहेत.

तर मित्रांनो, आपण जर कधी या उपांचा वापर केला त्या प्रमाणे उपाय आपण केले तर नक्कीच आपली प्रगती होऊ शकते. मित्रांनो, या उपायांनी तुमच्या मनात ज्या पण काही इच्छा असतील त्या या उपायांनी पूर्ण होतील. जर माता लक्ष्मींचं वास्तव्य आपल्या घरात कायम झालं तर धनाच्या संबंधीत कोणतीही समस्या माता लक्ष्मी दूर करतात.

आणि जर कधी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर झाली त्या प्रसन्न झाल्यात तर तुम्हाला धनवान होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. तर तुम्हाला माता लक्ष्मींची कृपा तुमच्यावर व्हावी असे वाटत असेल तर, आपण शुक्रवारच्या दिवशी यापैकी काही उपाय करावे. तसे केल्यास घरातील धन, धान्य, पैसा यांची सफाई आठवड्यातून एकदा करावी. तसेच शुक्रवारच्या दिवशी त्यांची मनोभावे पूजा देखील करावी.

अपणा सर्वांना माहीतीच आहे शुक्रवार हा देवी लक्ष्मींचा वार मानला जातो. माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी लोकं बरेचसे उपाय करत असतात. त्यानुसार सर्वांनाच धनप्राप्ती सुद्धा होते.

तर मित्रांनो, सर्व ग्रहांमध्ये शुक्र ग्रह हा अतिशय चमकदार ग्रह आहे. आपल्या जीवनातील यश आणि कीर्ती यांचा शुक्र ग्रहाशी फार जवळचा संबंध आहे. म्हणून जर आपण शुक्रवारी माता लक्ष्मींची पूजा करून त्यांना प्रसन्न ठेवलं तर त्यामुळे आपल्या शुक्रग्रहाची स्थिती ही मजबूत होते.

शुक्र ग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी आठवड्यात येणाऱ्या शुक्रवारच्या दिवशी आपल्याला कोण कोणते उपाय करायचे आहेत, हे आज आपण येथे जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो, शुक्रवारच्या दिवशी आपण लवकर उठून व आन्हिकं आवरुन, माता लक्ष्मींची मनोभावे पूजा करायची आहे. तसेच तुम्हाला शक्य असल्यास एक कमळाचं फुल किंवा इतर कोणतंही लाल रंगाच फुल आपण माता लक्ष्मींना अर्पण करायचं आहे. लाल रंगाचे फुलं माता लक्ष्मींना प्रिय आहे. तर असे कोणतेही लाल रंगाचा फुल आपल्याला माता लक्ष्मींना अर्पण करायचं आहे.

आता तुमची जी अडचण आहे, त्यासाठी हा उपाय सुद्धा तुम्ही करु शकतात. तुमच्या घरात धन टिकत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालायची आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायात तुम्हाला बरकत मिळेल. धनाच्या आगमनाचे अनेक मार्ग मोकळे होतील.

तुम्हाला शक्य असल्यास पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करुन, माता लक्ष्मींची पुजा करयची आहे. आणि त्या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्तू दान करायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला अशी इच्छा असेल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम स्वरुपी रहावी, तर माता लक्ष्मींचे वैभवलक्ष्मीचे व्रत दर शुक्रवारी अवश्य करावे.

या व्रताचा संकल्प करून तुमची जी इच्छा असेल ती माता लक्ष्मी अवश्य पूर्ण करतील. त्याचबरोबर काही गोष्टी लक्षात असू द्या, घरातील कुणीही सायंकाळच्या वेळी झोपायचे नाही आहे. तसेच घरात वाईट, तथा अपशब्द बोलायचे नाही. आपले काम प्रामाणिकपणे करावे. यामुळे माता लक्ष्मींची कृपा घरातील सर्वांवर कायम राहील. करेल.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Comment