Saturday, June 10, 2023
Homeआरोग्यया उन्हाळ्यात कशी घ्याल आपल्या त्वचेची काळजी

या उन्हाळ्यात कशी घ्याल आपल्या त्वचेची काळजी

उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ऋतूनुसार आपल्या त्वचेतही बदल होत असतात. उन्हाळ्यात त्वचा ऊन व घामामुळे तेलकट होते. त्वचा काळवंडणे, घामोळ्या येणं, खाज सुटणं, काळे चट्टे येणं असे अनेक त्रास उद्भवू शकतात. आपला चेहरा धुवा


१.दिवसातून किमान ४ वेळा सौम्य क्लीन्झेर ने चेहरा धुवा.

क्रीम आधारित क्लीन्झेर शक्यतो टाळा (जर तुमची त्वचा कोरडी नसेल) कारण त्याने तुमची त्वचा तेलकट होऊ शकते. मृत त्वचा पेशींपासून मुक्त होण्यासाठी दर आठवड्याला किमान दोन वेळा जेलचा वापर करा.

२. केसांना तेल लावा
आठवड्यातून किमान दोन वेळा केसाला तेल लावा. साधारण केस धुण्याच्या एक तास आधी केसांना तेल लावा. केस धुवून झाल्यावर एखादे कंडीशनर लावू शकता.

३. चेहऱ्याला लेप लावा
उन्हाळ्यातच नव्हे तर संपूर्ण वर्षभर शक्यतो घरगुती लेप (फेसपॅक) लावा, कारण ते उत्तम आणि सुरक्षित असतात. दही, चंदन चूर्ण, टोमॅटो रस आणि कोरफड जेलचा वापर करा. हे मिश्रण केवळ त्वचा स्वच्छ करणार नाही तर आपल्या चेहऱ्यावर एक चमक निर्माण करेल.

या उन्हाळ्यात आपल्या त्वचेसाठी घरगुती ब्लीच करून पहा – दही व बेसन यांचे मिश्रण करून त्यात अर्धा लिंबाचा रस घालून ते चिकट होईपर्यंत मिसळा. 15 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर व मानेवर लावा आणि थंड पाण्याने धुवा. त्वचा स्वच्छ आणि चमकणारा होईल.

४. बाहेर जाताना घ्यायची काळजी
आपण घराबाहेर जाताना सनस्क्रीन लावून घराबाहेर पडा आणि जास्त वेळ बाहेर राहणार असल्यास दर चार तासात एकदा सनस्क्रीन लावा. आपण बाहेर जाताना अतिरिक्त तेल काढलेला ब्लॉटिंग पेपर घ्या, सनस्क्रीन लोशन, ओले विप्स, ओठाचे मलम (लीप बाम) सोबत घ्या

५. नैसर्गिक आहार घ्या
भरपूर पाणी, ताजे रस वापरा आणि भाजीपाला सॅलड्स आणि फळांच्या सॅलड्सचा वापर करा. ताजी फळे, रस आणि भाज्या आपल्या शरीरातील विषारी द्रव्य कमी करतील व शरीर स्वच्छ होईल. उन्हाळ्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळणे चांगले आहे कारण ते आपल्या त्वचेवर तेल साठवतात.

६. आपले डोळे आणि केसांचे संरक्षण करा
आपण वारंवार बाहेर पडत असाल तर आपले केस, चेहरा आणि डोळे यांचे संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, टोपी, गोगल यांचा वापर करा. शक्यतो केस मोकळे सोडू नका, वा जमल्यास केस कमी ठेवणे उत्तम.

भारतीयांची त्वचा टाइप lV आणि V मध्ये येते. कारण आपल्या त्वचेत melanim, रंग बनवणाऱ्या पेशी जास्त आहेत व या पेशी आपल्या त्वचेची सुरक्षा करतात. या उलट विदेशी खास करून युरोपियन, अमेरिकन हे जास्त गोरे असल्यामुळे टाईप I व III मध्ये येतात. त्यांच्यात melanim व रंग बनवणाऱ्या पेशी कमी असतात. म्हणूनच त्यांच्या त्वचेवर सूर्यकिरणांमुळे होणारे बदल जास्त दिसतात व सूर्यकिरणांमुळे होणारे त्वचेचा कर्करोग ही जास्त प्रमाणात आढळतात.

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता असते. भरपूर पाणी असणारी फळं सेवन करण्याची आवश्यकता असते. जसं टोमॅटो, काकडी, द्राक्षे, खरबूज, टरबूज इत्यादी. उन्हाळ्यात जास्तीत जास्त सुती कपडे वापरण्यावर भर द्यावा. फिकट रंगाचे कपडे घालावे. पूर्ण बाह्याचे कपडे किंवा तरुणींनी सनकोट, सुती स्टोल वापरावे. हवी असल्यास जवळ छत्री बाळगावी. डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून गॉगल वापरावे. सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा आल्यामुळे मॉइश्चर कमी होते, त्वचा कोरडी वाटल्यास मॉइश्चराइझर लावून त्वचा मऊ ठेवावी. उन्हाळ्यात सनस्क्र‌नि लोशनचा वापर करावा. त्वचेवर चांगल्या दर्जाचे सनस्क्र‌नि लावा. ते चांगल्या दर्जाचे हे कसं ठरवावं याबद्दल काही माहिती पाहू.

सनस्क्र‌निचे SPF (सन प्रोटक्शन फॅक्टर) तीस किंवा तीसपेक्षा जास्त असावं.

कॉस्मेटिकपेक्षा मेडिकल सनस्क्र‌नि नेहमी जास्त उपयुक्त असतात.

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फक्त SPF (सन प्रोटक्शन फॅक्टर) पुरेसं नाही. तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी ब्रॉड स्पेकट्रम सन प्रोटेक्शन लोशनचा वापर करा.

सनस्क्र‌िन लावताना भरपूर प्रमाणात लावणं. उदा. ३ एमएल (अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त) चेहऱ्यासाठी व गळ्यासाठी. ६ एमएल प्रत्येक हात व पायासाठी.

सनस्क्र‌िन उन्हात जायच्या २० मिनिटे अगोदर चेहऱ्यावर व शरीराच्या इचर भागावर लावावं.

जेव्हा खूप घाम येतो किंवा तुम्ही पाण्यात जाता तेव्हा सनस्क्र‌िन प्रत्येकी चाळीस मिनिटांनी लावावं. सनस्क्र‌िन नेहमी Water Resistant असावं.

गाडीच्या काचा (चारचाकी वाहन) अतिनील किरण थोपवत नाहीत. त्यामुळे गाडीत प्रवास असला तरी सनस्क्र‌िन लावावं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स