Monday, December 4, 2023
Homeआरोग्ययाचसाठी तांब्याच्या भांड्यात असलेलं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो...

याचसाठी तांब्याच्या भांड्यात असलेलं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो…

मित्रांनो.. आपण तांब्याच्या भांड्यातील तांबयुक्त पाणी हे आरोग्यासाठी किती फायदेशीर असेल हे ऐकलं असेलच.. पण यामध्ये काही गोमही दडल्या आहेत.

१. शरीराला आवश्यक असलेलं तांबं हे अन्न पदार्थातून मिळते जसे की चिकन , मटण , कलेज्या , मोठे मासे, माठ, मटकी इ. पालेभाज्या, लॉबस्टर आणि थोड्याबहुत प्रमाणात इतर काही भाज्या आणि मांसाहारा च्या माध्यमातून शरिर ती पूर्तता करुन घेत असतं.

२. तांबं हे नेहमी लाल रक्तपेशी, हृदय, मूत्राशय, जठर, काळीज आणि मज्जातंतू ह्यांच्या दैनंदिन कार्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं.

३. तांब्याची कमतरता असेल तर ऑस्टिओपोरोसिस (हाडांची झीज), अर्थरिटीस (सांध्यांची झीज), कोलेस्टेरॉल, अल्झायमर किंवा विलकन रोग (स्मृती भ्रंश) इत्यादी आजारही होऊ शकतात.

आता हे वाचल्या नंतर आपण लगेच तांबे घेण्यास उत्सुक होऊ. पण जशी तांब्याची कमतरता तुमची चिंता वाढवेल तशीच त्याची वाढही स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे कारण अतिप्रमाणात तांबे कॅन्सर, रातांधळेपणा, मज्जातंतूची अतीकार्यशिलता आणि शिथिलता इत्यादी होण्यास आमंत्रण देऊ शकतं.

शिवाय विज्ञानाने हे सिध्द केलंय की आपल्याला तांब्याची अन्नपुरवणी (फूड सप्लीमेंट) घेणे गरजेचे नाही. साधारणपणे आपल्या नेहेमीच्या आहारातून तांबे हे शरीराला हव्या त्या प्रमाणात मिळत असते. त्यातही तांब्याच्या कमतरतेची वैद्यकीय उदाहरणं क्वचितच पाहायला मिळतात.

त्यामुळे न गंजलेल्या तांब्याच्या स्वच्छ पात्रातील शुध्द पाणी हे स्वास्थ्यासाठी उपकारक ठरू शकते पण ह्या पाणी पिण्याने कुठला चमत्कार होईल अशी अपेक्षा मात्र बाळगणं चुकीचं आहे.

पूर्वीची लोकं मडक्यात साठवलेले, तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पीत होते. तरीही, तेव्हाही लोक आजारी पडतच होते. पण त्यांचे जगण्याचं वय आणि आजचे लोकांचे वय यावर कधी कटाक्ष टाकलात? काय कमावलं एवढी प्रगती करून व शोध लावून जर त्याचा परिणाम हा विरुद्धच होत आहे? अहो पूर्वी लोक तर सरळ सरळ तलावातील, झऱ्यातील, विहिरीतील पाणी पीत होते, ज्या मध्ये असे कित्तेक घटक मिसळलेले असत. बघा त्यांचं वय? अगदी १०० सुद्धा ओलांडली आहेत काहींनी. आणि आजचे आपण, हे खाल्लं तर हे होईल, हे पिल तर ते होईल, गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका …

अहो मीठ/ राखाडीने दात घासलेली वृद्ध मंडळींचे अजून मजबूत दात आहेत, आणि आपण कॅव्हिटी प्रोटेक्शन, जर्म्स प्रोटेक्शन च्या नावाखाली शरिरात केमिकल कोंबत असतो, तरी आपल्या समस्या दत्त म्हणून समोर उभ्या राहतात.

सांगायचं एवढंच आहे की जस खायचं प्यायचं आहे ते खा प्या …तांब्यातल प्या, मडक्यातल प्या नाहीतर अजून कसलं प्या, तुम्हाला ज्यातुन पिऊन फायदेशीर वाटते त्यातून प्याच. एकच आयुष्य आहे हो! शेवटचं! हे संपलं की संपलं! त्याला पण एवढे निर्बंध लादून ठेवलेत तर काय उपयोग!

तांब्याची जवळपास सर्वच संयुगे ही विषारी (पॉइज़नस् व टॉक्सिक्) असतात. त्यामुळे त्यापैकी काही कीटकनाशके आणि कवकनाशके म्हणूनही वापरली जातात. (चांदीबद्दलही जवळपास असेच म्हणता येईल.)

तांबे हे जरी एक सूक्ष्म पोषक अन्नघटक असले तरी त्याची कमतरता गृहीत धरून, वैद्यकीय सल्ल्याशिवाय वा ते दुर्लकक्षित करु नये, पूरक खुराक म्हणून घेतल्यास ते नक्कीच हानिकारक ठरू शकेल. ‘अधिकस्य अधिकम् फलम्’ हा न्याय येथे लागू होत नाही.

मात्र, ह्याच पद्धतीने तांब्याचे सेवन करा असा सल्ला असल्यास किंवा करावयाचे असल्यास अधिक चांगला पर्याय म्हणजे, विशुद्ध, इलेक्ट्रोलिटिक् ग्रेड् तांब्याचा तुकडा (तार, पट्टी, इ) वापरावा जो रोजच्या रोज घासून लख्ख करून वापरला जाऊ शकेल.

अशुद्ध तांब्यातील इतर अज्ञात घटक पाण्यात उतरल्यास ते शरीरास तांब्यापेक्षा कमी हानिकारक असतील याची शाश्वती नाही .

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स